Jan 29, 2022
कथामालिका

विघातक भाग एक

Read Later
विघातक भाग एक
" जरा फास्ट चालवा काका, उशीर झालाय आधीच "   :  योगिता

थोड्या वेळाने

" हा.. बस बस.. इथे साईडला घ्या.. "   :  योगिता


योगिता धावत ऑफिसला पोचली. तिचा आज interview होता..

2 - 3 तासांनी तिचा नंबर आला..

" मी आत येऊ का सर?? "   :  योगिता

" येस, प्लीज कम इन.. "   :  interview घेणारा

योगिता good morning sir बोलून समोरच्या खुर्चीवर बसली.

" Tell me about yourself.. "   :  interview घेणारा

" Good Morning Sir.. My name is योगिता सहस्त्रबुद्धे.. I have completed my Masters degree in Mass Media.. Frankly speaking, I don\"t have any एक्सपेरियन्स about this work but If you give me opportunity, then I will definitely make it golden one.. "    :  योगिता


" Nice "   :  interview घेणारा

" योगिता.. तुम्हाला पत्रकारच का व्हायचंय?? Any reason?? "   :  interview घेणारा


" मला thrilling गोष्टी आवडतात आणि पत्रकार होणं हे माझं स्वप्न आहे सर .. "   :  योगिता


" Very Nice योगिता.. I like your confidence.. You are selected for this post.. Congratulations.. "   :  interview घेणारा


" Thank you so much सर "   :  योगिता

योगिताचा आनंद गगनात मावत नव्हता.. ती मोठ्ठी smile करत तिथून बाहेर पडली.. तीला कधी एकदा ही बातमी तिच्या आईला देतेय, असं झालं होतं..

ती घरी आली तेव्हा तिची आई शिवणकाम करत होती.. तिने आईला दोन्ही हाताने धरलं आणि गोल गिरकी घेतली..

" अगं योगिता, थांब थांब.. सांग तरी काय झालंय ते??? "   :  योगिताची आई

" आई, मला नोकरी मिळाली.. उद्यापासून तुझी मुलगी टीव्ही वर दिसणार.. Reporter योगिता सहस्त्रबुद्धे.. "   : योगिताने स्वतःसाठीच टाळ्या वाजवत हे आईला सांगितलं..


" वा.. खूप छान बातमी दिलीस.. थांब देवापुढे साखर ठेवते.. "   :  योगिताची आई

दोघींनीही मनापासून देवापुढे हात जोडले आणि त्याचे आभार मानले.. योगिताचे बाबा गेल्यापासून घरचा आर्थिक भार तिच्या आईवर येऊन पडला होता.. म्हणून ती शिवणकाम करायची.. ते करूनच तिने योगिताचं शिक्षण पूर्ण केलं.. आणि त्याचं चीज झालं होतं..


" पुढे अजून बरंच काही घडणार आहे.. ये तो बस शुरुवात है.. हाहाहाहा हाहाहा "   :  अनोळखी व्यक्ती


क्रमश :
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

✨️✨️❤️विश्वकांक्षिका ❤️✨️✨️

लिहायला आवडतं.. आवडतं म्हणण्यापेक्षा व्यक्त व्हायचंय.. आणि भावनांच्या बंधनातून मुक्त व्हायचंय..