लग्न एक प्रेम प्रवास भाग ३

I like to read

लग्न एक प्रेम प्रवास भाग ३

     "काय आहे?" रागवलेल्या चेहऱ्याने त्याने पाहिले.


तर रितेशच्या बाजूला एक मुलगी त्याच्याकडे बघत उभी होती.


ऑरेंज कलर ची पैठणी तिच्या सावळ्या रंगावर उठून दिसत होती.कपाळावरची चंद्रकोर टिकली  आणि कानातले सोन्याचे झुमके,त्यात नाकात असलेली छोटीशी चमकणारी खड्याची चमकी .त्याचे डोळे तिच्या डोळ्यांमध्ये विसावले.


दादा,झाल का बघून?" रितेश ने बाजूला येऊन कानात  बोलला.


तसा तो पटकन भानावर आला. आणि तिच्याकडे बघुन गालात हसला.


पण ती  मात्र स्तब्ध उभी राहून त्याला निहाळत होती.
एक उंचपुरा,गोरा रंग असलेला मुलगा अंगावर  सफेद कुर्ता, निळी जीन्स,डोळ्यावर चष्मा आणि त्या  उजव्या गालावर पडणाऱ्या खळीत ती हरवली.


रितेश ने येऊन तिला आवाज दिला.


"ताई, हा माझा दादा. '
"अं हा नमस्ते,सॉरी ते मी जरा" तीने गोंधळून दोघांकडे बघितले.


"असू दे. इट्स ओके. तुम्ही या ना बसा."


ती त्याच्या समोर उभी राहिली.
"तुम्ही पण बसा ना".
"हो,रितेश तू गेलास तरी चालेल.


"दादा. मी थांबतो  ना.'


"जा,'म्हणत संजेश ने एक नजर त्याच्यावर टाकली.तसा तो मान खाली मान घालून बाहेर गेला.


"हॅलो, मी संजेश इनामदार. तस पाहिलं तर आपण ओळखतो एकमेकांना आणि ओळखत  पण नाही. तुम्हाला माझ्या बद्दल माहित असेल. ला तुम्हाला माझ्याबद्दल थोड सांगायचं होत. "

"हो.ओळखते मी तुम्हाला . मागच्या आठवड्यात तुमच्या दुकानात आली होती . साड्या खूप छान असतात . मी माझ्या सर्व मैत्रीणीना सांगितल तुमच्या दुकानातून साडी घ्यायला. दुकान पण चांगल आहे ."

"थँक यू, पण मी फक्त साडी  विकत नाही. म्हणजे ते साडी च दुकान माझ्या बाबांच आहे. मी जस जमेल तसं सांभाळण्याचे काम करतो. गेली चार वर्ष. "


"का.  तुमचे बाबा नाही जात."


"नाही. चार वर्षांपूर्वी त्यांचा एक अपघात झाला होता. तेव्हापासून ते व्हीलचेअर वर बसलेत.सहा महिने तर बेड वर झोपून होते.
त्यावेळेला मी माझ स्वप्न ,माझी आवड, माझ काम बजुला ठेवून दुकानात जाण्याचा निर्णय घेतला."


"आज मला माझ्याबद्दलच्या थोडस महत्वाचं  बोलायचं आहे. त्यानंतर तुम्ही ठरवा ."


"ठीक आहे.बोला."

क्रमशः
मधुरा

 

🎭 Series Post

View all