मयंक बराच वेळ वाट बघत होता.. त्याला रिक्षातून एक बाई उतरताना दिसली आणि तिच्या हातात दोन मुलं.. त्याला आपण स्वप्न तर बघत नाही आहोत ना असं वाटलं.. त्याने स्वतःलाच जोरात चिमटा काढला..
अरे हे काय, खरंच कोणतरी बाई होती तिथे..
ती हळूहळू मयंक च्या दिशेने चालत होती.. तिची मुलं मयंक ला काका काका करत त्याच्या कडे धावत यायला लागली..
" Hii मयंक, मी सन्मीशा " : ती
मयंक तर बघतच बसला.. त्याला काय बोलावं तेच सुचेना.. त्याने कसतरी hii म्हटलं..
तिने कॉफी घेत बोलूया का, असं विचारलं..
मयंकने फक्त मान हलवली..
तो तिथून सटकायचा चान्स शोधत होता..
आणि तिला कोणाचातरी फोन आला, तसा हा पाठच्या पाठी जीव घेऊन पळाला..
त्याला पळताना बघून एक गाडी त्याच्या पुढ्यात थांबली..
गाडीची काच खाली झाली..
" अरे मयंक, असा काय पळतोयस.. काय झालं??? "
" गाडीत बस आधी तू.. "
मयंक गाडीत बसला..
" बरं झालं भेटलास.. नायतर आज काही खरं नव्हतं.. " : मयंक
" काय झालंय काय नक्की?? "
" अरे मी सन्मीशाला भेटायला गेलेलो पण तिथे वेगळीच सन्मीशा होती.. " : मयंक
" म्हणजे??? " : समीर
अरे मी सन्मीशा सबनीस हे नाव social media वर अकाउंट चेक केलं आणि follow केलं.. समोरून पण follow back आला.. मग बोललो पण आम्ही आठवडाभर आणि आज भेटलो तर ती एक बाई आहे.. तिची दोन मुलं मला काका काका करत होती..
समीरला हसू आवरत नव्हतं.. मयंकने त्याला बुक्की घातली.. तरी तो हसत होता..
कमाल कमाल.. हीहीही.. मी miss केला सीन.. असं बोलून तो परत हसायला लागला..
" एक मिनिट, तू नाव काय search केलंस.. सन्मीशा सबनीस.. अरे सबनीस नाही, कारखानीस.. " : समीर
मयंकला समीरचा राग येत होता.. पण करणार काय.. त्याने पचकाच असा केला होता..
क्रमश :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा