Jan 19, 2022
नारीवादी

मातृत्व एक अनोखा प्रवास

Read Later
मातृत्व एक अनोखा प्रवास

मातृत्व एक अनोखा प्रवास


खरं सांगायचं झालं तर मातृत्वाचा आनंद हा शब्दात मांडता येत नाही,सर्वात मोठा आनंद म्हणजेच मातृत्व ,,मातृत्व ज्याच्या नशिबी आले त्यांना दुसऱ्या कोणत्याच आनंदची गरज नाही,आणि  असाच मी माझ्या मातृत्वाचा अनुभव सांगणार आहे,

माझा अनुभव सांगायचं म्हणजे, जेव्हा मला पहिल्यांदा कळले की मी आई होणार तो दिवस आज ही मला आठवितों,त्या दिवशी ही आनंदाची बातमी ऐकून जणू माझा अन् माझ्या पतींचा आनंद हा गगनात मावेनासा होता,कारण तब्बल लग्नाच्या दोन वर्षानंतर मला गुड न्यूज मिळाली,त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची अवस्था माझी झाली,आणि अर्थातच माझ्यासोबत यांची सुध्दा,आम्ही दोघेही खूप खुश होतो,,आज जरी ती वेळ आठवली तर त्या पेक्षा दुसरा आनंद मला कशातच वाटत नाही....

मी एक शिक्षिका आहे त्यामुळे मला रोज २५किमी प्रवास करावा लागत असे,म्हणजेच २५जाणे व येणे असे ५०किमी रोजचा प्रवास आणि त्यातला त्यात स्कूटी चालवायची...पण कसं करायचं सगळं काहीच कळत नव्हतं,,आणि मग आम्ही दोघांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांनी मला ३महिने प्रवास बंद सांगितला,आणि म्हणूनच मी सुट्या टाकल्या ...खूप सांभाळून सर्व कामे करावी लागत असे,कारण मी पहिल्यांदा आई होणार होते,तीन महिने बघता बघता सहजच निघून गेले...आता मला चौथा महिना सुरू झाला,मग मात्र मला खूप त्रास व्हायला सुरुवात झाली म्हणायची,कारण काही पण खाल्ले की लगेच उलटी व्हायची,आणि तोंडाची चव पण खूप कडू झाली होती,बऱ्याच गोष्टींचा वास यायचा,आणि लगेचच मग उलटी व्हायची,पण तरी सुद्धा बाळाची चाहूल लागली होती आणि अलगद सगळं सहन करण्याची ताकद यायची...

नंतर मात्र मी पुन्हा शाळेला जायला सुर वात केली,खूप म्हणजे खूप कठीण होते सगळे,पण फक्त माझ्या बाळाच्या आनंदात सर्व सहज तेने पार पडत होते,आणि सोबतच पतींनी घेतलेली माझी काळजी त्यामुळे आभाळा येवढे संकट असूनही दिवस आनंदात जात होते,बघता बघता मला सातवा महिना सुरू झाला,आणि मी पाहिले बाळंतपण असल्यामुळे माहेरी गेली,तिथे मात्र आईने माझी खूप जास्त काळजी घेतली व सर्व जसे  मला हवे तसेच ती देत असे,पण अचानक भावाला बघायला स्थळ आले आणि माझ्या एकुलत्या एक भावाचे लग्न जमले,आणि लग्न ही लगेच होते त्यामुळे माहेरी लग्नाची तयारी सुरू झाली अन् मग मात्र माझी दगदग वाढली,पण तरीही सर्व गोष्टी अगदी सहज व्हायच्या,आणि मला आठवा महिना असताना माझ्या भावाचे लग्न पार पाडले,केवळ अशी समजूत आहे की आठवा महिना सुरू असताना प्रवास करू नये म्हणून माझ्या भावाचे लग्न माझ्या माहेरीच केले,...????

नवीन वहिनी आणि माझ बाळंतपण आईची मात्र खूप धांदल वाढली,पण खरंच आई ती आई च असते,आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही,आणि अशातच माझी डिलिवरी झाली,एका गोंडस मुलाची मी आई झाली होती,तो पोटात असताना त्याला बघण्यासाठी मी खूप आतुर झाली होती,,जेव्हा त्याला प्रतक्ष बघितले तर डोळे अगदीच पानाऊन गेले होते..,.

ते ईवलेसे हात,छोटुसे डोळे,मऊ मऊ गाल,गुलाबी ओठ,गोंडस 
चेहरा,..जणू आभाळभर सुख माझ्या पदरात पडले होते,किती सुंदर माझं पिल्लू असे म्हणत मी त्याची पापी घेतली...????

आणि त्याला माझ्या कुशीत घेतले,अगदी त्यालाही कदाचित त्याच्या आईची कुशी कळली असावी की तो शांत होता,निवांत झोप त्याला लागली होती ...

मी एका मुलाची आई झाले,तेव्हा मला मातृत्व कळले खरच आईचे मन किती आपल्या बाळासाठी व्याकुळ असते,आपल्या बाळाचं आईला सर्व च कळते आणि ते ही बाळ बोलत नसतांना,,माझा माझ्या पिल्लुसाठी खूप जीव दुखतो,,,आणि एक वेळ अशीच माझ्यावर आली होती,ज्या दिवशी त्याचे बारसे होते त्या दिवशी च अचानक माझ्या पिल्लू ची तब्येत खूप खराब झाली होती,अगदी खूप म्हणजे खूप च,माझ्या तर अश्रुधारा थांबतच नव्हत्या,पिल्लू ला काय झाले होते कुणास ठाऊक,दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर आधी मला च रागावले,आणि बोलले की बाळाची तब्येत तेवढी खराब होई पर्यंत तुम्ही काय केले,बाळ खूप अशक्त झाले आहे,काहीच सांगता येत नाही,हे ऐक्यावर माझे रडू तर  आवरत नव्हते च,पण सोबतच माझे मिस्टर,माझी आई,माझा भाऊ,माझे बाबा हे सुध्धा रडायला लागले,मला तर माझे सर्वच हरविल्या सारखे झाले होते,पण म्हणतात ना वाईट वेळ ही काही राहत नाही तसेच झाले तो वाईट काळ ही माझ्या अंगावर शहारे आणणारा तर होताच पण आजही तो दिवस आठवायला लागलं की रडू येत,आज माझं बाळ ठणठणीत बरा आहे,आणि खूप जास्त मस्तीखोर आहे....

माझ्या पिल्लू च नाव आम्ही अंशुमन ठेवले,विशेष काहीच नाही बस आवडले अन् ठेवले,खरंच आई होणे सोपे नसते,आज पिल्लू दीड वर्षाचा आहे,अन् माझी मात्र तारेवरची कसरत चालूच असते त्याला सांभाळण्यात,कारण नोकरी करणाऱ्या आईची तारांबळ कशी उडते हे न सांगितले च बरे,,,,असो पण पिल्लू मुळे मी खूप आनंदी आहे कारण आज माझ्या पिल्लू मुळेच मला आई पण लाभले,..

लहान होते तेव्हा माझ्या आईला समजून घेण्यात मी कमी पडायची,पण आज स्वतः आई झाल्यावर कळले की आई ही आई च असते,आपल्या बाळासाठी,लेकरासाठी प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची तिची तयारी कायम असते,..

लेख आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा....

 

Ashwini Galwe Pund....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ashwini Galwe Pund

Teacher

I am simple living women