Jan 29, 2022
कथामालिका

विघातक भाग आठ

Read Later
विघातक भाग आठ


योगिता मल्हारला बघायला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला जाते.." योगिता, तुम्ही.. या ना.. "     :  मल्हार" कसं वाटतंय आता तुम्हाला.. "       :  योगिता" मच बेटर.. उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळेल.. "        :    मल्हार"  ग्रेट.. "         :   योगिता


 मल्हार स्मितहास्य करतो." बरं निघते मी.. "     :   योगिता


" थँक्स "       :  मल्हार" इट्स ओके "      :   योगिताती तिथून निघून ऑफिसला जाते.. पुढेही या ना त्या कारणाने तिची मल्हारशी भेट होत राहते.. ओळख वाढते तसा राग कमी होतो.. मैत्री होते छान.. आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी होतं ते तिलाही नाही कळत..


त्यांच्या भेटी वाढतात.. पण अजून स्पष्टपणे योगिताने मल्हारला आपलं त्याच्यावर प्रेम असल्याचं सांगितलेलं नसतं..तेवढ्यात तीला कसं कुठून कळतं की उद्या त्याचा वाढदिवस आहे.. ही गुड न्यूज द्यायला ह्यापेक्षा चांगला दिवस नाही भेटणार..


ती त्याला फोन करते.."  मल्हार, उद्या भेटूया कॉफी शॉपला..  "        :   योगिता


"  तू म्हणशील तसं.. "           :    मल्हार


दुसऱ्या दिवशी योगिता मस्त तयार होते.. आणि स्कूटीवरून कॉफी शॉपच्या दिशेने जायला निघते..


तीला मल्हारचा फोन येतो..


"  Where are you dear??  I am waiting here.. "  :  मल्हार


"  I am coming.. पाच मिनटात पोचते..   "      :  योगिता


ती कॉफी शॉप जवळ येते.. गाडी पार्क करत असते तोच तिच्या तोंडावर कोणीतरी काहीतरी फेकून जातं आणि क्षणात तिचा चेहरा काळा पडतो.. भाजून निघतो.. ती कितीवेळ तशीच तडफडत पडून राहते..


नंतर कोणीतरी येऊन तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतं..


ऍसिड फेकलेलं असतं तिच्यावर.. तिचं सौंदर्य, साजरं रूप क्षणात काळवंडून जातं.. झाल्या प्रकाराचा तीला खूप धक्का बसतो..


खूप त्रास होत असतो.. त्या वेदना जीवघेण्या वाटतात.. डॉक्टर surgery करतात.. योगिताची आई धावत हॉस्पिटलला पोहोचते.. बिचारी माऊली तीला काय करावं हेच कळत नसतं.. योगिताला अजून शुद्ध आलेली नसते..

क्रमश :
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

✨️✨️❤️विश्वकांक्षिका ❤️✨️✨️

लिहायला आवडतं.. आवडतं म्हणण्यापेक्षा व्यक्त व्हायचंय.. आणि भावनांच्या बंधनातून मुक्त व्हायचंय..