पार्टी जोरात सुरु होती.. आता सगळ्यांनाच जोरात भूक लागली होती.. मयंक, समीर सगळे जेवणाच्या टेबलकडे गेले..
मयंक समीरच्या समोरच सन्मीशा तिच्या मैत्रिणींसोबत बसली होती..
मयंक तिच्याकडे एकटक बघत होता.. समीरने त्याच्या ताटात मिरच्या ठेवल्या.. आणि या पट्ठयाने तिच्याकडे बघत त्या खाल्ल्यापण आणि नंतर लागला जोरजोरात ओरडायला..
त्याचा ओरडा ऐकून सगळे त्यांच्या टेबलभोवती जमा झाले..
सन्मीशा पाणी घेऊन आली..
" Are you alright ?? " : सन्मीशा
" Yes, yes.. " : मयंक
" तू sweet खा काहीतरी, बरं वाटेल.. " : सन्मीशा
" हो अरे sweet खा तू.. " : समीर मुद्दाम सन्मीशाला दुजोरा देत म्हणाला..
दुसऱ्या दिवशी मयंक ऑफिसला लेट पोहोचला.. मिरच्यांनी पोट जे बिघडलं होतं त्याचं ?..
सन्मीशाचा विचार काही त्याच्या डोक्यातून जात नव्हता..
समीरने त्याला weekend ला भेटायला बोलावलं..
दोघेही भेटले.. समीरने त्याला सांगितलं.. अरे लग्न नाही झालंय तिचं..
" कोणाचं?? " : मयंक
" कोणाचं काय?? सन्मीशा वहिनी.. " : समीर
" काय सांगतोस.. तुला कसं कळलं.. " : मयंक
" अपने जासूस चारो तरफ फैले हुए है.. " : समीर
" अरे पण तिच्या आयुष्यात दुसरं कोणी नसेल कशावरून ?? " : मयंक
" ते तू शोध.. मी चाललो.. बाय " : समीर
" अरे पण.. " : मयंक
मयंककडे सन्मीशाचा कॉन्टॅक्ट नंबर नव्हता म्हणून त्याने तिला सोशल मीडियावर शोधायचं ठरवलं..
त्याने फेसबुकवर नाव search केलं.. सन्मीशा सबनीस.. तसे त्या नावाचे काही प्रोफाइल दिसायला लागले..
मुंबईचं एक दोन प्रोफाइल होते त्यात.. याने घाबरत एका प्रोफाइलला request पाठवली..
समोरून request accept झाली..
Hii, hello वरून हळूहळू गाडी पुढे सरकली..
आता तसं रोजच बोलणं होत होतं..
मग मयंकने तिला तुझी हरकत नसेल तर भेटूया का?? असं विचारलं..
तिनेही हो म्हटलं..
दिवस ठरला.. एका पार्क मध्ये भेटणार होते ते दोघं..
मयंक खूप excited होता..
आज सन्मीशाला मनातलं सांगूनच टाकतो, तू मला खूप आवडतेस..
ठरलेल्या वेळेच्या आधीच मयंक तिथे पोहोचला.. बराच वेळ वाट बघितली पण सन्मीशा अजून आली नव्हती..
त्याने फोन केला तर busy लागला..
आणखीन थोडा वेळ वाट बघायची असं त्याने ठरवलं..
क्रमश :