Jan 20, 2021
सामाजिक

समाधानाचा मूळ स्रोत काय आहे?

Read Later
समाधानाचा मूळ स्रोत काय आहे?

समाधानाचा मूळ स्रोत काय आहे?

एक इतिहास संशोधक एकदा एका मंदिराच्या परिसरात पाहणी करत होता. त्याला तिथे एक म्हातारा मूर्तिकार दिसला जो एक लहान मूर्तीवर कोरीवकाम करत होता. संशोधकाने ते पाहिले आणि तो पुढे जायला निघाला. पुढे जाता जाता त्याच्या लक्षात आले की मूर्तिकार ज्या मूर्तीवर काम करत होता अगदी तशीच तंतोतंत दिसणारी दुसरी मूर्ती तिथेच बाजूला ठेवलेली होती. तो थबकला!! त्याला शंका आली. तो त्या मूर्तिकारपाशी जाऊन उभा राहिला.
संशोधक म्हणाला, "तुम्ही खूप तंतोतंत दिसणाऱ्या दोन मुर्त्या बनवल्या आहेत!!"
मूर्तिकार त्याच्याकडे न पाहता आपले काम करता करता म्हणाला, "हो!!"..
संशोधक, "तुम्ही दोन मुर्त्या का बनवल्या??"
मूर्तिकार आपल्या कामात व्यस्तच होता. तो म्हणाला, "पहिल्या मूर्तीमध्ये एक त्रुटी आहे.."
संशोधकाने दोन्ही मूर्तीचे खूप सूक्ष्म निरीक्षण केले परंतु त्याला कोणतीही त्रुटी किंवा साधासा फरक जाणवला नाही. तो म्हणाला, "मला तर त्रुटी दिसत नाहीये!!"

मूर्तिकार थोडासा थांबला आणि म्हणाला, "त्या मूर्तीच्या नाकाला खरचटले आहे, एक scratch आहे त्यावर!!"
संशोधकाने आता नीट मूर्तीच्या नाकाला पाहिले तर तिथे त्याला थोडं खरचटलेलं दिसले. त्याने परत प्रतिप्रश्न केला, "ह्या मूर्तीला मंदिरात ठेवणार आहात का तुम्ही?", त्यावर म्हातारा म्हणाला, "नाही, मंदिराच्या बाहेर एक मोठा स्तंभ आहे त्याच्यावर ठेवणार आहोत!!". आता तो खूप बुचकळ्यात पडला, विचार करू लागला की जी मूर्ती १२ फुट उंच स्तंभावर ठेवली जाणार आहे, तिचे किंचित नाक खरचटले तरी ह्यांनी दुसरी मूर्ती बनवली!!
त्याने न राहून परत प्रश्न केला, "ज्या मूर्तीला कोणीच पाहणार नाही त्या मूर्तीला थोडे खरचटले म्हणून तुम्ही दुसरी मूर्ती का बनवली? ही मूर्ती अशी पण १२ फुट उंच स्तंभावर राहील!! हिच्या नाकावर एक एकदम लहान scratch आहे हे कोणालाच माहित नाही पडणार!!! तरी???"
आता मात्र म्हातारा मूर्तिकार उठला आणि त्या संशोधकाच्या डोळ्यात डोळे घालून बोलला, "दुसऱ्यांना माहित राहणार नाही पण मला तर माहित राहील ना!!"
दुसऱ्यांना दाखविण्यासाठी नव्हे तर स्वतःला आतून चांगले वाटायला हवे म्हणून आपण काम करत राहिले पाहिजे.

जेव्हा आपण काही चुकीचे करतो तेव्हा ते करण्याअगोदर आजूबाजूला नक्की पाहतो परंतु "आपल्या आतल्या बाजूला" पाहायचे आपण विसरतो. ते हृदय, ते मन आपल्याला पाहत असते. आजूबाजूच्या वाईट वाटो किंवा नको पण आपल्याला आतून माहित असते आपण चुकीचे करतोय.

आयुष्यात समाधानी राहायचा मूळ स्त्रोत हाच आहे, "स्वतःशीच प्रामाणिक" व्हा. आपल्याला आतून वाटते काहीतरी एक, आपण बाहेर दाखवतो काहीतरी दुसरेच — हा लपाछपीचा खेळ एक दिवशी मोठ वादळाचे रूप घेतो. "Some people create their own storms, then get upset when it rains!"
आयुष्यात कोणतेही काम असो त्याला स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहून आपले हंड्रेड परसेंट त्याला द्यायचे. दुसऱ्यांना चांगले वाटले पाहीजे, त्यांना माझे काम भावले पाहिजे, त्यांनी मला लाईक करायला हवे, माझी वाहवाह करायला हवी म्हणून मी हे काम उत्कृष्टरित्या पार पाडेल असे करू नका. जर ह्याच मानसिकतेसोबत जगलात तर आयुष्यात कधीच समाधानी नाही होणार.
आयुष्यात खरे समाधान "पूर्ण प्रामाणिकपणे" काम करून त्यात "उत्कृष्टता (Excellence)" मिळवण्यात असते. हे आपण स्वतःसाठी करतो — दुसऱ्यांनी पाहायला हवे म्हणून नाही. समाधान तुम्हाला आतून येणाऱ्या भावनांनी मिळेल, त्याला बाहेरच्या जगात शोधू नका. कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी!! समाधान, आनंद आपण बाहेर शोधतो — जो बाहेर नाहीच त्याला शोधून काय उपयोग!!

Don't climb a mountain with an intention that the world should see you, climb the mountain with the intention to see the world. (जगाने तुम्हाला पाहायला हवे म्हणून पर्वताच्या शिखरावर जाऊ नका. पर्वताच्या शिखारवर ह्यासाठी जा कारण की तुम्हाला जग पाहायचे आहे!!)

दुसऱ्यांना ध्यानात ठेवून कर्म केलीत तर आपण "चांगले वाटतो थोड्या लोकांना!!"
परंतु आपले काही थोड्या लोकांना "चांगले वाटणे" बाकीच्यांना "चांगले वाटत" नाही.आणि इथून सुरु होतो संघर्ष! ह्या दुनियेशी आणि अधिक महत्वाचा तो म्हणजे "स्वतःशीच!!"

Circle Image

Bhagyashree Thorat

Student

During college time, I was not able to write any blog. But now during the pandemic time, I got a lot of free time to write blogs. Ira gave me a platform to share my blog. And helped me to learn any things