Aug 09, 2022
प्रेम

जिवलगा

Read Later
जिवलगा

????जीवलगा???? भाग 1????

(स्थळ - पुणे, कॉलेज चे छोटेस टिपीकल कँटीन- चालवणार एक अण्णा साउथ इंडियन सर्व मुले मुली आण्णा च हाक मारत, त्याच्या कडे काम करणारा एक 15 वर्षाचा मुलगा सर्व त्याला
 छोटु बोलत असे.)

जय येतो सर्वाना हाय करतो, छोटु चहा आणी कॉफी चा ट्रे घेऊन येत असतो, जय एक ब्लैक कॉफी चा ग्लास उचलतो...एक घोट पितो आणि तसाच बाजुला थुकतो याक हे काय आहे छोटु???? तसाच छोटु हसायला लगतो आणी त्याचा ग्रुप पण...मग तो अण्णा ला आवज देतो ...क्या अण्णा ये...तसे तो अण्णा सांगतो जय बाबा ही दिया दिदि ची स्पेशल कॉफी आहे..????
जय म्हणतो कॉफी विष आहे ते????????
छोटु सांगतो त्या दिदि तशीच कॉफी घेतात खुप कॉफी पावडर आणी दुध, साखर अजिबात नाही....☺️
तो आपल्या घोळक्यात जातो तितक्यात दिया येते छोटु कॉफी कुठे विचारत...

सर्व मुले- मुले पदवी च्या दुसर्या वर्षा ला असतात, जय एक अति श्रीमंत उद्योग पतिचा एकुलता एक मुलगा, त्याची आई गुजराती आणी वडिल मराठी असे मिश्र वातावरणात वाढलेला गुणी बाळ.

दिया सध्या मध्यम वर्गिय कारकूनाची मुलगी,साधे असले तरी घरिची परिस्थिती छान असलेली, 3 बहिनी आई- वडिल असे कुटुंबाचे सदस्य असलेली. आई बाबा  नाशिक मधे राहणारे, शिक्षणा साठी ही इथे पुण्यात राहत होती.

ते दोघ एकाच ग्रुप मधे होते पण त्यांची फारशी ओळख नव्हती पण जय खुप बोलका आणि दिया पण तशीच फक्त ओळख व्हायची देर मग मैडम फुल ऑन....

जय तिला म्हणाला काय ग हे कॉफी सोडून विष काय पिते???????? कसले कडू औषधा सारखे आहे...
तशी हसुन ती म्हणाली अरे मला तसेच आवडते रे...☺️
छोटु ने दियाला तिची कॉफी आणुन दिली....
मस्त गप्पा टप्पा करत सर्व मित्रांची भेट कँटीन मधे संपली....

सर्व घरी जायला लागले..

जय दिया कडे गेला तू कुठे राहतेस...दिया कोथरुड ला तिच्या एका मावस बहिणी सोबत एका 1 Bhk मधे राहत होती..

जय पण तिथेच कर्वे नगर ला एका बंगलो मधे राहत होता... 

ते दोघे बोलत बोलत पार्किंग मधे आले, त्यानी एकमेकांना बाय करुन घरी गेले...

कॉलेज मधे त्यांचे रोज भेटीगाठी होत होत्या, नंबर पण दिले, मेसेज मे छान गप्पा मारत होते ते....

जय दिया ला खुप जपयचा..कारण तिने कधीच त्याच्या पैसे पाहून मैत्री केली नाही किंवा मैत्री मधे कधीच तिने त्याचे पैसे वापरले नाहित...

दिया जय च्या मनात एक घट्ट जागा करुन रहिली होती पण त्यात ती मैत्रीण पेक्षा जास्त काही भावना नव्हत्या....

दिया ला पण जय सर्वात जवळचा मित्र होता ज्याच्या सोबत ती काही ही शेयर करु शकत होती...

जय तिला जीवा पाड जपायचा...तिला नूड्ल आवडतात म्हणून तो एकदा  तो तिला मोठ्या चायनीज होटेल मध्ये घेऊन गेला...ती अश्या होटेल ला कधि गेली नव्हती म्हणून ती जरा बावरलेली होती, ऑडर देऊन 10 मी झाली..वेटर नूड्लस आणी चॉप स्टिक घेऊन आला...

स्टिक बघुन दियाला घाम फुटला????कारण तिला त्यांने खाता येत नव्हते...जय ने काय ते बरोबर ओळखले आणी त्यांने मस्त शर्ट ची बाही वर केली आणि हाताने खायला लागला ते बघुन दिया अवाक झाली... तो बोलला अग मला नाही आवडत ते स्टिक ने खायला तू पण खा हाताने बिंदास्त...???? दोघे मस्त खाऊन बाहेर आले...बाहेर येउन ते दोघे खुप हसले आणि दंगा मस्ती करत...जय च्या गाडी गाव भर फिरुन दोघे घरी आले, घरी आले तरी मेसेज, कॉल चालू असत....बघता बघता परीक्षा आली आणि संपली....

सुट्टी साठी ती नाशिक ला गेली...आणि जय इथेच पुण्यात.......

To be continued ......

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now