लग्न सुख की शाप
निरागस, सुंदर, अबोल स्मिताच नुकतच कॉलेज पूर्ण झाल होत. कॉलेज पूर्ण झाल्यावर तीने एखादी चांगली नोकरी करायची ठरवली होती. तसे तिने प्रयन्त सुद्धा सुरु केले होते आणि तिला चांगल्या नोकरीची ऑफर सुद्धा आली. तिला खूप आनंद झाला होता कधी एकदा ही गोड बातमी आई बाबांना जाऊन सांगते अस तिला झाल होत. ती घरी आल्यावर आई बाबांना शोधत होती ते दोघे कुठे दिसेनात म्हणून ती त्यांना हाक मारू लागली आई, बाबा कुठे आहात तुम्ही मला तुम्हाला काही तरी सांगायचं आहे या ना लवकर ....
स्मिताचा आवाज ऐकुन तिचे आई बाबा रूम मधून बाहेर येतात. स्मिताची आई बाहेर येत येतच बोलते अग काय झाल एवढ ओरडायला....स्मिता धावतच आईकडे जाते आई आई खूप आनंदाची बातमी आहे....
आनंदाची बातमी..... ती कोणती स्मिताचे बाबा आनंदाने विचारतात. स्मिता कौतुकाने बाबांच्याकडे जाते....बाबा मला जॉब मिळाला. काय सांगतेस खरच खूप गोड बातमी आहे. स्मिताचे बाबा आनंदाने बोलतात. हो ना किती गोड बातमी आहे थांबा मी साखर आणते अस बोलतच स्मिताची आई साखर घेऊन येते व स्मिताच तोंड गोड करते....अशीच प्रगती करत रहा स्मिताचे बाबा स्मिताला आशीर्वाद देत बोलतात.
केव्हा पासून जाणार आहेस स्मिताची आई कौतुकाने विचारते. आई सोमवार पासून जाणार आहे अग मग २-3 दिवसच राहिले की.....हो ग आई केव्हा एकदा सोमवार येतो असे झाले आहे स्मिता आईला मिठी मारत बोलते.
२–3 दिवस कधी गेले कळलच नाही.....ए आई आवर ना ग पटकन डबा दे नाहीतर मला वेळ होईल....पहिल्याच दिवशी ओरडा खायला लावणार आहेस का ....अग बाई मी का ओरडा खायला लावू तुला.......हा घे तुझा डबा....स्मिताची आई स्मिताकडे डबा देत बोलते.....ए आई मी पळते हा नाही तर वेळ होईल मला.....अग काय वेळ होईल घड्याळ बग एकदा किती वाजलेत अजून १ तास आहे. तु एवढ्या लवकर जाऊन काय करणार आहेस....स्मिताची आई कपाळावर हात मारत बोलते.
अग हो की मी पहिलेच नाही....बर असुदे आज पहिला दिवस आहे ना मग जाते लवकर......किती तो उत्साह जा बाई जा तुला गेल्याशिवाय करमणार नाही स्मिताची आई हसत बोलते.....
बघता बघता १५ दिवस कधी गेले कळेच नाही....स्मिताची आई व शेजारच्या वहिनी हॉल मध्ये बोलत बसल्या होत्या व अचानक स्मिताच्या आईच्या चुलत भावाचा म्हणजेच स्मिताच्या चुलत मामाचा फोन आला. अरे दादाचा फोन थांबा हा वाहिनी माझ्या भावाचा फोन आहे.....हा बोल दादा.....अग मी स्मितासाठी एक स्थळ काढले आहे. मुलगा चांगला आहे. जॉब पण चांगला आहे. शेतीवाडी पण भरपूर आहे. घरात पण मोजकीच माणसे आहेत.... सगळ चांगल आहे....
हो का...... हे बाहेर गेलेत दादा... हे आले ना की ह्यांच्याशी बोलून तुला सांगते... स्मिताची आई
हो चालेल पण विचार करा सगळ चांगल आहे पोरीच कल्याण होईल ..... स्मिताचे मामा
अरे हो रे दादा तुला कळवते की.....एवढे बोलून स्मिताची आई फोन ठेवते.
