शीर्षक - मातृ-रूपेण संस्थिता
लेखिका ©®स्वाती बालुरकर ,सखी.
स्पृहा आज विचारात पडली होती.
दसऱ्याची नवमी होती आणि रत्नाने म्हणजे तिच्या ननंदेने तिच्या मुलीला इशिताला कन्याभोजन साठी बोलावलं होतं.
दसऱ्याची नवमी होती आणि रत्नाने म्हणजे तिच्या ननंदेने तिच्या मुलीला इशिताला कन्याभोजन साठी बोलावलं होतं.
इशिताला जेवणासाठी बोलावलं होतं तर आपणही तिकडे जावं आणि तिच्याकडे तरी आपलं गाऱ्हाणं सांगावं असं उगीचच वाटून गेलं.
कारण असं होतं की तिचा संसार जवळजवळ मोडकळीस आला होता.
मुलं शिकत होती, कमाई कमी आणि खर्च जास्त होता.
काहीही केलं तरी घरच्या खर्चाचां मेळ लागत नव्हता.
तिने फोन करून कळवलं त्यामुळे तिलाही आनंद झाला.
मुलं शिकत होती, कमाई कमी आणि खर्च जास्त होता.
काहीही केलं तरी घरच्या खर्चाचां मेळ लागत नव्हता.
तिने फोन करून कळवलं त्यामुळे तिलाही आनंद झाला.
नवमीची सवाष्ण म्हणून भावजय आली याचा आनंद रत्नाला झाला होता पण भाऊ देखील आला असता तर बरं झालं असतं, असं वाटलं.
दुपारी इशितला हळदी कुंकू लावून , पुजा आणि औक्षण करून तिचं गिफ्ट दिलं.
दुपारी जेवण झाल्यानंतर न राहून स्पृहा रत्नाजवळ म्हणाली “ताई मला नवरात्रीचा सण खूप आवडतो , रादर पूर्वी आवडायचा पण यावर्षी मी ठरवलं होतं की काहीच करायचं नाही. त्या देवीला पण कळू दे ना की मी काय परिस्थितीत हे सगळं निभावते आहे !आता देवीचा आसरा आहे हो मला!”
“ का ग स्पृहा काय झालं? तू पण दरवर्षी घरी नवरात्राची पूजा करतेस म्हणून मी तुला बोलावलं नव्हतं फक्त कन्या पूजनासाठी इशू ला बोलावलं होतं .
पण बरं झालं तू कॉल केलास आणि आलीस.”
पण बरं झालं तू कॉल केलास आणि आलीस.”
“खरं सांगू का ताई, यावर्षी नवरात्र सोडा मी दिवा पण लावला नाही.”
“ हो तू म्हणालीस तर मला वाटलं की अडचण आली असेल कदाचित , म्हणून दिवा लावला नसेल . छान झालं इकडे नवरात्र भरून वाटली . बरं झालं तू आलीस , अगोदर कळालं असतं तर संदीप ला पण बोलावले असते ना. मला छान मेहुण घडले असते.”
दुपारचे जेवण झाली होती, दोघींनी आवरा आवर करली आणि मस्त इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसल्या. मधेच सामाजिक गप्पा, स्त्रियांची समाजातली स्थिती वगैरे पण विषय निघाले.
स्पृहा किती हुशार असली तरीही तिच्या त्या प्रायव्हेट ऑफिस मधल्या कमाई ने घरातलं हवा तेवढा खर्च भागत नव्हता हे रत्नाला माहीत होतं
स्पृहाचा नवरा म्हणजे रत्नाचा भाऊ संदीप गेल्या दोन-तीन वर्षात सतत नोकरीचे धर सोड करत होता आणि कदाचित त्या टेन्शन पोटी त्याला काही व्यसन पण जडले होते.
त्याच्यावरच्या प्रेमामुळे स्पृहा त्याला तोडून बोलू शकत नव्हती पण त्याची कमाई स्थिर नसल्यामुळे घरात सतत आर्थिक चणचण जाणवत होती .
स्पष्ट सांगायचं नसलं तरीही रत्ना ताईंना काहीतरी माहित असावं म्हणून ती म्हणाली ,”ताई पहा ना ,आपण एका ठराविक आर्थिक परिस्थितीत राहतो असे आपल्याला वाटते आणि असे आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील वाटते आणि जे आहे ते उत्तम आहे हे दाखवण्याच्या भ्रमात आपण स्वतःला खूपदा अडचणीत आणतो नाही का ?”
