{ फक्त प्रौढां करिता}
फाईल मधील एक एक कागद व्यवस्थित वाचून माधवी त्यावर सह्या करीत होती.पाच वर्षापासूनची ती केस होती.प्रकरण चालूच होते.उत्तरे आणि प्रत्युत्तरे!शंका आणि त्याचे निराकरण.फएलच्यावर करकुणाने ऑफिस नोट लिहिली होती.त्यात सर्व प्रकरणाचा सूत्र रूपाने सारांश दिला होता.
एका ठिकाणी बॉलपेन ने खूण करून पुढे वाचायला लागणार इतक्यात टेबलावरच्या इंटर कॉम वाजला,तिला किंचित बरे वाटले.कामातून थोडीफार सुटका झाल्याचा आनंद झाला.तिने रिसिव्हर हातात घेतला.
" येस,माधवी स्पिकिंग".
पलीकडून रमाकांतचा आवाज,किंचित मऊ .त्याला एका कामाच्या विषयावर सजेशन्स हवे होते.त्याबद्दल डिशकशन करायला येऊ का?असं तो विचारीत होता.
ती म्हणाली " आता नको...लंच टाईम मध्ये या .फार तर कुठे तरी जेवायला जाऊ".
तिने रिसिव्हर खाली ठेवला.आणि पुन्हा कागद वाचायला लागली.ती वाचत राहिली पण कसं कुणास ठाऊक,तिचं मन त्या कागदपत्रात रमेना. तिची एकाग्रता संपली.मन किंचित सैरभैर झालं.तिला हसू आलं.
समोरचे कागदपत्रे तिने बाजूला सारले. रमाकांत च्या नुसत्या फोनमुळे आपणा मध्ये इतके परिवर्तन व्हावे.मनाची इतकी चलबिचल व्हावी.याचेही तिला आश्चर्य वाटले.
आळोखे पिळोखे देत ती उठली.केबिनच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून बाहेर बघायला लागली.अनेक उंच इमारती उभ्या होत्या.ती उजव्या बाजूस बेसिन जवळ लावलेल्या आरश्या समोर उभी राहिली.
स्वतःच्या चेहऱ्याकडे तिने पाहिले.सावळा रंग,रुंद हनुवटी,जड होंठ.... तिशीला पोचलेल्या कुमारिकेच्या मानानेही आपण राठ दिसतो असे तिला वाटले.आपण दिसायला साधारण आहोत हे तिला माहीत होते.
थोडी खिन्न होऊन ती स्वतःच्या खुर्चीवर बसली.चेहरा सुंदर नसला तरीही आपण बुद्धी च्या जोरावर सेकशन प्रमुख झालो ही कर्तबगारी ही काही थोडी नाही,असे तिने मनाला बजावले.
रमाकांत ला आपल्या बद्दल काहीतरी विशेष वाटतं हे तिच्या अनुभवी नजरेने केव्हाच ओळखले होते.रमाकांत सारखा स्मार्ट तरुण अधिकारी आपल्यावर आसक्त व्हावा.त्याला आपल्याबद्दल अश्या काही वासना असाव्यात .रमाकांत ची बायको फुलासारखी नाजूक नि सुरेख होती तरी पण.
केबिनचं दार लोटून रमाकांत आत आला आणि तिला एकदम जग आली. लंच टाइम झाला होता .रमाकांत समोरच्या खुर्चीवर बसला.
"मला एक अडचण आहे"
ती हसली" आपण पहिले तुमच्या गाडीतून कुठे तरी जेवायला जाऊ...उशीर झाला तरी हरकत नाही".
रमाकांत ने लगेच मान्य केले .गाडीत ती त्याला मुद्दाम थोडीशी लगटून बसली होती.शहराच्या मध्यभागी रमाकांत चे एक आवडते हॉटेल होते.
हॉटेलात आपल्या ऑफिस च्या कामातली अडचणी बद्दल विचारायचं रमाकांत विसरूनच गेला होता.तो तिच्याकडे स्थिर नजरेने पाहत होता.त्याची नजर वरखाली फिरत होती.
ती हसली." मला तुमच्या नजरेचं आश्चर्यच वाटतं. माझ्याकडे असं कुणी पाहिलेलं नाही."
" आश्चर्य वाटण्याचं कारण काय?माणसाला नेहमी व्हेरायटी आवडते".
" तुमच्या सारख्याला माझ्या बद्द्ल असं वाटावं"
" का वाटू नये?"
" अहो गोऱ्यापान नाजूक फुला प्रमाणे असणाऱ्या स्त्रिया कुणालाही आवडतात.तुमच्यावर तर अश्या किती तरी बायका लट्टू असतील"
"माझी बायको ही अशीच आहे"तो किंचित लाजला.
" ती मला आवडते पण ... तुझं निराळं आहे".
त्याने माधवी चा हात हातात घेतला .त्याच्या स्पर्शामुळे तिचे सर्वांग पुलकित झाले.केबिनमध्ये आल्यावरही तिच्या भावना धगधगत होते.मन धुंद झालं होतं.तिच्या हातून पुढे काम करणं शक्यच नव्हतं.
लहानपणा पासून वडिलांचं दारिद्र्य तिने अनुभवलं होतं. त्या घरात सगळीच टंचाई होती.अनेक प्रकारची कामे करून तिला शिकावं लागलं होतं.जगाच्या व्यवहारापासून दूर राहून स्वप्न विणत बसण्याची तिला सवडच मिळाली नव्हती.आपल्याला चांगला सुंदर, पगारदार पैसेवाला नवरा मिळणं शक्य नाही हे तिला फार लवकर उमगलं होतं.
शिक्षणात हुशारी दाखवून तिने नोकरी मिळवली होती.नोकरीमध्ये प्रगती च्या पायऱ्या झपाझप वर चढत होती.लग्न करून कुठल्यातरी गरीब माणसाचा दरिद्री संसार सजवायचा नाही असा निर्णय तिने मनाशी केव्हाच घेतला होता .
एखाद्या मुलाकडून नकार ऐकून मनस्ताप करून घ्यायचा नाही म्हणून आपल्या नाजूक भावना तिने मनात आतल्या आत केव्हाच मारून टाकल्या होत्या.
प्रगतीच्या पायऱ्या चढतांना आई ,वडील,भावंडे कधी मागे पडले नाही.तिने त्यांची फिकिरही केली नाही.जन्मभर एकटच रहायचं.संसाराचा लबेदा वाढवायचा नाही .असं तिने ठाम निर्णय घेतला होता.
रात्री फ्लॅटवर येऊन ती अंथरुणावर पडून राहिली.ती कित्येक वर्षांपासून एकटी राहत होती पण आज एकटेपणा तिला बोचत होता.मनामध्ये नाही नाही ते विचार येत होते.कशी बशी तिने तळमळत रात्र काढली.
दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये आल्यावर तिने जेमतेम कसा बसा एक तास काढला .मग रमाकांत ला फोन केला.
तो म्हणाला " आज पुन्हा हॉटेलमध्ये जायचं का?"
" नाही हॉटेलमध्ये नको रात्री माझ्या फ्लॅटवर येत".
रमाकांत ला आश्चर्य वाटल्याचे त्याच्या आवाजावरून स्पष्ट दिसले.त्याने आढे वेढे घेतले मग मान्य केले.
ती पुढे म्हणाली," गुड! रात्री नऊ च्या सुमारास या.मी वाट पाहते.घरी सांगून या उशीर होईल म्हणून...."
रात्री नऊच्या सुमारास रमाकांत आला.तिला पाहून रमाकांत ला आश्चर्याचा धक्काच बसला.माधवी ने त्या वेळी नाईट गाऊन घातला होता.रमाकांत हॉल मधील कोचवर बसला.
