Jan 27, 2022
प्रेम

रेशीमगाठ भाग २

Read Later
रेशीमगाठ भाग २

परी- मम्मी मला एक मैत्रीण मिळाली ती रोज माझ्या सोबत कॉलेज ला येणं जाण करणार आहे आणि  पेट्रोल चे पैसे पण देते म्हणाली.

मम्मी- होका बरं झालं तुला तिची सोबत होईल.

असाच एक महिना निघून गेला कॉलेज बऱ्या पैकी सुरु होत परी ला कॉलेज मधलं सगळं आवडायच  टीचर्स पण छान शिकवायचे, सपोर्ट करायचे. अभ्यासासाठी काही बुक्स हवे होते म्हणून परी आणि रोहिणी लंच टाइम मध्ये लायब्ररी मध्ये गेल्या. तिथे सिनिअर्स चा ग्रुप होता. ते स्टुडन्ट सिनियर आहेत हे त्यांच्या हातात असलेल्या बुक वरून कळलं. म्हणून  रोहिणी आणि परी थोडा वेळ थांबल्या आधी त्यांचं काम होऊ  दिल मग या दोघीनी बुक्स घेतले.

सिनियर कडे बघताना परी च लक्ष एका मुला कडे गेलं त्या मुलाकडे बघून तिला वाटलं कि तो खूप  प्रेमळ आहे ज्या पद्धतीने तो मॅम सोबत बोलत होता त्या वरून तिला तस वाटलं. दिसायला हि हँडसम होता . परी आणि  रोहिणी परत आपल्या क्लास रूम मध्ये आल्या. क्लास मध्ये त्या दोघी विंडो जवळ बसल्या होत्या  म्हणून सिनियर चा तो ग्रुप परत त्यांना दिसला रोहिणी च लक्ष नव्हतं पण परी मात्र बघत होती.

रोहिणी- काय ग काय झालं?

परी- काही नाही ग असच.

रोहिणी- अग आपली फर्स्ट क्लास टेस्ट जवळ आली तुझा अभ्यास झाला का?

परी- नाही ग मला तर समजतच नाही आहे कशा प्रकारे होणार टेस्ट, किती प्रश्न राहतील. मला सगळं बरोबर जमेल कि नाही असं वाटत आहे. काही सुचत नाही आहे ग.

रोहिणी- ये आपण सिनिअर्स ला विचारायचं का ग? टेस्ट बद्दल तर त्यांना माहीतच असेलनं.

परी- नाही ग आपण कोणाला ओळखत पण नाही कोणाला विचारायचं . तू ओळखते का कोणाला?

रोहिणी- नाही. बर जाऊ दे टेन्शन नको घेऊ अभ्यास सुरु ठेव बघू काय होते तर.

परी- बर ठीक आहे.

दुसऱ्या दिवशी कॉलेज ला जाताना परी ला तो मुलगा बस स्टॉप वर उभा दिसला पण तिने फक्त बघितलं  आणि कॉलेज ला गेली. तो रोज बस नि कॉलेज ला जायचा.

कॉलेज मध्ये लंच टाइम झाल्यावर दोघी मैत्रिणी कॅन्टीन मध्ये कॉफी प्यायला गेल्या. कॉफी पित असताना परी च लक्ष गेलं तर तो मुलगा लायब्ररी मध्ये जाताना दिसला.

तिला वाटायचं कि हा मुलगा दिसला कि काबर याच्या कडे लक्ष जाते. हा मला आवडायला लागला का असा ती मनातल्या मनात विचार करू लागली. तसा तो अटऱ्याक्टिव्ह होता दिसायला आणि बोलायला  पण प्रेमळ होता. एके दिवशी परी आणि रोहिणी कॉलेज मध्ये पायरी चढत होत्या परी च्या हातात एक बुक होत त्यात काही नोट्स चे पेजेस ठेवले होते. त्या पेजेस पैकी एक दोन पेज खाली पडले पण परी आणि रोहिणी च लक्ष नव्हतं. एक्सक्यूज मी, असा आवाज आला परी आणि रोहिणी ने मागे वळून  बघितलं तर तो मुलगा होता. 'तुझ्या बुक मधून हे पेजेस खाली पडताना मला दिसले' असं म्हणून त्याने ते  पेजेस उचलले आणि परी च्या हातात दिले. परी त्याला थँक यु म्हणाली. त्याला पण परी च इतकं हळुवार थँक यु म्हणणं आवडलं. दुसऱ्या दिवशी तो मुलगा दिसला परी च लक्ष होत तेवढ्यात त्याला त्याच्या एका  मित्रानी 'राज' म्हणून आवाज दिला. तेव्हा परी ला माहित झालं कि त्याच नाव राज आहे.

राज आणि त्याच्या मित्राचं बोलून झाल्यावर परी ने त्याला आवाज दिला राज….

परी: राज

राज: हाय आपली काल भेट झाली होती होणं

परी: हो माझे इम्पॉर्टन्ट नोट्स चे ते पेजेस तुझ्या मुळे मला मिळाले खरचं थँक यु .

राज: इट्स ओके. तुम्ही दोघी फर्स्ट इयर स्टुडंट्स आहेत काय?

परी: हो.

राज: तुझं नाव काय आहे?

परी: माझं नाव परी आहे आणि हि माझी मैत्रीण रोहिणी.

 राज: हाय रोहिणी.

रोहिणी: हाय.

राज: कोणती ब्रांच आहे तुमची?

परी: इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि. आणि तुझी पण इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि हीच ब्रांच आहे न?

राज: हो पण तुला कस माहित?

परी: ते मी त्या दिवशी ..... काही नाही असच मी अंदाज लावला

( त्या दिवशी जेव्हा परी ला राज लायब्ररी मध्ये दिसला होता त्याच्या हातात इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि सेकंड इयर असं लिहून दिसलं होत सब्जेक्ट च्या नावाकडे मात्र तीच लक्ष नव्हतं).

राज: मग अभ्यासाशी रिलेटेड काही हेल्प लागेल तर सांगा. (सिनियर असल्यामुळे मदत करण्याच्या हेतूने त्याने तस विचारलं).

रोहिणी: हो ते फर्स्ट क्लास टेस्ट आहे त्या बद्दल थोडं कन्फयुजन होत आम्हाला.

परी: होणं त्या बद्दल थोडं सांगशील का. म्हणजे पेपर पॅटर्न माहिती झाला कि मग आमचं टेन्शन कमी होईल.

राज: हो सांगतो न पण आता माझं लेक्चर आहे तर लंच टाईम मध्ये लायब्ररी मध्ये सांगतो.

परी: ओके.

लायब्ररी मध्ये परी आणि राज ची भेट होईल का  हे आपण पुढील भागात पाहू.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now