“हो ग! बरोबर आहे . आपण जे स्टॅंडर्ड सेट करतो ना त्याच्या खाली आपण उतरू शकत नाही आणि त्यातच मग खूप घुसमट होते. मी खरंच समजू शकते ग तुझी तगमग . तुझ्या स्वाभिमानाचा आदर करते पण आज संदीप आला असता तर त्याला मी वेगळं घेऊन समजावलं असतं.”
“ ताई, मी समजावत नाही असं वाटतं का तुम्हाला ? मी पण खूपच महीने प्रेमाने, कधी रडून , कधीतरी विनंती करून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते हो हो म्हणतात. तीन-चार दिवस अगदीच त्यांच्या वागण्यात फरक दिसतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. त्यांचा प्रॉब्लेम अस मला आतापर्यंत कळत नाही. पहा ना सुरुवातीचे एक दहा वर्ष किती स्थिर छान गेली, एकाच नोकरीत.आता काय बिनसले कोण जाणे ? “
स्पृहाच्या बोलण्यावरती बराच वेळ रत्ना तिला समजावत राहिली, तिचं मन हलक करत राहिली.
तासभर गप्पा मारून झाल्यावरती रत्ना एकदमच म्हणाली,” स्पृहा थोडं पड तू हवं तर . मी जरा जास्तीच अन्न खालच्या वाचमनच्या बायकोला देऊन येते. त्यांचे खूप हाल आहेत ग, खाली जाऊन येते. त्या माणसाची कमाई नाही आणि तीन-तीन मुली .त्यातल्या धाकट्या मुलीसाठी मी फ्रॉक आणलाय. संध्याकाळी ये म्हणून सांगून येते.”
“ ओके ताई .” असं म्हणून ती पडली. रात्री विचार करून झोप लागत नव्हती आणि दिवस नोकरीत दगदग . आता जेवणही झालं होतं त्यामुळे तिला एकदमच गाढ झोप लागली.
रत्नाने देखील परत आल्यावरती तिला डिस्टर्ब केलं नाही.
साडेपाचला वगैरे संध्याकाळ झाल्यावर , चहाला ठेवूनच तिला उठवलं.
चहा घेतला की मी “निघते ताई” असं ती म्हणाली .
रत्नाने तिला थांबण्याचा आग्रह केला.
“ आज संदीपला येऊ दे.
आज तो आल्याशिवाय मी तुला पाठवणार नाही .आणि हो घरी जाऊन तरी काय करणार आहेस .नमिता तर मामाकडे गेलीय ना . दोघेही दसरा इथेच करून जा की.”
आज तो आल्याशिवाय मी तुला पाठवणार नाही .आणि हो घरी जाऊन तरी काय करणार आहेस .नमिता तर मामाकडे गेलीय ना . दोघेही दसरा इथेच करून जा की.”
“ नको ताई . ते आले की रात्री घरी जाऊ आम्ही .दसऱ्याची तयारी करायची आहे.
नवरात्र नाही केलं तरी दसऱ्याला मात्र पूजा करायलाच हवी, इतका मोठा सण.”
“ बरं तसं.”
नवरात्र नाही केलं तरी दसऱ्याला मात्र पूजा करायलाच हवी, इतका मोठा सण.”
“ बरं तसं.”
नेमकी त्याच वेळी दिवे लागण्याच्या वेळी वॉचमन ची बायको तिच्या दोन लहान मुलींना घेऊन आली.
इशीताचं कन्या पूजन दुपारी झालं होतं, त्यामुळे रत्नाने दोघींसाठी पाट टाकले.
मुलींना छान बसवूंन रांगोळी काढली.
कुंकू लावून लहानी ला जी दोन वर्षाची होती तिला फ्रॉक दिला आणि मोठीला मात्र पैसे दिले.
मुलींना छान बसवूंन रांगोळी काढली.
कुंकू लावून लहानी ला जी दोन वर्षाची होती तिला फ्रॉक दिला आणि मोठीला मात्र पैसे दिले.
क्रमशः
लेखिका स्वाती बाळूरकर, सखी
दिनांक २०.०१.२५
लेखिका स्वाती बाळूरकर, सखी
दिनांक २०.०१.२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा