Oct 18, 2021
कथामालिका

सावि..

Read Later
सावि..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
त्या तुफान पडत असलेल्या पावसात ति , लगबगीने चालत होती . विजा चमकत होत्या ,  ढगांचा कडकडाट होत होता ! जणु काही त्या काळ्या कुट्ट आकाशात ढगांचा थैमान चालु होता . तुफान पडत असलेल्या पावसा मुळे रस्त्यावर एक ही चिटपाखरू नव्हते . इतकी शांतता पसरली होती की , रात्रीच्या त्या घनदाट शांततेत ! रातकिड्यांचा तोह आवाज .सावीच्या कानाला त्रास देत होता . त्या रात्री तोह पडणारा पाऊस , सावीला खुप काही सांगत होता . सावी च्या अंगावरचा  ड्रेस चिखलाने माखला होता . खांद्यावरचि घसरती ओढणी संभाळत ति , चिखल तुडवत  सैरावैरा चालत होती . चालत ही बोलू शकत नाही आपण ! अशी धावत होती , खांद्यावर लावलेली ति पर्स हे सांगत होती की ति ! नुकतीच कामावरून घरी परतत आहे . जणु काही तरी मोठ घडलय , आणि ते सावि च्या माघावर आहे .सावि चा चेहरा जणु काही सांगत होता असा दिसत होता,  तोह पांढरा फट पडलेला चेहरा ? कसली तरी भीती , आणि डोळे एकटक जाणाऱ्या वाटे कडे लागले होते .ति कशी बशी तिच्या घरा जवळ पोहचली ...आणि पोहचताच तोह सोडलेला शुश्कार ssssss .सगळं काही विचित्र आहे हे मात्र कळत होत . सावि ने गेट उघडुन घराच दार ठोठावलं ठक ठक ठक ठक sssss बऱ्याच वेळा नंतर घराच दार उघडल.

सावि -  आई sss अगं किती उशीर दार उघडायला .किती वेळ झाला मि इथे दार वाजवत आहे . आणि लाइट कशी गेली sss
(अस बोलुन सावि लगबगीने घरात जाते ...)

आई -  अगं हो हो किती ते प्रश्न आल्या आल्या ..घराची लाइट बराच वेळ झाला गेलीये , आणि रस्त्यावरची ही .
(सावि जवळ येत आई )
आणि तु इतकी पळत का आली आहेस , दम पण बघ किती लागला आहे . कपडे ही चिखलाने माखले आहेत . काय झालय सांगशील का ?

सावि -  काही नाही ग आई . पाहिले तु दरवाजा बंद कर बघु ?  थांब मीच करते बंद !
(अस बोलुन सावि दरवाजा बंद करते )

आई -  अगं पण झालय काय , सांगणार आहेस काय ?
आणि इतकी घाबरली का आहेस , काय झालय ?
अगं सावि बोल बाळा .?
(सावि चि काळजी करत आई बोलते )

सावि -  काही नाही ग आई !
काही झाले नाहिये , पण अस दरवाजा उघडा ठेऊन राहत जाऊ नकोस pls

आणि सावि आत निघुन जाते , सावि चि ति धडपड बघुन आई खुप चिंतेत येते .

अगं आई जरा जेवण वाढ ग , खुप भूक लागली आहे .
(आतुन आईला आवाज देत सावि बोलते )
हो बाळा वाढते!
(जेवणाची ताट घेत आई बोलते)
सावि काही झालय का , तु खुप काळजीत दिसत आहेस .(आई बोलते )
काही नाही ग आई ! काही झाले नाहिये, , , ,  तु नको ग काळजी करूस इतकी माझी pls
(सावि आई ला बोलते )
सावि चि आई त्या दिवशी खुप चिंतेत असते , सावि चा असा अवतार पाहुन आई ला खूप काळजी राहते .
सावि ला त्या रात्री झोप येत नाही , ती रात्र भर विचार करत होती .
विचार करत होती त्या गडद छायेचा जी दिवस भर तिचा पाठलाग करत होती. सविच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवुन होती. ती जाईल तिथे तिच्या पाठी पाठी होती. आणि सविचा स्वभाव असा होता की ती कधीच कोणाला ही स्वताच्या मनातल सांगत नसे .
दुसरा दिवस उजाडला , छान सकाळ ही झाली होती . रात्र भर पडणारया पावसामुळे आजू बाजूचा परिसर ही हिरवळ झाला होता .
सविची आई तिला जोर जोरात हाका मारुन उठवत होती.
सावि ssss सावि ssss अग बाळ उठ की किती वाजलेत , कामावर जायचे नाही आहे का . किती वाजले बघ ना ,उठ चल आता.....(अस बोलून साविची आई किचन मध्ये जाते सावि साठी चहा बनवायला ).
सावि डोळे चोळत उठते, शांत पणे बेड वर बसुन राहते. तिचा काल च्या प्रकारामुळे कामावर जाण्याचा मूड ही नव्हता . पण ती कशी बशी उठते आणि आवराय्ला घेते. तोह पर्यंत तिच्या आई ने तिचा नाश्ता तयार ठेवला होता .
सावि कडे पाहून तिच्या आईला काहीतरी घडलय अस सतत वाटत होत.
सावि कसे बसे कपडे करून , अर्धवट नाश्ता करून निघते . जेवणाचा डब्बा ही ती विसरून जाते .
अगं sssss सावि डब्बा तर घेऊन जा ssss..( अस बोलत आई सावी पाठी डब्बा घेऊन मागे मागे जाते .)
पण तिथं पर्यंत सावी गाडी घेऊन निघून जाते.
आई सतत दिवसभर सावि च्या काळजीत राहते .
सावि कामावर पोहचते , पण तिच कामात मन लागत नाही . तिला आपण घरी कधी पोहचतो अस झालेलं असत . घरी तिच्या आई च मन ही लागत नसतं , सावि ला असे काळजीत पाहून . म्हणुन सावि ची आई सावि ला फोन करते . पण सावि तिच्या आई  चा फोन घेत नाही ..

दिवसभर सावि ने काही खाल्ले ही नव्हते , संध्याकाळ झाली होती . सावि कामावरून निघाली होती , जेम तेम ८ वाजले होते .
सावि खांद्यावरची बॅग सांभाळत दबक्या पावलांनी चालत होती , मनात असलेली भीती चेहऱ्यावर चांगलीच दिसत होती . ती आजुबाजुला पाहत होती , जणु काही कसली तरी भिती कोणीतरी पाठलाग करत आहे याची . सावि चालता चालता अचानक थांबली , तिच्या चेहऱ्यावर पडणारा प्रकाश तिने गच्च डोळे दाबुन मिटलेले , हाथ चेहऱ्यावर धरलेला. तिने तोह बाजुला केला , डोळे उघडुन प्रकाशा कडे पाहिले . तोच तिच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थ करणारी भिती दिसत होती , चेहऱ्यावरून घामाची धार लागली होती . आणि ओठात शब्द दाबुन ठेवलेत अशी ती पुटपुटत होती . ती दबक्या पावलाने मागे सरत होती , खांद्यावरची बॅग पटकन खाली पडली . तिच्या तोंडुन माफ करा मला हेच निघत होते. तिच्या समोर तिला तिच्या भासातली तिच्या कल्पनेतली व्यक्ती दिसत होती . सावि फक्त आणि फक्त स्वतःच्या जगात , कल्पनेतील जगात जगत होती. त्या पावसातील भयान शांतता सावि समोर अजुन ही एक मोठं कोड होत.समाप्त.....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Manisha Narendra Parab

Job

मि लॅब टेकनिशन आहे. लिहायला वाचायला खुप आवडत.