स्मिताला स्थळ आल आहे वाटत त्यांची शेजारची वहिनी विचारते....हो वाहिनी सगळ चांगल आहे म्हणत होता दादा.....अहो चांगल असेल तर करून टाका मग हातच स्थळ कशाला घालवता...होय हो ह्यांना सागायचं आहे ना अजून अस बोलत होत्या तेवढ्यात स्मिताचे बाबा घरी आले.
अहो आलात तुम्ही या बसा ना मला तुमच्याशी बोलायचं आहे....एवढ काय बोलायचं आहे बोला.....अहो दादा ने स्मितासाठी स्थळ काढल आहे सगळ चांगल आहे....तू वेडी आहेस का....आत्ता कुठे स्मिताला जॉब लागला आहे तिची जॉब करायची इच्छा आहे. तिला इतक्यात लग्न करायचं नाहीए कळल मग हा विषय बंद अस बोलून स्मिताचे बाबा रूम मध्ये निघून जातात.
स्मिताचे बाबा रूम मध्ये गेल्यानंतर शेजारच्या वाहिनी बोलतात... अशा चांगल्या स्थळाला नाही बोलणार तुम्ही??? वहिनी मग काय करायचं.... हे नाहीच म्हणत आहेत की.....अहो वाहिनी मग समजून सांगा ना त्यांना अशी चांगली स्थळ आजकाल मिळतात का कुठे तुमच्याकडे स्वतःहून स्थळ चालत आल आहे आणि अशा चांगल्या स्थळाला नाही बोलणार होय.....आणि महत्वाच म्हणजे तुमच्या भावाने हे स्थळ काढल आहे त्याला नाही बोललात तर तो दुखावेल आणि तुमचे माहेर चे हि दुखावतील. अशाने तुमचे माहेर तुटायला नको. बगा मग काय करता... मी निघते आता...... खूप वेळ झालाआहे घरचे वाट पाहत असतील...
शेजारच्या वहिनी गेल्यानंतर स्मिताची आई एकटीच विचार करत बसते. ह्यांना कसे समजावू आता ... स्मिताच चांगल होईल... कस ह्यांना पटवून देऊ.... आणि शेजारच्या वहिनी म्हणत होत्या तस ह्या स्थळाला नाही म्हणालो आणि दादा दुखावला तर... माहेरचे सगळे दुखावले तर... अशाने माहेर तुटले तर....
स्मिताची आई आपल्या विचाराने भानावर येते ... नाही नाही ... ह्यांना काहीही करून पटवून द्यायला हवं .... स्मिताची आई तोंडातल्या तोंडात पुटपुटते... एकटीच काय बडबडत आहेस स्मिता आत येत बोलते...
आलीस का तू ……..हो आले
कसा होता आजचा दिवस......स्मिताची आई आपल्या विचारातून बाहेर येत बोलते
आई खूपच मस्त होता खूपच छान वाटत होत....स्मिता
हो का तुला आवडल ना तू खुश आहेस ना मग झाल .......स्मिताची आई
हो ग आई मी खूप म्हणजे खूप खुश आहे .....स्मिता
स्मिताच्या आईच्या डोक्यात त्या स्थळाचाच विचार होता तिने भावाला सागून काही दिवस बोलणी पुढे ढकली होती .......बघता बघता एक महिना कसा गेला कळलच नाही.......पण ह्या दिवसात ती स्मिताच्या बाबांना सतत जाणवून देत होती कि आता स्मिताच लग्न करायला हव सध्याची आजूबाजूची परिस्थिती चांगली नाही चांगली मुले सहजा सहजी मिळत नाहीत....त्यामुळे स्मिताचे बाबा त्या दृष्टीकोनातून विचार करू लागले होते...आणि हे स्मिताच्या आईच्या लक्षात येत होत हीच संधी साधून तिने आज स्मिताच्या बाबांशी बोलायचं ठरवले.....
थोड्या वेळात स्मिता ऑफिसला गेली स्मिता गेलेली बघून तिने स्मिताच्या बाबांशी बोलायचं ठरवल व ती त्यांच्या रूममध्ये गेली . स्मिताचे बाबा मोबाईल मध्ये काही तर पाहत हसत होते त्यांचा मूड चांगला आहे हे पाहून त्या बोलायला जातात.
अहो ऐकलत का ........ स्मिताची आई
हा बोल मी ऐकत आहे.... स्मिताचे बाबा
मला तुमच्याशी थोड बोलायचं आहे....स्मिताची आई
कशाबद्दल..... स्मिताचे बाबा
स्मिताच्या लग्नाबद्दल...हे बघा तुम्ही चिडू नका माझ पहिला व्यवस्थित ऐकुन घ्या.....हे बघा आता आपल्या स्मिताच्या लग्नाच वय झाल आहे तिच्या बरोबरच्या मुलींची लग्न होऊन त्यांना मुलं सुद्धा झाली आहेत....आणि आजकालची परिस्थिती तर तुम्हाला माहितच आहे आजकाल चांगली मुलं मिळण कठीण झाल आहे....आणि तुम्ही तिच्या नोकरीच म्हणालात तर ती काय लग्ननंतर पण करू शकते ना ती...हवं तर आपण तस सांगुया मुलांकडच्यांना ते काय नाही बोलणार आहेत का.... काय वाटत तुम्हाला....
अग हो तुझ सगळ बरोबर आहे पण तशी स्थळ पण यायला हवीत ना...स्मिताचे बाबा
माझ्या बघण्यात आहे एक स्थळ.....स्मिताची आई
कोणत......स्मिताचे बाबा
अहो महिन्या पूर्वी दादाने एका स्थळाच सांगितल होत पहा....ते स्थळ पाहूया ना सगळ चांगल आहे म्हणे त्या मुलाच .....हवं तर मी दादाशी बोलते...... तो काय नाही बोलणार नाही...स्मिताची आई थोड दबकूनच बोलते...
अग पण त्या मुलाच लग्न झाल असेल तर....स्मिताचे बाबा
अहो मी विचारते तर आधी झाल नसेल तर बोलूया आपण ...थांबा मी लगेच फोन करते दादाला.....अस बोलत स्मिताची आई लगेच फोन करते
हेल्लो दादा....अरे ते मागच्यावेळी तू एका स्थळा बद्दल सांगितला होतास बग त्या मुलाच लग्न झाल का....स्मिताची आई
आग नाही अजून....दादा
हो का... अरे ते आम्ही स्मितासाठी पहायचं म्हणत होतो....स्मिताची आई
झाल का तुमच फायनल .....दादा
हो झाल तू बोलतोस का त्यांच्याशी .......स्मिताची आई
अग बोलायला कशाला हवं त्यांना आपली स्मिता पसंदच आहे ते केव्हा ही यायला तयार आहेत...दादा
हो का....मग ह्या रविवारीच येवू देत की मग.....स्मिताची आई
बर बर चालेल तस मी सांगतो त्यांना ....ठेवतो आता फोन.....दादा
हो चालेल ......अहो ते रविवारी येणार आहेत...स्मिताची आई
अग काय हे आपण अजून स्मिताशी बोलणार आहोत आणि तू त्यांना सांगून पण टाकलीस.....बाबा
ते काय तुम्ही सांगा आज तिला समजून तुमच ऐकते ती...चला मी तयारी करते परवा दिवशीच रविवार आहे
स्मिताला हे सगळ कळल्यावर नाराज झाली...पण बाबांनी व्यवस्थित समजावून सांगितल्या नंतर ती तयार झाली.....
अहो ऐकलत का पाहुणे पाच मिनिटात येतील दादाचा फोन आला होता...अरे हे काय आलेच पाहुणे स्मिताची आई दरवाज्याकडे हात करत बोलते.....
या या ....बसा मंडळी......घर शोधायला काही त्रास झाला नाही ना....स्मिताचे बाबा
अहो नाही नाही......स्मिताचे मामा होतेच की....पाहुणे
सगळा पाहुणचार झाल्यावर स्मिताला बाहेर बोलवतात रितीभाती प्रमाणे मुलीला प्रश्न विचारतात.....सगळ झाल्यावर स्मिता आत जाते...
आम्हाला मुलगी पसंद आहे....तुमच मत काय आहे पाहुण......पाहुणे मंडळी
थोडा वेळ द्या मुलीशी बोलायला हव तिला पसंद आहे का ते पाहायला हवं...आणि मुलीला आमच्या जॉब करायची इच्छा आहे....तुम्हाला चालेल का.....
हो हो चालेल आम्हाला काहीच अडचण नाही.....मुलाची आई
बर मग मी तुम्हाला संध्याकाळ पर्यंत निरोप कळवतो...स्मिताचे बाबा
हो हो चालेल....बर आता आम्ही निघतो....नमस्कार ...पाहुणे मंडळी
पाहुणे गेल्यानंतर सगळे हॉल मध्ये बसतात....स्मिता तुला मुलगा पसंद आहे का...तुझा होकार असेल तर आपण पुढे जाऊ....स्मिताचे बाबा
स्मिता थोडी लाजतच होकारार्थी मान डूलवते....स्मिताची पसंती आल्यावर सगळेच खुश होतात.......
मला पण मुलगा माणसे चांगली वाटली पण त्यांची थोडी चौकशी करायला हवी ना...कसे आहेत की ते पाहायला हवं.....स्मिताचे बाबा
कशाला चौकशी करायला लागते दादाने काढले आहे म्हणजे चांगलेच असेल ना...तुम्ही चौकशी करून त्याच्यावर अविश्वास दाखवणार आहात का.... काही चौकशी करायची नाही पाहुण्यांना निरोप कळून टाका....स्मिताची आई
स्मिताच्या आईच्या अश्या बोलण्यामुळे चौकशी न करता पाहुण्यांना निरोप कळवला जातो...आणि बघता बघता लग्नाची तारीख ठरते.....आणि थोड्याच दिवसात स्मिताच थाटामाटात लग्न पार पडत....
लग्ननंतर स्मिताच्या सासरचे स्मिताशी खूपच छान वागायचे तिची मुलीसारखी काळजी घ्यायचे...स्मिता सुद्धा त्यांना कधी दुखावत नव्हती....स्मिताचा नवरा सुधा दिसायला खूप छान होता तो ही स्मिताशी प्रेमाने वागायचा तिला काही कमी पडू द्यायचा नाही...
आपली लेक सुखात आहे म्हणून स्मिताचे आई बाबा सुद्धा समाधानी आनंदी होते....
बघता बघता लग्नाला महिना झाला..... स्मिताला जॉब करायचा होता ती तिच्या नवऱ्याच्या मागे लागली होती पण तो काही मनावर घेत नव्हता शेवटी स्मिता घरात सासू सासऱ्याना नोकरी बद्दल बोलायचं ठरवते....तिचा नवरा गेल्यानंतर ती तिच्या सासूशी बोलली पण सासूबाई आता लगेच नको थोडे दिवस जाऊ देत म्हणून सांगते...स्मिता आणखीन थोडे दिवस थांबायच ठरवते पण कोणीच तिच्या नोकरी बद्दल मनावर घेत नव्हते.....स्मिता सारखी सगळ्यांच्या मागे लागायची...थोड्या दिवसांनी सगळ्यांच्याच वागण बदलत चालल सासू साध्या गोष्टी वरून बोलायला लागली नवरा सुधा त्याची आई जे बोलेल तेच खर अस वागायचा.....
स्मिताची सासू आता तिला त्रास देऊ लागली जास्त काम लाऊ लागली आई वडिलांवरून बोलू लागली....व्यवस्तीत जेवायला सुधा देत नसायची.....स्मिताने नवऱ्याला सांगितले तर तो तिलाच ओरडायचा तूच काही तरी अगावपणा करत असशील त्याशिवाय आई अस करणार नाही.....स्मिताला खूप त्रास होऊ लागला होता पण हे सगळ घरी सांगूही शकत नव्हती तिला तिच्या बाबांची काळजी वाटायची त्यांना हे सगळ कळल तर त्यांना काही तरी होईल म्हणून ती हे सगळ सहन करायची
स्मिता तोंड दाबून मुक्याचा मार खात होती......थोड्या दिवसात स्मिताला दिवस गेले घरात गोड बातमी आली....स्मिताने घरी सांगितले तसे सगळे आनंदी झाले.....हे कळल्यावर पारत सगळे स्मिताशी चांगले वागू लागले.....स्मिताला वाटल आता तर सगळ ठीक होईल त्यामुळे ती आनंदी होती बघता बघता पाच सहा महिने कधी गेले कळलच नाही सगळ सुरळीत सुरु होत स्मिताला गुलाबजामून खायचे डोहाळे लागले होते...ती तिच्या सासूला जाऊन सांगते.....स्मिताच्या तोडुन गुलाबजाम ऐकताच सासू तिच्यावर खवळली......तुझ्या बाबाने काय इथे पैशाचे गाठोडे दिले आहे का....गुलाबजाम आणायला.......सासूचे बोलणे ऐकुन स्मिताच्या सहा महिन्यापूर्वीचा तिला देणारा त्रास आठवला आणि ती सासूकडे पाहायला लागली....