जेवतांना हसत हसत तो म्हणाला
" तुम्ही मला असं इनवाईट कराल याची कल्पना नव्हती."
" तुम्हाला असं कोणत्याही स्त्री ने बोलावलं नसेल " ती हसली आणि पुढे म्हणाली.
"स्त्री देणारी आणि पुरुष घेणारा, फक्त पुरुषच उपभोग घेणारा असतो अशी समजूत असते,असेलही,स्त्री पुरुषावर अवलंबून असली तर तसं असणं साहजिकच आहे पण माझं तसं नाही.'
ती त्याच्याजवळ गेली.डोळ्यातले भाव एकमेकांशी डोळ्यांनीच टिपून घेतले.एकमेकांपासून नेमके काय हवंय ते समजलं होत.संकोच संपला होता.
तिने आळोखे पिळोखे दिले.त्याचा हात हातात घेऊन ती म्हणाली.
" चला बेडरूममध्ये जाऊ".
" मी आज तयारीनिशी आलो नाही.मला कल्पना असती तर..."
त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच माधवी म्हणाली.
" तुम्ही काळजी करू नका.माझी तयारी आहे".
सकाळी रमाकांत निघून गेला.नंतर चार पाच महिने त्यांचं असं सहजीवन सुरू होतं. पण नियतीने आपला डाव खेळला.
अपेक्षित ते घडले.तिच्या शरीरातला बदल लोकांच्या लक्षात येऊ लागला.ऑफिसातले लोकं कुजबुजत होते.परंतु ती मात्र शांत होती.आणखी दिवस सरकले.
एक दिवस ती कामात गुंतलेली असतांना अचानक रमाकांत तिच्याजवळ आला.
" मी तुझ्याबद्दल ऐकतोय खरी का ते?"
"तुम्हाला काय दिसतंय"ती म्हणाली.
" तुला काहीच वाटत नाही"तो चकितच झाला.
"तुम्हाला वाटत?"
"मला ? माझा काय संबंध?
" तुमचा संबंध नाही? व्वा ....यू आर द कॉज फॉर इट "
रमाकांत ला ते माहीत होतं.तो सुन्न झाला.मग म्हणाला.
" तू काळजी घ्यायला हवी होती."
"पण मला काळजी घ्यायची नसेल तर?" तिने हसून विचारले.
तिचे विचार भयानक रीतीने स्वतंत्र आहे हे त्याला माहित होते.माधवी त्याच्या समोर बसली होती.कुमारिकेने दिसू नये असं अवस्थेत तिचं शरीर होतं. त्याला तिची किळस च आली.
तो म्हणाला " हे असं कसं झालं ?"
" मी सांगितले ना मला हवं होतं म्हणून झालं"
"खरंच तुला हे पाहिजे होतं" तो चिडला.’
" खरं खोटं कशासाठी? इतक्या मेथड्स निघालेल्या आहेत.मला ते नको असतं तर मी होऊ दिलं नसतं" ती अजूनही शांत स्वरात बोलत होती.
"एखाद्यावेळी मेथड्स फसतात,व्हाय डोन्ट यू डिसपोस ऑफ दिस"
" मी पुन्हा तेच सांगते - मला हे हवंय,आय विल हैव इट "
"आता मला तुझा हेतू लक्षात आलं,मला ब्लॅकमेल करून पैसे वगैरे काढण्याचा तुझा विचार दिसतोय".
ती मोठ्याने हसली ." स्टुपिड ...कसलं ब्लॅकमेल?मी तुम्हाला ब्लॅकमेल करेन? तुम्ही मला काय समजला?मला भरपूर पगार आहार.तुमच्या पैश्यानी मला जरुरी नाही.निश्चित रहा तुमचं नाव मी कोणाला सांगणार नाही".
आता मात्र रमाकांत बर्फाच्या खड्याप्रमाणे विरघळला.
