Login

वडिलांचे न कळलेले प्रेम...

वडिलांचे न कळलेले प्रेम... बडबड करणारी, गुणी, दिसायला देखणी छोट्याश्या गावात राहणारी अशी ही सुध

वडिलांचे न कळलेले प्रेम...

बडबड करणारी, गुणी, दिसायला देखणी छोट्याश्या गावात राहणारी अशी ही सुधा.  सुधा ही एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी. तिचे वडील व दोन काका त्या प्रत्येकाच कुटुंब, आज्जी, आजोबा असे हे १५ जणांचे कुटुंब. तिचे वडील गावातील नामांकीत व्यक्ती होते....त्यामुळे घरातील वातावरण पण कडक असायचं. सुधा ही घरातील मोठी मुलगी त्यामुळे तिच्यावरबंधने पण खूप होती....

एक दिवस सुधा तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती आणि तेथून यायला तिला वेळ झाला तिचे बाबा तिचीच वाट पाहत होते.....सुधा घरात येते तर पुढे तिचे बाबा बसले होते. बाबांना पाहून सुधा थोडी घाबरली....आता बाबा काय बोलतील या विचारातच ती पुढे येत  होती......

सुधा.........सुधाच्या बाबांनी तिला हाक मारली......बाबाचा आवाज येताच सुधा तिथेच थांबली.....

तुला यायला वेळ का झाला घरातले नियम माहित आहेत की नाही.....सुधाचे बाबा

बाबा ते आज मैत्रिणीचा वाढदिवस होता त्यामुळे  यायला वेळ झाला....सुधा थोड घाबरतच बोलली

वाढदिवस असो किंवा दुसर काही सातच्या आत घरात अल पाहिजे माहित आहे कि नाही तुला....सुधाचे बाबा थोडे चिडूनच बोलत होते.

हो बाबा ह्यापुढे अस नाही होणार....सुधा मान खाली घालून बारीक आवाजात सांगते.

बर जा आता आत...इथून पुढे वेळ करायचा नाही....सुधाचे बाबा

सुधा रडतच तिच्या खोलीत जाते....तिला रडताना पाहून तिची आई सुधाच्या मागे जाते 

बाळा रडू नको शांत हो....आई तिची समजूत काढत होती

 सगळी बंधने मलाच का बाकीच्यांना कोणी काहीच बोलत नाही अगदी बाबा सुद्धा.... मलाच का सगळी बंधने.....कुठे गेल कि सातच्या आत घरी अल पाहिजे, बाहेर जास्त कोणाशी बोलायचं नाही, सगळी काम करायची, कपडे असलीच घालायची....का आई..... का माझ्यावरच का सगळी बंधने....सुधा रडत बोलत होती

बाळा तू घरात मोठी आहेस ना....तू जस वागशील तस तुझ्या बहिणी तुझे भाऊ वागणार ना त्यामुळे तुला व्यवस्थित वागायला हवं ना.....

पण मीच का आई...मी मोठी आहे ह्यात काही माझी चूक आहे का...मलाही बाकीच्या मुलींसारख रहावस, वागवस वाटतच ना ग ....बाबांचं बाकीच्या सगळ्यांच्यावर प्रेम आहे पण माझ्यावरच नाहीये....

अस नाहीये बाळा तुझा गैरसमज होतोय वडिलांचं सगळ्यांच्यावर सारखच प्रेम असत फक्त ते कधी दाखून देत नाहीत ....बाळा आई आपल प्रेम आपल्या मुलांच्या जवळ व्यक्त करत असते ग पण बाबा कधी नाही करत ते न बोलताच जास्त प्रेम करतात कदाचित माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतात तुझे बाबा आणि बाळा आजकाल वातावरण चांगल आहे का सांग...त्यामुळे बाबा तसे वागतात...समज तुझ्याकडून काही चूक झाली तर गावात तुझ्याबाबांचं नाव खराब होईल कि नाही...मग ते तुला आवडेल का....आई

नाही आवडणार म्हणून तर सगळ गप्प सहन करते ना....पण बाबांच माझ्यावर प्रेम नाही हे तितकच खर आहे....एवढ बोलून सुधा बाहेर निघून जाते.....

पोरी तुला कस सांगू ग...खरच खूप जीव आहे तुझ्या बाबांचा तुझ्यावर.....सुधाची आई डोळ्यात पाणी आणून बोलते

माधवा पोरीच लग्नाचं वय झालया...तिच्या लग्नाच बघाया हवं आता....सुधाची आज्जी सुधाच्या वडिलांना सांगत असते

सुधा व तिची बहिण पलीकडच्या खोलीतच बसल्या होत्या त्यामुळे त्यांच्या कानावर हे पडत....

हो आई माझ्या पण मनात विचार येऊन गेला हा....आपल्या भटजींना, आपल्या जवळच्या पाहुण्यांना वगेरे बोललो आहे एखाद चांगल स्थळ असेल तर सांगा म्हणून ते सांगतो बोलले आहेत....

बर केलास बाबा वेळच्या वेळी लग्न झालेलं बर असत....सुधाची आज्जी

सुधा व तिची बहीण बाजूच्याच खोलीत होत्या त्यामुळे त्यांच्या कानावर सगळ पडत.....

ताई आता तुझ लग्न होणार वॉव किती मस्त ना....सुधाची बहिण

लग्न होईल हे चांगलच आहे ग पण मुलगा..... ती लोक...ते घर.. तुला पसंद आहे का हे सुद्धा विचारणार नाहीत मला.... बाबांना पसंद आल की करून टाकतील माझ लग्न....सुधा तोंड पाडून बोलते

ए ताई अस का ग बोलतेस बाबा अस का करतील....माझ्या बाबतीत असच आहे.... बग कि तू हे असच होणार आहे....एवढ बोलून सुधा तिच्या खोलीत निघून जाते

माधवराव येऊ का.....अरे दत्ताजी या या तुमचच घर आहे या ना.....    

काय म्हणता तब्बेत वगेरे आहे ना ठीक काम वगेरे कस चालू आहे....सुधाच्या बाबांचे मित्र

सगळ ठीक आहे....माधवराव

आज येण्याच कारण म्हणजे तुमच्या मुलीसाठी एक स्थळ घेऊन आलो आहे....मित्र

अरे हो का.....माधवराव

हो ना...सगळ चांगल आहे बघा मुलगा चांगल्या नोकरीवर आहे...मोठा बंगला आहे....शेती पण आहे भरपूर मोठी पार्टी आहे बघा .... मग काय म्हणता बोलावायच का पाहुण्यांना... मित्र

सगळ चांगल तर आहे.....मग येवू देत कि पाहुणे...सुधाचे बाबा

मग उद्याच बोलावू का कशाला वेळ घालवायचा...मित्र

हो चालेल कि बोलवा त्यांना उद्या....सुधाचे बाबा

हे सगळ कळल्यावर सुधाची आई सुधाला येऊन सांगते.....पण सुधा थोडी अस्वस्थ होते तिचा चेहरा पडतो

ते पाहून तिची आई तिला विचारते ....काय झाल ग असा का चेहरा केली आहेस....

मोठ घरान आहे म्हटल्यावर बाबा लगेच लग्नाला तयार होतील...मला मुलगा पसंत आहे का हे सुद्धा विचारणार नाहीत....सुधा

आग अस का म्हणतेस...ते तुझे वडील आहेत तुझे शत्रू नव्हे अस वागायला.....सुधाची आई

शत्रू असल्यासारखच तर वागतात...सुधा

अग...........आई पुढे काही बोलणार इतक्यात सुधा बोलते

आई मी झोपणार आहे आता मला काहीच बोलायचं नाही जा तू अस बोलून सुधा झोपून टाकते

दुसरा दिवस उजाडतो....पाहुणे घरी येतात बघाबघीचा कार्यक्रम पार पडतो....घरात चर्चा सुरु असते कसा वाटला मुलगा, बाकीचे लोकं कशी वाटली....पण सुधाला मुलगा पसंद नव्हता ती चेहरा पडून बसली होती आता घरचे ह्या लग्नाला तयार होतील अस तिला वाटत होत...

तितक्यात तिची बहिण तिथे येते.....ताई तुला मुलगा आवडला का ग..... 

नाही आवडला.....पण घरचे ऐकणार आहेत होय माझ ...

ए ताई तू नको काळजी करू तुला आवडला नाही ना मग होत नाही तुझ लग्न त्या मुलाशी...बहिण

तुला काय माहित असच होईल ते...सुधा

मी म्हणतेय म्हणून होणार नाही...बहिण

अस झाल तर बरच होईल...सुधा

सुधाच्या बाबांना हे स्थळ फारस आवडल नाही त्यामुळे त्यांनी नकार कळवला...

सुध्याच्या बहिणीला कळल्यावर ती पळत येऊन सुधाला सांगते

खरच..सुधा  खूप आनंदी होते बग ताईडे मी बोलले होते ना तसच झाल

एक झाल्यावर एक स्थळ येतच होती सुधाला आवडल नसल कि ती बहिणीला बोलायला लावायची सुधाला वाटत होत कि बहिण हे लग्न होत नाही म्हंटल्यावर होत नाही....असेच सहा महिने गेले

परत एक स्थळ सुधाला पाहायला आल...पण ह्यावेळी मात्र सुधाला मुलगा बाकीच सगळच आवडल होत

नेहमीप्रमाणे सुधाची बहिण तिला विचारायला आली...

मग ताई आवडला का मुलगा.....सुधा थोडी लाजतच हो म्हणते

ताईडे तुला आवडल आहे ना मग हे लग्न होऊन जाईल बग तू....सुधाची बहिण एकदम आत्मविश्वासाने बोलली....

तुला काय माहित ....सुधा

आग तूच म्हणतेस ना मी बोलले की सगळ तसच होत....बहिण

हो आजपर्यंत तर तसच होत आल आहे...पण आता बघू काय होत .....सुधा

पाहुणे गेल्यानंतर सगळे हॉल मध्ये एकत्र बोलत बसतात घरातल्यांना मुलगा घरचे सगळे पसंत पडतात....सुधाचे बाबा पाहुण्यांना पाहायला बोलवायच्या आधीच त्यांची चौकशी करून बोलवत असत त्यामुळे आता सगळ्यांना पसंत आहे.....पाहुण्यांना निरोप दिला जातो..व पुढची बोलणी होते चांगला दिवस बघून साखरपुडा पार पडतो पुढे आठ दिवसातच लग्नाची तारीख असते...त्यामुळे सगळे जोमाने तयारीला लागतात....

ए ताई तू गेल्यावर आम्हाला अजिबात करमणार नाही….तुझी खूप आठवण येईल..... आई बाबा घरातील सगळे खूप रडतील....बहिण

आई व घरातले रडतील पण बाबा रडतील अस नाही वाटत मला....सुधा

ए ताई अस का ग म्हणतेस...तुला वाटत तेवढे बाबा वाईट नाहीत ग....बहिण

कस आहे ना बाळा आजपर्यंत तुला कधी मन मरव लागले नाही, तुला कसले नियम पाळावे लागले नाहीत म्हणून तुला अस वाटत....सुधा

दोघी बहिणीच बोलन त्यांची आई ऐकत होती पण सुधाच अस बोलन ऐकल्यावर त्या रूममध्ये आल्या....सुधा......म्हणून त्या जोरात ओरडतात....आईचा आवाज ऐकुन दोघीजण मागे बघतात. सुधा काय बोलतेयस.... तूला स्वतःच्या वडिलांच्या बद्दल अस बोलताना काहीच कस वाटत नाही....तुला वाटत तेवढे तुझे बाबा वाईट नाहीत....कस समजवायचं तुला....तुझ लग्न ठरल्यापासून ते शांत शांत आहेत हे जाणवल नाही का ग तुला......आई

लग्न कस करायचं ह्याची काळजी असेल....बाकी काही नाही ....सुधा

सुधा आता तर तू कहरच केलीस.....एवढा कडवटपणा ते ही आपल्या वडिलांच्या बद्दल....आता तू अस म्हणत आहेस ना...लग्नानंतर तुला बापाची किंमत कळेल आणि हो लक्षात ठेव  सासरी जाताना सगळ्यात जास्त तू बाबांच्या गळ्यात पडून रडशील....माझे शब्द लक्षात ठेव.....एवढ बोलून तिची आई तेथून निघून जाते....

बघता बघता लग्नाच्या तयारीत दिवस कधी निघून गेले कळलेच नाही. लग्न उद्यावर येऊन ठेपल... सकाळी सगळ्यांनाच लवकर उठायचं होत  त्यामुळे सगळेच आवराआवरी  करून झोपी गेले....पण सुधाला काही केल्या झोप लागत नव्हती तिला सतत आईने बोललेलं आठवत होत....तिला बालपणीच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या...तिला काही केल्या झोप लागेना ती उठून बाहेर आली आपल्या घराला डोळे भरून पाहू लागली उद्या पासून आपण ह्या घरची पाहुणी होणार ह्या कल्पनेनेच तिचे डोळे भरून आले....घरभर फिरून सगळ्या आठवणी मनात साठवत होती. असाच फिरत असताना कोणाच्या तर बोलण्याचा आवाज तिला आला....अजून कोण जाग आहे सगळे तर झोपलेत...बघते कोण आहे.....सुधा जाऊन बघते तर तिची आज्जी आणि तिचे बाबा बोलत बसले होते....सुधा खिडकी जवळ राहून त्याचं बोलन ऐकत होती....

सुधाचे बाबा त्यांच्या आईशी बोलत होते......आई आपली सुधा कधी मोठी झाली कळलच नाही ग.....डॉक्टरांनी तिला पहिल्यांदा माझ्या आहात दिल होत तेव्हा तिचे नाजूक हात, एवढेसे पाय....ते सुखच वेगळ होत ग......पहिल्यांदा बाबा होण्याच सुख दिल होत ग माझ्या मुलीन....माझी लक्ष्मी आली होती ग घरी....हे सर्व बोलताना त्यांचे डोळे भरून आले होते.....पण जशी ती मोठी होत गेली.....तस तिला बंधनात अडकवत गेलो....तिला बाकीच्या मुलींसारख मोकळेपणाने बाहेर कुठे फिरू दिलो नाही...कायम तिला बंधनात ठेवलो...तिच्या मनात कायम माझ्या बद्दल भीती वाटत राहिली.....प्रेमाने कधी जवळ सुद्धा घेत नाही ग आई.....

पण काय करू ग आई आजकालच वातावरण इतक बिघडलेलं...आपल्या लेकीच्या बाबतीत असल काही घडू नये ह्यासाठी मी अस वागत राहिलो....पण पोरीन कधी भ्र शब्द सुद्धा काढला नाही जस म्हणल तर वागत राहिली कधी उलट सुद्धा बोलली नाही....माझी लेक आता माझ्या डोळ्यासमोर नसेल....मी जशी काळजी घेत होतो तशी काळजी घेतील ना ग ते…..माझ्या लेकीला आजपर्यंत फुलासारखं जपत आलोय तस ते जपतील का.....अस बोलून तिचे बाबा आईच्या गळ्यात पडून रडू लागले.....

वडिलांची ही बाजू बघून सुधाला रडू आवरेना आपण किती चुकीच समजत होतो बाबांना....बाबा तर माझी खूप काळजी घ्यायचे..माझ्यावर प्रेम करायचे....आपल्या वागण्याचा विचार करून सुधा रडू लागली...ती रडत असताना मागून कोण तर तिच्या खाद्यावर हात ठेवला...मागे वळून बघते तर तिची बहिण आणि आई होत्या......

ताई तुला एखाद स्थळ पसंद नसल तर म्हणायचीस ना.... कि तू होणार नाही अस म्हणत जा म्हणजे त्या मुलाशी माझ लग्न होणार नाही....पण तस नव्हत ग ते.....मी तुला विचारायला येत होते बग तुला मुलगा पसंद आहे का....तर ते मला बाबांनी विचारायला सांगितल होत...ते प्रत्येक स्थळाला मला विचारायला सांगत होते तुला पसंद असेल तरच पुढे जायचं अस बाबांनी सांगितल होत...तू बाबांना घाबरत होतीस ते विचारले तर तू घाबरून त्यांना व्यवस्थित सांगणार नाहीस म्हणून त्यांनी मला विचारायला सांगितल होत...आणि हे बाबांनी मला सांगायचं नाही अस सांगितल होत त्यामुळे मी तुला काहीच बोलले नाही...तू समजत होतीस तेवढे बाबा वाईट नव्हते ग...त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे....

बग बाळा मी तुला सांगत होते ना कोणताही बाप बोलून दाखवत नाही ग सगळ....त्यांच्या वागण्यातून त्यांच्या डोळ्यात पाहून ओळखाव लागत....आई

हे सगळ ऐकुन सुधाला रडू आवरेना ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली..तिचा रडतेला आवाज ऐकुन तिचे बाबा आणि आज्जी बाहेर येतात

सुधा काय झाल बाळ का रडतेयस...सुधाचे बाबा विचारतात

बाबाच्या तोंडात बाळ ऐकल्यावर सुधाला आणखीन भरून आल...ती पटकन बाबाच्या खुशीत शिरली...बाबा मी चुकले..मी तुम्हाला चुकीच समजत होते.....खरच चुकले बाबा मला माफ करा...सुधा रडत माफी मागत होती....तिच्या बाबांना काहीच कळेना ही अशी का बोलत आहे...त्यांनी डोळ्यांनी खुणवून तिच्या आईला विचारल...तिने ही नंतर सांगते अस डोळ्यानीच खुणवून सांगितल.....

बाळा रडू नकोस शांत हो उद्या लग्न आहे कि नाही तुझ..... मग उद्या सुंदर दिसायला हवीस कि नाही...सुधा मानेनेच होकार देते....जा बाळ शांत झोप जा लवकर उठायचं आहे ना उद्या..जा......

हो बाबा....सुधा व तिची बहिण त्यांच्या खोलीत निघून जातात.....पाठमोऱ्या सुधाला पाहून बाबांच्या डोळ्यात पाणी आल....पण त्यांनी स्वतःला सावरल....चला सगळेजण झोपुया लवकर उठायचं आहे ना....

दुसर्या दिवशी सुधाच लग्न एकदम थाटामाटात पार पडल पाठवणीची वेळ आली सुधा सगळ्यांचा निरोप घेऊन आई बाबांच्या जवळ आली.....सुधा बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली...बाबा माझ काही चुकल असेल तर मला माफ करा.....शांत हो बाळा तुझ काही चुकल नाही आणि तू कधीच चुकली नाहीस कळल....मनात काही न ठेवता तुझ्या सासरी जा...सुखाचा संसार कर.....

त्यानंतर सुधा आईच्या गळ्यात पडून रडू लागली.....आई तू म्हणत होतीस ते खर आहे....

काय बाळा....आई

वडिलांचे प्रेम कधीच दिसत नाही ते समजून घ्याव लागत...!!!!

सुधाची पाठवणी झाली घर एकदम शांत सूनसून वाटत होत.....प्रत्येक वडील आपल्यावर प्रेम करत असतात माया करत असतात पण त्यांना ते व्यक्त करता येत नाही.....आपणच त्यांना समजून घ्याव लागत....हो ना...तुम्हाला काय वाटत....    

***

(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा कोणाशी सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....