Login

निखाऱ्यातली फुलं-5 अंतिम

प्रेरणादायी कथा
पण तुझे पुतणे, तुझा मुलगा त्रास देत असतील ना.."

"त्रास कसला..पुतण्या आणि माझा मुलगा..दोघांना एकमेकांची सोबत असल्याने मला त्यांना सांभाळायचा प्रश्नच येत नाही...दोघेही एकत्र खेळतात, एकत्र अभ्यास करतात.."

"त्यांची शाळा? तुझी धावपळ होत असेल ना?"

"पुतण्या मोठा आहे, दोघांची एकच शाळा असल्याने तो माझ्या मुलाला सोबत नेतो आणि आणतो..मला वेगळं आणण्याची गरज नाही..व्हॅन आहे दोघांना.."

"पण बाळंतपण झाल्यानंतर गॅप पडला असेल तुझा..लहान मूल, त्यात घरातली कामं.. माझे प्रचंड हाल झाले होते.."

"हाल? छे ! उलट त्याच काळात मी ही कंपनी सुरू केली..बाळ सासूबाईंच्या अंगावर होतं..मला त्याला सांभाळवं लागलंच नाही..माझं बाळंतपण सुदधा सासरी झालं.."

"फार धावपळ झाली असेल ना पण, बाळंतपण झाल्यानंतर सुद्धा कामं चुकली नाहीत तुझी.."

"अगदी दहाव्या दिवशी कामाला लागलेली मी..जावेनेच मला सांगितलं तसं करायला.."

"अशी कशी गं तुझी जाऊ? थोडी तरी दयामाया दाखवावी ना तिने.."

"अगं पण त्याची गरजच काय? आमच्या घरी रोज सकाळ संध्याकाळ पौष्टिक जेवण, नाष्टा लागतो..ते खाऊन आमच्या तब्येती खूप निरोगी बनल्या...जावेच्या कडक स्वभावामुळे सवय लागली काम वेळेवर करण्याची..वेळेच्या नियोजनाची..त्यात गंमत म्हणजे कुणी क्लाएंट भेटायला आले तर सासूबाई मुद्दाम ऑफिसमध्ये घुसत आणि काहीतरी काम सांगत.."

"अरे देवा..मुद्दाम करायच्या का गं?"

"हो..त्यांना आवडतच नव्हतं मी असं ऑफिस सुरू केलेलं.."

"मग चांगलेच वाद झाले असणार.."

"अजिबात नाही, उलट त्या असं करायच्या म्हणून मी क्लाएंट साठी आधीच सगळा प्लॅन तयार ठेवायची जेणेकरून मिटींगला जास्त वेळ लागणार नाही..त्यामुळे परिणाम असा झाला की माझ्याकडून क्लाएंटला मुद्देसूद प्लॅन मिळाल्याने क्लाएंट खुश व्हायचा आणि अजून चार लोकांना ते दाखवून अजून कस्टमर आणून द्यायचा.."

"मग खर्चाचं नियोजन कसं करतेस?"

"मला सासूबाईंनी निक्षून सांगितलं..की ऑफिस सुरू ठेवायचं असेल तर घरात महिन्याला 15 हजार द्यावे लागतील.."

"बापरे, मग व्हायची का एवढी कमाई सुरवातीला?"

"नाही, पण त्यामुळे झालं असं की मला एक टार्गेट मिळालं..महिन्याला किमान एवढी रक्कम बाजूला पडली पाहिजे या हिशोबाने मी माझं काम वाढवलं..अजून मेहनत घेतली..नाहीतर महिन्याला पंधरा हजार मलाच मिळाले असते तर मी तेवढ्यातच खुश असते.."

"पण बाहेर जाताना वैगरे कपड्यांवर बंधनं असतील तुझ्यावर.."

"हो मग, बाहेर जाताना साडीच नेसायची असा सासूबाईंचा नियम.."

"मग तू का ऐकलं?"

"त्यात काय एवढं? साडी नेसायला कसला आलाय प्रॉब्लेम? उलट त्यामुळे झालं असं की विसीटला मी साडीत जायचे तेव्हा कस्टमरवर वेगळंच इम्प्रेशन पडायचं..त्यांच्या बायकांना मी त्यांच्यातलीच वाटायचे, त्यामुळे खूप ऑर्डर मिळत गेल्या.."

मायरा तिच्याकडे बघतच राहिली..गायत्री एकही गोष्टीची तक्रार करत नव्हती.. उलट जिथे तक्रार होती त्यातुन ती सकारात्मक काहीतरी बघत होती... आपल्यावर अन्याय होतोय याचा गाजावाजा करण्यापेक्षा त्यातून आपल्याला काय चांगलं साध्य होईल याचा विचार करत होती...हिच्याजागी मी असते तर?? आज एकटं राहण्याच्या हट्टामुळे स्वतःचं आरोग्य, मनःशांती आणि आर्थिक सुबत्ता यावर संकट आलेलं...

एवढं बोलून गायत्री तिथून उठते, आणि म्हणते..

"चल...मला घरी जावं लागेल. 2 तासात पोचेल घरी, संध्याकाळी 6 वाजतील घरी पोचायला..गेल्यावर सासऱ्यांसाठी साबुदाण्याची खिचडी टाकायची आहे, पुतण्याचा अभ्यास घ्यायचा आहे, जावेने फ्रीज आवरायला सांगितलं ते करायचं आहे..7 वाजता अभ्यास घेईल आणि 7 ते 8 फ्रीज आवरून घेईल..आणि मायरा इतक्या वर्षांनी भेटलो आपण, बरं वाटलं मला..माझा नवीन नंबर देते, संपर्कात रहा.."

सगळं वेळापत्रक गायत्रीने तिथल्या तिथे बनवून टाकलं..जाता जाता तिला फोन आला, जिना उतरत असताना ती फोनवरच बोलत होती, मायरा दारातून तिच्याकडे बघत राहिली...तिचं फोनवरचं बोलणं कानावर पडलं..

"हॅलो मिस्टर देसाई, तुम्हाला फायनल कोटेशन 40 लाख चं दिलं आहे, त्यावर तुमच्या कंपनीने अप्रुव्हल दिलं आहे..आजपासून काम सुरू होईल."

एकाचवेळी घर आणि बिझनेस बघणाऱ्या गायत्रीचं आज मायराला कौतुक वाटत होतं..कितीही त्रास असला तरी भरपूर गोतावळा असलेल्या माणसांची सोबत असणं किती गरजेचं आहे हे मायराला कळलं..निखारे प्रत्येकाच्या वाटेवर असतात, पण त्यातला दाह बघायचा की त्यातलं तेज उचलायचं हे ज्याच्या त्याच्या हातात असतं...

तेवढ्यात तिचा पेपरवाला बिल घेऊन आला, बिल भरून त्याने सही करायला लावली..मायराने बिल दिलं आणि तिचं लक्ष आजच्या तारखेकडे गेलं..आज तारीख होती..