" मग कसं चालेल? कुणाचं तरी नाव तर सांगावं लागेल."
" तेच मला नको आहे.मी सर्वांना सांगेन की हे मूल माझं आहे.कुणापासून आहे हे सांगायला मी काही कोणाची बांधलेली नाही...."
रमाकांत थक्क होऊन पाहत होता.
" अहो,माणसाचं आयुष्य - त्यातून स्त्री चं आयुष्य म्हणजे केवळ तिचं शरीर नाही की ते झाकण्यासाठी तिला लग्नाची तडजोड करायला हवी.तिच्या शरीरातही मन आहे,भावना आहेत. आई होणं ही प्रत्येक स्त्री ची अतिशय प्रामाणिक,, नैसर्गिक आणि खाजगी बाब आहे.प्रत्येक स्त्री या आई व्हावंसं वाटतं. आज समाजात अनेक स्त्रिया पाहतो ज्यांनी परिस्थितीमुळे ,जवाबदारी मुळे, किंवा अन्य काही प्रतिकूल कारणांमुळे लग्न केलं नाही.पण त्यांना काय आई व्हावंसं वाटत नाही? वाटतं. पण समाजाच्या भीतीने त्या गुदमरून कोंडमारा सहन करून जगतात पण मी त्यातली नाही.मला समाजाची लोकांची पर्वा नाही."
थोड्या वेळाने ती पुढे म्हणाली.
"समाज दुतोंडी मृदुंगा सारखा वाजतो,एकमेकांच्या सोबतीने चाललेल्या बहीण भावंडाकडे शंकेच्या नजरेने पाहणाऱ्या समाजाला आपण किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायचं असतं.
समाजाची लायकीच मुळी पादत्राना जवळची ,त्यांना डोक्यावर घ्याल तर तो मुजोरा होऊन तुम्हाला छळल्या शिवाय,तुम्हालाच पायाखाली घेतल्या शिवाय राहणार नाही.'
रमाकांत विक्षप्त नजरेने तिच्याकडे पाहतच बसला .तोंडातून शब्द निघत नव्हते .
"मी आजच माझ्या नोकरीचा राजीनामा पाठवीत आहे.आणि ही नोकरी,हे शहर सोडून इथून दूर जात आहे.कुठे जाणार आहे हे तुम्ही मला विचारू नका.मी कोणाला काहीच सांगणार नाही.दुसरीकडे जाऊन मी नव्याने संसार करणार आहे.त्या संसारात तुमची सावली पडली तरी चालणार नाही.तुम्ही पण यापुढे माझ्याशी कसल्याच प्रकारचा संबंध ठेवू नका.यापुढे आपण एकमेकांना ओळख सुद्धा दाखवायची नाही".
"का बरं?"
"तुम्ही येणार,उसासे टाकणार,त्या मुलाला लळा लावण्याचा प्रयत्न करणार.मला काहीही नको.ते माझ्या एकटीचं मूल आहे .आता तर मुलाच्या नावापुढे आईचे नाव लावण्यास शासनाने ही मान्यता दिलेलीच आहे."
रमाकांत भयभीत होऊन सर्व ऐकत होता.ती केबिनमध्ये हलक्या पावलाने फेऱ्या घालीत होती.त्याच्या मनावरचा ताण अगदीच संपला होता.तिचे ते फारवर्ड विचार त्याच्या सारख्या संस्कारयुक्त घराण्यातल्या पुरुषाला अमंगळ वाटत होते.फक्त
तिथून लवकर निघून जावे असे त्याला वाटले.तिच्या पकडीतून सुटण्यासाठी तो जवळजवळ धावतच बाहेर पडला.
समाप्त.
सदर कथा आपणास कशी वाटली.आवडल्यास नक्की लाईक करा, शेयर करा आणि कमेंट्स करा.
धन्यवाद
उज्जवल कोठारकर
वर्धा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा