Jan 26, 2022
नारीवादी

मि ही थकते.... जरा समजून घ्या

Read Later
मि ही थकते.... जरा समजून घ्या

"उद्या मावशी कडे पूजा आहे, लवकर जायचं आहे ह ओवी" , राघवने रात्रीच सांगुन ठेवल ,

"हो मी रेडी असेन"......

पण... सकाळी व्हायचा तो उशीर झालाच,

"चल ग आई पटकन, किती वेळ अजून ?आवरला नाही का तुझ"? निशा तिची लाडकी लेक हाका मारत होती,

हो आले,

ओवी घाईघाईने बाहेर आली... गाडीत बसली, थकून गेली होती ती, तयार व्हायला वेळच नव्हता, घाई घाईने साडी नेसून रेडी झाली होती, काल ठरवल की मस्त झुमके घालायचे ते ही जमल नाही,

नवऱ्याच्या तोंडाचा पट्टा सुरू होता, "किती जरी वेळ दिला हिला तरी हीच आवरत नाही",

असा राग आला ना ओवीला ,पण परत काही बोलल की मूड जायचा, भांडण नको म्हणून ती गप्प बसली,

का उशीर होतो बायकांना आवरायला? का उशीर झाला आज मला सकाळ पासून? एक मिनिट हाथ मोकळा नव्हता, घरची कामे ,सासू सासर्‍यांच्या स्वैपाक, सगळ्यांचा चहा, नाश्ता , सगळ काम एक हाथी, कोणाची मदत नाही, परत सगळ्यांना सगळ हातात द्यायला लागत, काय काय करणार? कोणाला सांगायची सोय नाही? काही बोलल तर... तू काय एकटी आहे का आवरणारी? सगळ्या बायका करतात काम... एवढा बाऊ करत नाही कोणी,(बायका हं फक्त)... काय करणार उपाय नाही

मावशींकडे पोहोचले ते, सगळे मजेत बसले ओवी परत उभी किचन मध्ये.... हे दे ते दे, मावशीच्या सुनेला मदत कर, जेवण वाढून दे असा सुरू होतं तिच,

राघवच सुरू होत झाल , "निघायचा का" ?

अरे हो आली... जरा बसू तर दे मला, जेवली ही नव्हती ती नीट,

घरी येतांना राघव बोलला निशाला की "तुझी आई ना जिकडे जाते तिकडे बसुन राहते" , तुला नसतील पण मला कामे आहेत घरी, उद्या ऑफिसची तयारी करायची आहे, bla bla bla......

मला काम नाहीत काही? म्हणजे काय ? वाटेल ते बोलायच का नेहमीच? , घरची कामे कशी होतात मग? स्वैपाक, घर आवरण, तुझ्या आई वडिलांच सगळ काम आपोआपच होत का? काही ताळतंत्र आहे की नाही बोलण्याला, की मी ऐकते म्हणुन बोलत रहायच... ओवी खूप चिडली,

राघव निशा ऐकतच राहिले

घरी आले रात्रीचा स्वैपाक करून आवरता आवरता वेळ झाला, रूम मध्ये आली, आज झोप येत नव्हती , मन बंड करून उठले होते,

या लोकांना माझी अजिबात किम्मत नाही, यांना माझी कामापुरती गरज आहे , काहीही सहानुभूती नाही माझ्याबद्दल , उगीच करते मी एवढ,

या सगळ्यातून मला ब्रेक हवा आहे, तो मी स्वतः घेणार आहे, काही उपयोग नाही एवढ करून, हे काही आजच नाही नेहमीच बोलतो तो मला, कुठल्याही कामाच कौतुक नाही , नेहमी चूका काढणार, याला काय अर्थ आहे,

राघव लग्न झाल्यापासून बोलतो.... तू वेंधळी आहेस, तुझं आवरत नाही, टापटीप राहत नाही, हे अस नाही... तस नाही, मुळात त्याला मी आवडत नाही, फक्त सुरळीत काम सुरू आहेत म्हणून मी या घरात आहे, नाही तर कधीचच घरा बाहेर काढल असत मला, परक्या लोकांसारखी वागणूक मिळते मला, आता नाही आपण आपल काम शोधायच यातून बाहेर पडायच, विरंगुळा हवा स्वतः साठी

पूर्वी घ्यायचो तसे ट्यूशन घेईन मी... ते ही घरात नाही बाहेर क्लासला जावून , घरी असलो की हे लोक नीट बसू देत नाहीत, मध्ये उठाव लागत.... निशा एक अपवाद आहे ती प्रेमळ आहे

दुसर्‍या दिवशी उशीरा उठली ती, सगळी कामे पडून होती, सासुबाई सासरे उठले होते, मुलगी नवरा उठून आले,

चहा नाही झाला का? अग आज पेपर नाही का आला? कुठे आहे ओवी,.... राघव हाका मारत होता

"आई बर नाहिये का? काय झालं" ? निशा काळजी करत होती,

"काही नाही बेटा नुसत पडून रहावस वाटतय" ,

राघव ही आला.... "चहा ठेव ओवी" ,

"मी नाही करणार तु करून घे चहा आणि आई बाबांना हि दे" , मला बाहेर जायचा आहे,

कुठे चाललीस तू मंम्मा....

मी आई कडे जाते आहे... त्यांना भेटायला ,

असे अचानक? काही प्रॉब्लेम आहे का?..... राघव विचारात होता

हो मी इथे राहिले तर प्रॉब्लेम होईल, I need some time, तुम्ही लोकं अॅडजेस्ट करा, नाही तर बाई आहे कामाला, आणि ती माझ्यापेक्षा हुशार ही आहे.... तिला सांगा स्वैपाक , आणि मी सोमवार पासुन क्लासेस जॉईन करते आहे, काल आला होता त्यांचा फोन तेव्हा विचार करेन ऑफरचा अस सांगितल होत आता confirm केलय, तर ह्या वीकेंडला मी आई बाबांना भेटून येते, चला आवरायला घेते मी,

आई मी येवू का तुझ्या सोबत.... निशा बोलली ,Ok बेटा हो तयार, निशा तयारी करायला गेली

राघव भानावर आला, ओवीशी आपण खरच नीट नाही वागत आहे का? जे बोलतो तिला ते चुकीच आहे, मी माफी मागितली पाहिजे,

I am sorry ओवी मला माहिती नव्हत माझं वागण एवढ चुकीच... खराब आहे, मी असं बोलायला नको होत, माझ्या मनात काही नसत ग, मी कसा ही असलो तरी माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे, गृहीत धरले तुला, तू जावून ये आई बाबांना कडे... पण हसत हसत जा... राग मनात धरून जाऊ नकोस, मी येतो सोडवायला

खरच किती जणींचा असा समजूतदार नवरा भेटतो? , पूर्ण आयुष्य निघून जात तरी घरच्यांनी समजत नाही की आपण अन्याय करतो आहोत बायको वर, वडिलांच बघून मुल हि असेच वागतात आईशी, घरच्या स्त्रियांनी साडीच नेसायला हवी, इथे जाऊ नको, तुला काही नाही समजत यातल, हे असच सुरू असत, बदल घडवण अवघड होवून जात अश्या वेळी

निदान स्त्रियांनी स्त्रियांची परिस्थिती समजून घ्यावी शक्य असेल आणी बरोबर वाटत असेल तर एकमेकींना सपोर्ट करावा, त्रासदायक व्यक्तींना समजवाव, नसतील समजुन घेत तर आपण स्वतः दूर व्हावा त्यांचापासून,

स्त्रियांना ही जगण्याचा हक्क आहे... त्यांना जगु द्या... फुलू द्या मनाप्रमाणे.... त्या बदल्यात त्या प्रेम आणि प्रेमच देतील तुम्हाला.... बघा विचार करून .......


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now