Apr 22, 2021
प्रेम

सुंदर ते ध्यान

Read Later
सुंदर ते ध्यान

                 सुंदर ते ध्यान....

             लहानपणीचा किस्सा.
            'सच्ची घटना कच्चे शब्दोमे'.

             मी तेव्हा चौथी- पाचवीत असेल. 
             खूप वर्षातून मामा भेटायला आलेला. 
 त्याने जाताना माझ्या हातात एक रुपया दिला. 
तेव्हाचा 'एक रुपया' म्हणजे आताचे 'दहा रुपये'.
'एक रुपया' मी पहिल्यांदा बघत होते. तो एक रुपया आहे किंवा नाही हेही धड माहीत नव्हते. कारण तो जमाना म्हणजे ५ पैसे, १० पैसे, २० पैसे, २५ पैसे मग एक रुपया दिसणार कुठून? घरची परिस्थिती जेमतेम.
तो मला दिसला. प्रथमच.
         माझा आनंद गगनात मावेना. थोड्या वेळाने तो गगन कापून स्वर्गात जाणार होता. मी खुपसारें चॉकलेट घेणार होते. प्रथमच.
मग काय? माझी धूम पिक्चर रिलीज झाली. ती दुकानदाराकडे हिट झाली आणि घरी येऊन ती सुपरडुपर हिट होणार होती.
       काय आनंद होता तो!
दुकानदाराने ओंजळभर चॉकलेट दिले. ओंजळीत चॉकलेट, तोंडात पाणी. चॉकलेट मावत नव्हते ओंजळीत, पडत वेचत आले घरी.
    
       आई दारात कमरेवर हात ठेवून उभी. 
       माझ्या तोंडावर मोठी स्माईली इमोजी.
पण आईची इमोजी रागाने लालेलाल.
"घोडे मले सांगितलस नाही, विचारलीस नाही न तू चॉकलेट घेतलीस. तेही पूर्ण एक रुपयांचे"
झालं. इथून आपली पिक्चर सुपरडुुपर फ्लॉप व्हायला सुरुवात.
आईच्या डीक्षनरीतील रामबाण उपायांचा माझ्यावर प्रयोग सुरू. तिने मारले. त्याचा पुरावा हातापयावर सापडेपर्यंत.....
नंतर मी चॉकलेट खाल्ले की नाही माहीत नाही.
मार खाऊन 'पॉट' भरले असेल कदाचित.
'पुराव्यानिशी' मी झोपले.


प्रसंग दुसरा:
                शाळा.
                शाळेतून दुपारच्या सुट्टीत पळ किंवा शाळेच्या नावाने कुठेही टिंगलटवाळ्या कर हे नित्याचेच. शिक्षकाना खबर नाही, घरचे सोडाच. 
मज्जा नुसती. 
शाळेचा, अभ्यासाचा कंटाळा नुसता. शाळेला वॉचमन नसतोच गावाकडे.
मग काय? मज्जाच मज्जा.

               एवढी मज्जा असूनही मी माजलेली. सकाळी उठल्यावर शाळेत जाणारच नाही हा एकच धोशा सुरू.
आईने पुन्हा कमरेवर हात ठेवून रौद्ररूप धारण केलेलं. अंगणातल्या लाकडी खांबाला बांधून माझ्यातील 'महिषासुराचा' मर्दन सुरू.
माझी 'आकाशवाणी' पुन्हा पुन्हा प्रसारित होत होती   "मी पुन्हा अस कधी करणार नाही. मी शाळेत जात जाईल". 
आई ऐकेचना. वेड्यासारखी मारत होती.
       
रामाचा पत्ता नाही. सीतेचा पत्ता नाही. रावणाचा सुद्धा 
पत्ता नाही मग ही 'शुर्पणखा' माझ्याच नशिबात कोठून आली?
        मला त्यावेळी आईपेक्षा आजी,आजोबा, काकाकाकू, आत्या, भाऊ यांचांच जास्त राग आलेला.
नुसतीच क्रिकेट मॅच बघत होते. जशी काही सचिनची बॅटिंग सुरू आहे. म्हणून मी ठरवलं यांचे काम करायचेच नाही. पण या सचिनचे उर्फ शूर्पणखाचे करायचे काय?
        माझी आकाशवाणी प्रसारीत होत होती. पुन्हा तिने मारल्याचे पुरावे तिला हातापयावर सापडले. तेव्हा कुठे ती शांत झाली.
      'मी पुराव्यानिशी शाळेत हजर'.

हे दोन प्रसंग 'जशेच्या तशे' मला आठवतात. 'पुराव्यासकट'.

        आईच्या डीक्षणरीतील 'रामबाण उपायाने' माझ्या डिक्षणरीतील 'पैसे उधळणे, शाळेला दांड्या मारणे, अभ्यास न करणे' हे शब्दच डिलिट झालेले.
          पैशांपैशापासून ते लाखापर्यंतचा ( करोडपती व्हायची आहे अजून) हिशोब तिच्या डोक्याच्या नोंदवहीत स्वमुखाने नोंदवलेला. 
           तब्येत बिघडली तरीही शाळेत जाऊन सर्व वर्गाला सर्दी खोकला करूनच घरी राहणे एवढा धाक आईचा. हा धाक अजूनही आहे. सर्व ऑफिसला सर्दी खोकला झाल्यावरच मी घरी राहते.

ठीक आहे.
काबुल है.
ऍग्री.
           आईची महिमा गाण्याची , तिची थोरवी सांगण्याची औकात नाही आपली. आय हॅव नो वर्डस  टू डिस्कराईब 'महिमा ऑफ मातोश्री'. सांगणार कस? डिक्शनरीतील शब्दच संपलेत.
              
             तर असे सुंदर ध्यान प्रत्येकाच्याच नशिबात आलेले. व ह्या ध्यानाने प्रत्येकालाच 'पुराव्यानिशी' अतिसुंदर बनवले. आणि असे कित्येक 'पुरावे' अंगावर घेऊन आपण 'पवित्र' झालोत. तिने प्रयोग केलेले उपाय डोक्याच्या हार्ड डिस्क मध्ये नेहमीसाठी 'सेव्ह' झालेत. आणि त्याचा 'इफेक्ट' आपल्या जीवनात अनुभवतो आहोत. इट्स ऑल अबाऊट फॉर 'मातोश्री'.........
           
             आठवल्या ना मातोश्री......कश्या.....
           "सुंदते ध्यान, उभे विटेवरी
              कर कटेवरी ठेवोनिया".

 

 


धन्यवाद आपल्या अतुलनीय प्रतिसादाबद्दल.
माझी पोस्ट माझे नावरहित सामायिक केल्यास.......... चुकीला माफी नाही. (कॉपीराईट भानगड वैगेरे वैगेरे.)
हसत जगा नि सर्वाना हसत जगू द्या.
आपल्याला जर माझ्या कथा आवडत असतील तर मला फॉलोव करा.


         

Circle Image

Sushma Chawle - Kanetkar

Job

I like reading very much. I want to share my stories .