आशुतोष : मिस मीरा तुम्ही बरे आहात ना?
मीरा : ह्म्म
अक्षय : मग आता तुमचा इंटरव्ह्यू घेऊ का आम्ही(मुद्दाम चिडवत)
मीरा काळजीने जोरात ओरडते....काय?
अक्षय : आय मिन तुम्ही तयार आहात ना आता.....?
मीरा : (रागावून)तुम्ही काय ओ... कसे आहात.... मला इकडे टेन्शन ने चक्कर आली.....आणि तुम्हाला इंटरव्ह्यू ची पडली आहे.....माझी हालत बघितली....मला तर इंटरव्ह्यू च्या नावानेच चक्कर येते....हे बघा ना सर माझं शिक्षण बघा....माझा एक्सपिरियन्स बघा
अक्षय :(भुवया उडवत....काय एक्सपिरियन्स....?कुठचा.... आणि कुठला).
मीरा : म्हणजे ते नाही ये तस काही... पण तरीपण इंटरव्यू नको
अक्षय : व्हॉट...हे तुम्ही कस डीसाईड करणार
मीरा : तस तुम्ही पेपर मध्ये छापलं होतं फ्रेशर्सची गरज...आहे ....मग मी फ्रेशर आहे ना....मग घ्या मला....नाहीतर.....(बोट दाखवत)
अक्षय : नाहीतर....नाहीतर काय तुम्ही मला धमकी देतायत
मीरा : (मुदामून ) कस कळणार तुम्हाला आमच्या गरिबांची व्यथा .... तुम्हाला मन कुठे आहे मी एक गरीब मुलगी माझ इकडे कोणीच नाही..... तुम्ही..... नाही जाऊ द्या..... तुमच्याशी बोलून काहीच अर्थ नाही.... तेवढ्यात तीअशितोष कडे वळते....सर निदान तुम्ही तरी समजून घ्या...प्लिज
आशुतोष: मॅडम आम्ही सगळं समजू शकतो पण कंपनीचे सुद्धा काहीतरी नियम आहे ते पाहून आम्ही तुम्हाला सिलेक्ट करू त्यासाठी तुम्हाला इंटरव्यू देण्याची गरज आहे
मीरा : (काळजीने )हे बघा मी तुम्हाला तेच समजवण्याचा प्रयत्न करते ..... माझा इंटरव्यू घेऊन काहीच फायदा नाही..... मी नवी नाही जोपर्यंत तुम्ही मला काही शिकवणार नाही मी शिकणार कशी ....हो की नाही....
आशुतोष : हा ते तर बरोबर आहे....
मीरा : बरोबर ना ठीक आहे तर मग मी आता येते ....ते मी मगाशी बोलल्याप्रमाणे परवा येते परवा ठीक आहे चला बाय
(मीरा बॅग घेऊन पळून जाते)
अक्षय : अरे अशी काय ही....काही विचारायच्या आधीच निघुन गेली....
आशुतोष :( हसत म्हणाला )काही नाही रे ती थोडी नर्वस झाली आहे..... काही हरकत नाही आपण सांभाळून घेऊ परवा ती येणारच आहे ना तेव्हा बघू
अक्षय : अरे परवा यायचं कि नाही हे पण तिनेच डिसाईड केलं .....माझा तर काही प्रश्नच येत नाही आणि
अक्षय थोडासा असतो अक्षयला असं हसताना बघून आशुतोष जरा बरं वाटतं
---------------------------------------------------------------
दुसऱ्या दिवशी
इकडे मीरा गणपती चा मंदिरात पोहोचते....गणपती बाप्पाचे मनातुन खुप आभार मानते
मीरा :(मनात) बाप्पा तुझे आभार कसे मानु मला हेच कळत नाही....तू मला हे नोकरी दिली त्या बद्दल थंक्यु....तस बघायला गेलं तर मी ही नोकरी जबरदस्ती करुन घेतकी.....पण ठिके काही हरकत नाही .....,मला चालेल.....उद्या मला न त्या बॉस च्या समोर जायचंय तू ना प्लिज त्यांचा राग काय तो ससांभाळून घे....ठिके....चल मी निघते....आता मला बाहेर जायचं आहे...(मीरा मंदिरातुन निघते आणि परत गणपती बाप्पा ना मागे वळुन नमस्कार करते...बाप्पा मला अजुन काही हवं असेल तर मग मी नदीच्या मागें हा....मला दे तू )(हसत)
ईथे ऑफिस मध्ये....अक्षय कोण कोण पुण्याला नवीन मुलं मुली अपॉइंट केले आहे त्याची लिस्ट बघत होता....त्यात मिराच सुद्धा नाव होतं....मिरच्या कालच्या वागणुकीमुळे.... त्याला थोडी चीड येते पण तो काय करणार.... तेवढ्यात तो आशुतोष ला फोन करून बोलावतो
आशुतोष : काय झालं तु मला बोलावलं.... ?.
