Login

मागणे..

मागणे..
कृष्ण सावळा म्हणती तयाला
रंगात वेडे अडकले
अंतरीची पटता खूण
भक्तीरसात न्हाले..

राधा, मीरा
अखंड जपती कृष्णाला
सखा, सोबती तो
एका नामातूनच झाला


पद लागता त्याचे
पूर ओसरला यमुनेचा 
बाललीलेने तो
लाडका होतो सकलांचा

तूच तारक, तूच संहारक 
तारी या विश्वाला
विसर न पडो कधी तुझा
हेच मागणे तुला..

अंश म्हणुनी तुझा
आलो या जन्मास
तुझ्यातच विलीन करून घे