अशी काय पाहत आहेस तुला काय वाटल तुज्याशी सगळे गोड बोलत आहेत म्हणजे आता सगळ तुझ्या मनासारखं होईल....पाच सहा महिने जपायचं असत म्हणून तुझ्याशी प्रेमाने बोलत होतो......आता जे काही शिळपाक आहे ते खाऊन टाक आणि गप त्या कोपऱ्यात जाऊन पड....अस बोलून तिची सासू निघून जाते....सासूचे असे वागणे पाहून स्मिताला शॉकच बसला तिला वाटत होते कि आता सगळे सुरळीत पार पडेल पण तिहा हा भ्रम होता तो आत्ता तुटला......तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले.....डोळ्यासमोर परत अंधार दिसू लागला .....
स्मिताला सातवा महिना लागल्यावर स्मिताचे आई बाबा स्मिताला त्यांच्याकडे घेऊन गेले.......माहेरी आल्यावर आई बाबा ताब्बेत्तीची चौकशी करू लागले एवढी खराब कशी झाली आहेस....आई बाबा अहो उलट्या होत होत्या ना त्यामुळे अशी झाली आहे मी....काही तरी सांगून तिने आत्ताची वेळ मारून नेली पण आता पुढे काय होणार ह्याची काळजी स्मिताला लागली होती.....
बघता बघता नऊ महिने कधी झाले कळलेच नाही...आणि तो दिवस उजाडला स्मिताला बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्या तिला हॉस्पीटल मध्ये घेऊन गेले थोड्या वेळाने तिला मुलगा झाला सगळेच आनंदी झाले....स्मिताच्या बाबांनी स्मिताच्या सासरी फोन करून कळवले पण त्यांच्या बोलण्यावरून तिच्या बाबा थोड खटकल पण त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केल...
दिवस असेच जात जवळ पास महिना झाला तरी तिच्या सासरचे बाळाला बघायला सुद्धा आले नाहीत....स्मिताचे आई बाबा तिला विचारू लागले तिला सुद्धा कळेना की त्यांना काय सांगाव.....स्मिताने तिच्या नवऱ्याला फोन करून यायला सांगितले....पण तो हीआईला घाबरत होता त्याने सुद्धा घाबरत आई ला सांगितले व आई जा बोलल्यावर तिचा नवरा तेवढा बाळाला पाहायला आला...तेव्हा तिचे आई बाबा थोड विचारायचे कमी केले पण त्या नंतर काय..असेच महिने पुढे जात होते पण तिच्या सासरहून काहीच निरोप येत नव्हता....शेवटी स्मिताच्या बाबांनी तिच्या सासरी फोन केला.....बाळाच बारस आहे सगळेजण या.....पण समोरून फक्त हं एवढच उत्तर आल आणि फोन ठेवला....आता स्मिताच्या बाबांना काळजी वाटू लागली...पण बारसे होऊ पर्यंत काही बोलायला नको म्हणून ते गप्प बसले
बारश्याला सगळेजण आले बाळाचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम छान पार पडला.....सगळे पाहुणे जेवत होते...स्मिता तिच्या नवऱ्याला घेऊन रूम मध्ये गेली...ते पाहून तिची सासू लगेच त्यांच्या पाठोपाठ रूम मध्ये आली...काय ग ए काय शिकवत आहेस माझ्या लेकाला..... अहो आई मी काय शिकवू..त्यांना विचारत होते सात महिने झाले कधी घेऊन जाणार आहात एवढच...तुला तुझ्या आई बाबा जवळ राहायचं आहे ना मग रहा इथेच..आई अस काही नाही ओ...आत्ता मला घेऊन चला तुमच्या सोबत हवं तर मी तुमच्या पाया पडते......स्मिता गया वया करत होती..शेवटी तिची सासू तयार होते...पण हे सगळ स्मिताची आई बाहेरून ऐकत होती...तिला हे सगळ पाहून धक्काच बसला....पण तिने काही माहित नाही असाच आव आणला...आग स्मिता जावईबापू इथे काय करताय चला बाहेर सगळे भेटायला येत आहेत...
आई चा आवाज ऐकुन स्मिता तिच्या डोळ्यातील पाणी पुसते..... हो आई आलोच आम्ही...अस म्हणून स्मिता बाहेर जाते....सगळा कार्यक्रम पार पडल्यानंतर स्मिताला तिच्या सासरचे घेऊन जातात....
पण स्मिताच्या आईला स्मिताची काळजी वाटत होती..तिला काय कराव कळत नव्हत कसे तरी पंधरा दिवस तिने काढले पण तिला राहवेना तिने स्मिताच्या बाबांना स्मिताकडे ती कशी आहे हे पाहायला पाठून दिले....स्मिताचे बाबा स्मिताच्या घरी आले आणि समोर दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.....स्मिताची सासू स्मिताला मारत होती.....स्मिता..........स्मिताचे बाबा जोरात ओरडतात...बाबा चा आवाज ऐकुन स्मिता त्यांच्याकडे धावत सुटते.....बाळा काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची....हे सगळ का बोलली नाहीस तू मला.......
कुठल्या तोंडान बोलणार स्वतःची चूक आहे म्हटल्यावर....स्मिताची सासू
तुम्ही शांत बसा मला चांगल कळत कोण कस आहे आणि कोणाची चूक आहे कळल....स्मिताच्या बाबांचा वाढलेला आवाज ऐकुन तिची सासू शांत बसते.......
बाळा चल पटकन तुझ समान भर तू इथे राहणार नाहीस....पण बाबा.........मी सांगतोय ना आवर पटकन....स्मिता समान भरून तिच्या बाळाला घेऊन येते....तिचे बाबा तिला घेऊन घरी येतात स्मिताला दारात पाहून तिच्या आईला काहीच कळेना...
अहो काय झाल स्मिता तुमच्या सोबत कशी काय...आणि तुला काय लागल स्मिता.....स्मिताची आई
स्मिता आता तर सांगणार आहेस का.....स्मिताचे बाबा
स्मिता आजपर्यंत झालेला सगळा प्रकार सांगू लागली....हे सगळ ऐकल्यावर तिच्या आई बाबांच्या पायाखालची जमीन सरकली....
बाळा का सांगितली नाहीस तू....का सगळ सहन करत राहिलीस.....बाबा
तुमच्यासाठी बाबा .....स्मिता
बस झाल आता तू कुटे जाणार नाहीस......माझी लेक मला झड झाली नाह..... मी तिला सांभाळू शकतो जा बाळ आत जा आराम कर
थोड्या दिवसांनी तिच्या बाबांनी सासरच्यालोकांना समजून सांगण्याचा प्रयन्त केला पण ते ऐकायलाच तयार नाही शेवटी स्मिता व तिच्या घरच्यांनी घटस्पोट घ्यायचा ठरवला.....तशी नोटीस ही पाठवली पण आमच्या वंशाचा दिवा आम्हाला द्या मगच आम्ही घटस्पोट देतो अशी ते मागणी करू लागले.......ह्यामुळे घटस्पोट होत नव्हता......
अशी सुद्धा लोक आहेत ह्या जगात आई पासून मुलाला वेगळ करत आहेत....पण स्मिता डगमगली नाही तिच्या बाबांच्या पाठिंब्यामुळे ती नव्याने उभी राहिली...ती नोकरीला जाऊ लागली व एकटीने तिच्या मुलाची व तिच्या आई वडिलांचा सांभाळ करू लागली.....
स्मिताची आई आता स्वतःला दोष देतेय कि तिच्यामुळे तिच्या मुलीच नुकसान झाल.....अहो पण हे आता बोलून काहीच उपयोग नाही ना....त्यामुळे स्वतःच्या मुलीला दुसर्याच्या घरी देताना त्या माणसांची योग्य ती पारख करूनच तिला त्या घरी पाठवावी नाही तर......नाहीतर पुढे तुम्हाला माहितच आहे काय होऊ शकत......
स्मिताचा घटस्पोट अजून सुद्धा झाला नाही पण आता तिला ह्याचा काहीच फरक पडत नाही ती नव्याने उभी राहिली आहे....तीच बाळच आता तीच विश्व झाल आहे.......
पण तिला एक प्रश्न पडतो आणि आयुष्यभर पडत राहणार.....
लग्न म्हणजे सुख की शाप......?????
***
(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा काही सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)
आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....