अक्षय : हो रे या पुण्याच्या मुला-मुलींच्या लिस्ट मध्ये थोडी गडबड झाली आहे
आशुतोष : गडबड नाहीतर अरे ही लिस्ट तर मी बनवली स्वतः
अक्षय : मला तसं नाही बोलायचं ....ही जी मीरा आहे काल आलेली मीरा देशमुख तिला आपल्या मुंबईच्या ऑफिस साठी अपॉईंट कर ते पण माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून
आशुतोष: (आश्चर्य होऊन )ओरडतो काय ....काय म्हणालास तू ही ती पण तुझी पर्सनल सेक्रेटरी अरे काय बोलतोस तू तुला तरी समजतय का
अक्षय : हो रे मला सगळं कळतं आहे कालच तर ही बोलत होती तिला बरंच काही शिकायचं आहे मग ती त्या यापुढे तिला जे काय शिकायचं आहे ते मी शिकवेल तू नको काळजी करूस मी बघून घेईल हिला कसं हॅण्डल करायचं ते
आशुतोष : (मनामध्ये )
याच्या मनात नक्की काहीतरी चालू आहे पण समजत नाही यार आणि त्याला विचारलं तरी हा सांगणार नाही
अक्षय : तुझ्या मनामध्ये जे काही चाललं आहे त्याचे उत्तर तुला लवकरच मिळेल ते सगळं सोडून तुला जे सांगितलं ते कर आणि मला पुण्याची फाईल आणून दे आणि हो दोन दिवसाने परी चा सहा महिन्याचा वाढदिवस आहे मी विचार करतोय घरांमध्ये साजरा करूया
आशुतोष : अरे वा क्या बात हे पार्टी मी तर तयार आहे आणि हो तुला काही मदत लागली तर नक्की सांग मी आहेच तुझ्यासोबत
अक्षय: ठीके मी कळवतो तुला आणि हा आज जरा मी लवकरच घरी जाईल मला थोडं काम आहे
बोलून झाल्यावर दोघेही आप आपल्या कामाला लागतात
-------------------------------------- -------------------------
नेहमीप्रमाणे सगळे जण आपापल्या कामात गुंतलेले असता....मीरा तिच्या वेळेवर येते....पण आज जरा तिला दहा मिनिटे उशीर होतो.....तशी ती ऑफीस मध्ये धपके मारत मारत येते...
मीरा : आज ऑफिसमध्ये माझा पहिला दिवस....सगळ संभाळून घे रे बाप्पा...... (तेवढ्यात मागुन आशुतोष येतो)
आशुतोष : मिस मीरा...आलात तुम्ही..???
मीरा : (मागे वळुन बघते) हो ...हो आलेना मी...सॉरी हा ते थोडं ट्राफिक मध्ये अडकले...पण उद्यापासून अस नाही होणार....
आशुतोष : काही हरकत नाही....आमचा ऑफीस मधील एक रूल आहे ...नवीन मुलामुलींना आम्ही दोन दिवस इकडे सेट होण्यासाठी देतो.....त्यामध्ये त्यांना उशीर झाला तरी काही बोलत नाही...त्यामुळे तुम्ही निश्चित रहा..
मीरा : हो का ....मग ठिके...नाही तर तो खडूस भडकला असता....(मनात बोलते)
आशुतोष : काय म्हणालात कोण-कोण खडूस
मीरा : आ हा ते मी म्हणाले चांगले चांगले आहे खूप छान आहे
आशुतोष : मिस मीरा आमच्या ऑफिसचा जुना स्टाफ आहे ते तुमच्या लोकांना कमीत कमी दीड महिना नवीन ट्रेनिंग देणारा त्यामध्ये तुम्हाला फार्मसी मध्ये काय काय कसं असतं याबद्दल नॉलेज दिल जाईल तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही तेव्हाच त्यांना विचारू शकता आणि हो तुमचे पेमेंट आजपासूनच सुरू होणार दीड महिन्यानंतर नाही त्यामुळे तुम्ही पण निश्चिंत रहा...
