Jan 29, 2022
कथामालिका

विघातक भाग सात

Read Later
विघातक भाग सात


उठा उठा सकाळ झाली, ऑफिसला जायची वेळ झाली.. :   योगिता नेहाला  ( कॉल वर )
शी यार,
क्यू होती है सुबह
काश मुझे आराम मिले ऐसी मिले कोई जगह     :   नेहा" ओ बॉलीवूड शायर, चला आवरा.. उशीर झालाय आधीच.. काय तूपण यार सकाळ सकाळी विडिओ कॉल करून उठवायला लावतेस.. "   :  योगिता


" हा ते मला तुझा चेहरा बघून उठायचं असतं ना  "   :  नेहा


" तर तर आली मोठी.. जसं काय प्रेमात पडलीये माझ्या.. "    :  योगिता


"  मी नाय ग तो.. तो.. "  कोण तो माहीर का कोण.. "   :  नेहा


" माहीर नाही मल्हार.. "     :  योगिता


" अरे वाह.. नाव लक्षात ठेवलंय.. "     :  नेहा


" मॅडम.. आपण न्यूज रिपोर्टर आहोत.. भेटलेल्या माणसांची नावं लक्षात ठेवायला लागतात.. "    :  योगिता


" बरं.. तुझा टाइमपास झाला असेल तर उठ आणि आवर.. मी पाच मिनटात तुझ्या घराच्या खाली येतेय.. "    :   योगिता


" काय.. पाच मिनटं.. आवरते आवरते.. "     :    नेहाचला नेहाबाई आवरा.. बसने जायला लागलं तर मेकअप खराब होईल बसच्या लाईनमध्ये उभं राहून.. नको त्यापेक्षा आवरते पटकन..    :   नेहा स्वतःशीच बोलत आवरत होती.


दोघी स्कूटीवर असताना योगिताचा फोन वाजला.. तिने गाडी साईडला घेतली.. बघितलं तर कर्णिक सरांचा होता..


" गुड मॉर्निंग मिस योगिता "     :   मि. कर्णिक


"  गुड मॉर्निंग सर.. "         :   योगिता


" मिस योगिता, actually एक interview घ्यायचाय.. एका सेलिब्रिटीचा.. पण स्टुडिओत नाही.. त्यांच्या घरी जाऊन.. अंकुश रणदिवे असं नाव आहे सेलिब्रिटीचं.. त्यांना नुकताच एक मानाचा पुरस्कार मिळालाय.. त्यासंदर्भात ही मुलाखत आहे..


आता लगेच तुम्हाला तिथे पोहोचावं लागेल.. मी पत्ता मेसेज करतो.. "     :  मि. कर्णिक


" ओके सर.. "   :  योगिता


नेहा आणि योगिता लोकेशनवर पोहोचतात.. कॅमेरामनला नेहा फोन करते.. तो येईपर्यंत त्यांना बाहेर थांबणं भाग असतं..
थोड्या वेळाने कॅमेरामन आल्यावर दोघीही आत जातात.. खूप छान interview होतो..


नेहा आणि योगिता दोघीही त्या interview ने भारावून जातात..


" आपल्यालाही आपल्या कामासाठी असा अवॉर्ड भेटला पाहिजे ना.. "      :   योगिता


"  भेटेल भेटेल  "    :  नेहा


नेहाला एक कॉल येतो.. तिथे नेटवर्क मिळत नसतो म्हणून ती जरा साईडला जाऊन फोनवर बोलत असते..


आणि इकडे योगिता नेहाचा कॉल संपायची वाट बघत असते..
तोच तिचा हात हळुवारपणे कोणतरी पकडतं..

ती बघते तर समोर एक लहान मुलगा चिट्ठी घेऊन उभा असतो.. तो ती चिट्ठी योगिताच्या हातात ठेवतो.. आणि काहीच न बोलता निघून जातो.. योगिता त्याला थांबवायला त्याच्या मागे जाते पण तो सुसाट पळत गायब होतो..

योगिता चिट्ठी उघडून वाचायला लागते..


"  योगिता.. आय रिअली डोन्ट नो.. हे सांगायची ही वेळ, पद्धत आहे का नाही ते.. पण त्यादिवशी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून झोप उडालीये हो माझी.. ओढला गेलो तुमच्याकडे.. सतत तुमचा भास होतो.. Love at first site झालंय बहुतेक..

तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल.. उद्या इथे जवळच एक कॉफी शॉप आहे तिथे येऊन तुमचा निर्णय सांगा.. मी वाट बघेन.. "


खाली मल्हार असं लिहिलेलं असतं..


चिट्ठी वाचून योगिताच्या तळपायाची आग मस्तकात जाते..


नेहा तिच्या हातातून चिट्ठी खेचून घेते..


" आईशप्पथ योग्या.. सॉलिड आहेस तू.. डायरेक्ट प्रोपोज.. खतरनाक हा.. "    :  नेहा


गप्प बस हा तू.. एकतर हा मल्हार डोक्यात गेलाय माझ्या.. डायरेक्ट चिट्ठी पाठवतो म्हणजे काय.. आणि काय तर म्हणे love at first site.. Idiot.. उद्या बोलवलंय ना ह्याने..  थांब अशी वरात काढते ना ह्याची.. परत वाट्याला नाय गेला पाहिजे..


दोघी तिथून निघतात.. ट्राफिक जाम असतं.. पुढे कोणाचातरी accident झालेला असतो..

योगिता बाईक वरून उतरते आणि accident कुठे झालाय हे बघायला पुढे जाते..


खूप गर्दी जमलेली असते बाजूला.. एका ट्रकचा आणि कारचा accident झालेला असतो.. एक व्यक्ती तिथे खाली बेशुद्ध होऊन पडलेली असते.. योगिता नीट बघते तर तो मल्हारच असतो..

तीला काही समजत नाही.. ती चिट्ठी.. हा accident.. नुसता गोंधळ.. आपल्याला ह्याचा कितीपण राग आला असला तरी आता याला हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे.. ती त्याला घेऊन हॉस्पिटलला जाते..


काही वेळाने तो शुद्धीवर येतो..


" थँक यु.. योगिता.. "    :  मल्हार


" ती चिट्ठी तुम्ही पाठवली होतीत का??? "    :  योगिता


" हो.. कारण माझं खरंच प्रेम आहे तुमच्यावर.. मी चिट्ठी पाठवली आणि निघालो पण डोक्यातले विचार थांबत नव्हते.. तुम्ही वाचली असेल का चिट्ठी.. काय उत्तर असेल तुमचं.. आणि त्याच विचारात हा accident झाला.."      :   मल्हार


"तुमचं नशीब चांगलं म्हणून वाचलात नाहीतर जीव गेला असता.. "   :  योगिता


" हो तुमच्यामुळे माझा जीव वाचला.. "     :    मल्हार


योगिता तिथून काहीच न बोलता निघून जाते..


"  काय आहे हा माणूस.. चिट्ठी काय पाठवतो.. Accident काय होतो.. काय चालू आहे नेमकं.. "  :  ती स्वतःशीच बोलत असते..


ती घरी येते.. तर खूप सारे गिफ्ट्स असतात आजूबाजूला.. तीला आश्चर्य वाटतं..


ती आईला विचारते.. " आई कोणी आलं होतं का आपल्याकडे.. "


" अगं हो मल्हार आले होते.. "    :  योगिताची आई


"  योगिता.. चांगला माणूस वाटला गं.. माझी खूप आपुलकीने विचारपूस केली.. आणि तुझी कुठलीशी मुलाखत आवडली म्हणे म्हणून ह्या भेटवस्तु आणल्यायत..

तुम्ही ओळखता का ग एकमेकांना??? "      :  योगिताची आई


योगिता तेव्हा काही बोलत नाही पण आईचा प्रसन्न चेहरा बघून तिचा मल्हारवरचा राग काहीसा कमी होतो..
क्रमश :
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

✨️✨️❤️विश्वकांक्षिका ❤️✨️✨️

लिहायला आवडतं.. आवडतं म्हणण्यापेक्षा व्यक्त व्हायचंय.. आणि भावनांच्या बंधनातून मुक्त व्हायचंय..