मीरा : खुश होत हाताने टाळी वाजवते.... अरे वा हे तर चांगलंच आहे म्हणजे शिकण्यासाठी बराच कालावधी आहे मला आवडेल तुमच्या सगळ्यांबरोबर काम करायला( खुश होत)
आशुतोष: प्लीज हॅव सीट ... गुडलक....
मीरा : आनंदामध्ये तिच्या सीटवर बसते ती मनामध्ये खूप खुश असते ....ती तिच्या ब्यागेतून गणपती बाप्पांची मूर्ती काढते .... आणि तिच्या कंप्यूटर च्या बाजूला ठेवते तिने हार वाल्याकडून त्या मूर्तीच्या साईज एवढाच हार बनवून आणलेला असतो ती त्या मूर्तीला मनापासून तो हार घालते.... तिचं हे सगळं जे काही चालू आहे ते आजूबाजूलाअसलेला सगळा स्टाफ बघत असतो ते सगळे जरा तिच्या वेड्या पनावरती खूप हसत असतात पण तिचं त्यांच्याकडे काहीच लक्ष नसतं ती तिच्या कामामध्ये खूप मग असते.... मीरा तिच्या बॅगेमधून अगरबत्ती काढते आणि तिथे कुणालाही न विचारता ती अगरबत्ती पेटवते .... अगरबत्तीच्या धुराने ऑफिस मध्ये असलेला सायलेन्सर जोरजोरात वाचतो त्या सायलेन्सर च्या आवाजाने ऑफिसमध्ये एकच भीती उडते की कुठेतरी आग लागली आहे म्हणून हा सायलेन्सर वाचला आहे तसा सगळा स्टाफ गडबडीने ऑफिसच्या बाहेर पडण्यासाठी धडपडत असतो मीराला काहीच कळत नाही की हे नक्की काय चालू आहे ती सुद्धा त्याच बरोबर बाहेर पडते
आशुतोष सुद्धा घाबरतच बाहेर येतो
तेवढ्या तिकडे अक्षय येतो : काय झालं तुम्ही सगळे एवढे घाबरलेले का आहात एनी प्रॉब्लेम
स्टाफ मधील एक मुलगी : सर कुठेतरी आग लागली आहे ऑफिस मधला आपला सायलेन्सर वाजला त्यामुळे आम्ही सगळे घाबरून बाहेर आलो
अक्षय : व्होटनॉनसेन्स..... आग आणि आपल्या ऑफिसमध्ये आजपर्यंत कधी लागली नाही मग आजच कसं काय हे सगळा प्रकार (मीरा एका कोपऱ्यात उभी राहून बघत असते मीरा एका कोपऱ्यात उभी आहे हे अक्षयच्या लक्षात येतं तो तिला लांबूनच तिच्या भोळ्या चेहऱ्याकडे बघत तिला निहारत असतो का माहीत का पण तो नकळत तिच्या कढे ओढला जात असतो)
तेवढयात पियुन(सदा) तिकडे येतो
सदाभाऊ : साहेब हे बघा.....ते कुणी तरी ही अगरबत्ती लावलेली...म्हणुन तो सायलेन्सर वाजला....
अक्षय : व्होट....अगरबत्ती ....ही कोणी लावली(अगरबत्ती बघुन आता मिराला चांगलाच घाम फुटला होता...)
मीरा : अरे बापरे हे तर माझ्यावरच आल सगळं....(डोक्यात हात मारत ) मीरा मेलीस आज तु.... तुझी नोकरी गेली आता
अक्षय : (जोरात ओरडत) ही अगरबत्ती कोणी लावली....मी विचारतोय ही अगरबत्ती ऑफीस मध्ये कोणी लावली
स्टाफ मधील एक मुलगा ( सर ही अगरबत्ती त्या कोपऱ्यात लया मॅडम ने लावली मी माझया डोळ्यांनी बघितलं)
तशी मीरा अजुन घाबरते....
अक्षय रागाने तिच्याकडे बघतो....
आशुतोष तिची बाजु सावरण्यासाठी: मी काय बोलतो आपण आत मध्ये जाऊन बोलूया....सदा भाऊ तुम्ही सगळं नीट बघितल ना?
सदाभाऊ : हो सर ....हा अगरबत्तीच्या धुराणेच सगळं काही घडलेलं.... बाकी सगळं ठीक आहे.....
सेक्रेटरी निशा : सर मी सगळ्याना आत जायला सांगते....आणि तुम्ही मिस मीरा (तेवढ्यात अक्षय ओरडतो)
अक्षय : मिस मीरा आताच्या आता माझ्या केबिन मध्ये यायचं (आणि तो रागाने निघुन जातो)
सगळा स्टाफ आपापल्या जागेवर निघुन जातो
मीरा काळजीने हळूहळू केबिनमध्ये जाते....तिकडे अक्षय आधीच पाठमोरा उभा असतो....थोड्यावेळ कोणीही एकमेकांना काही बोलत नाही
मीरा : (घाबरून)सर ते मी .....पुजा......!
अक्षय : रागात तिला बघतो....त्याचे डोळे लाल लाल झालेले असतात....
मिरच्या तोंडातून एक आवाज निघत नाही ....सर ते मी ....आरती...
अक्षय : हे तुम्हाला मंदिर वाटलं का इकडे पूजा आरती करायला मिस मीरा.....(जोरात ओरडून....अक्षय च्या आवाज भारी भडकम होता....कोणाची काय हिम्मत त्याच्या पुढे बोलायची)
मीरा : ते मी ......
अक्षय रागाने तिच्या जवळ येतो आणि तिच्या दोन्ही हातांच्या बाह्यना पकडतो.....आज नकळत का होईना तो तिला स्पर्श करतो....
मिस मीरा मी काय विचारतोय हे मंदिर आहे का इकडे अगरबत्ती लावायला
मीरा आणि अक्षय दोघेही एकमेकांना बघत असतात....अक्षय च्या आवाजाने मिरची हार्ट बिट्स वाढतात....त्याचा आवाज अक्षय स्पष्टपणे ऐकू शकत होता.....तो थोडा शांत होतो....मीरा मात्र परत भोवळ येऊन अक्षय च्या खांद्यावर डोकं ठेवून पडते....
अक्षयला काहीच सुचत नाही.....मीरा .....मिस मीरा .....अक्षय जसा तिला आवाज देतो तशी ती गळुन काही पडणार तोच तिला सांभाळतो..... तीच डोक त्याच्या छातीजवळ असत....तिचा मासुम चेहरा एकदम शांत झालेला असतो.....तिची धडधड अजूनही त्याला तिच्या स्पर्शातुन जाणवत असते.....
थोड्यावेळ तर तो तिच्यात हरवुन जातो.....
अक्षय : मीरा मिस....मीरा....काय करू मी....(तो तसच शांत डोळे बंद करतो....शांत पणे कुणाचातर चेहरा आठवायचा प्रयत्न करतो.... त्याला सोनिया त्याच्या जवळ असल्याची जाणवते....नकळत त्याच्या डोळ्यातुन पाणी वाहत.....आणि ते पाणी मिराच्या चेहऱ्यावर पडत....मीरा हलका हलका श्वास घ्यायला सुरुवात करते.....ती हळूच जागी होते....ती जागी असली तरी अक्षय चे डोळे बंद असतात.....ती हळूच त्याला आवाज देते
मीरा : सर...
तसा अक्षय जागा होऊन तिला त्याच्यापासून तिला लांब करतो आणि पाठमोरा उभा रहातो....
मिरा : सर एम सॉरी .....
अक्षय : तुम्ही जाऊ शकता....
मीरा : सर ते
अक्षय : (ओरडत) मी काय बोलो ते कळलं नाही का तुम्हाला....आणि परत अस वागू नका....जा आता
मीरा तशीच शांतपणे निघून जाते
(काय होईल पुढील भागात ....कोण आहे ही मीरा काय संबंध हिचा अक्षय शी ....का तिच्या कडे हा ओढला जातोय....पाहूया पुढील भागात)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा