Jan 26, 2022
नारीवादी

बिनपगारी मोलकरीण

Read Later
बिनपगारी मोलकरीण

  समाजात एक नववधुकडे बघण्याचा दुष्टीकोण सारखा आहे. समाज,अमीर, गरीब,जात,प्रांत,राज्य कोणतेही असो तेथे नवीन सुन ही पहिल्याच दिवशीपासुन बिनपगारी कामवाली ठरते. ती जेव्हा आईच्या घरुन सासरी येते तेव्हा तिच्याकडे संसारीक ज्ञानाची कमतरता असते. ती ते ज्ञान आईच्या पोटातुन शिकुन आलेली नसते. ती आलेल्या अनुभवातुन प्रत्येक गोष्ट क्रमाक्रमाने शिकत जाते.

     प्रत्येक सासुबाईच्या मते, नवीन सुनेने त्याच्या अपेक्षा प्रमाणे प्रत्येक काम अचुक केले पाहिजेत. पण सुरुवातीच्या दिवसात घरकाम,पैपाहुणे,नवर्याच्या मागण्या,सासुसासर्याची सेवा यात ती पार थकुन जाते. त्या कारणाने तिला एखाद्या वेळेस झोप येते. ति शक्यतो झोपत नाही. सासुच्या अनामिक भितीमुळे म्हणा किंवा घरातली जबाबदारीमुळे म्हणा तिला झोप घेणे शक्य नसते.

     सगळे काम तिलाच येतात म्हणुन सासुबाई तिच्यावर प्रत्येक कामचे भार टाकते. ति ही मग आपले सगळे कामे चांगले करायचे प्रयत्न करते. पण तिला कोठे माहित असते ते ह्या कारणाने तिला बिनपगारी मोलकरीण केले जात आहे.

    काही ठिकाणी स्वतःची तब्येत ठिक नसते म्हणुन कमी वयातच मुलांची लग्न केली जातात. काय म्हणुन तर नविन सुन आली तर घरातली कामे चांगली होतील. प्रत्येक सुनेला घरातील कामे करावीच लागतात. पण प्रत्येक कामे तिच्या अंगावर टाकणे मला तर चुकीचे वाटते. साधा ग्लास भरुन पाणी ही तुम्ही तिला द्यायला सांगतात. मग ती जेवत असो वा घरकाम करत असो. तिने हातातली कामे सोडुन चटकन पाणी दिले तर ति चांगली सुन पण कामे सोडुन पाणी नाही दिले तर ति दुष्ट सुन घोषित होते. ति एक गोष्ट तिची सासु जो तो घरात पाहुणा येतो त्यांना सांगत बसते. पण ती घरातली कामे ताप असला तरी करते हे मात्र कोणतीच सासु पाहुण्यांना सांगत नाहीत.

    सुन हि एक सजीव आहे ती काही राँबोट यांत्रिक मशीन नाही प्रत्येक काम चुटकीसरशी करायला. तिला हि भावना असतात. आपण चांगली सुन बनु शकत नाही ह्या कारणाने ती दरवेळी तणावात असते त्यामुळे ती आपला जीवही देते. परंतु त्या गोष्टीचा सासरच्या मंडळीवर काहिच परिणाम होत नाही.

     नववधुला सगळ्यात पहिले आपल्या नवर्याच्या आधाराची गरज असते. फक्त तो असतो ज्याला सगळ्याची सवय माहित असते. काही प्रमाणात तो तिला ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे समवुन सांगु शकतो. पण तो हि आईवडीलांच ऐकुन तिला घालुन पाडुन बोलतो. तेव्हा तिचा एकमेव आधारही नाहिशा होते.

     ती मग आपल्या चांगल्यासाठी कोठेतरी धुणीभांडीचे काम करायचे निश्चय करते. कमी वेळ कमी पगार अस तिच ठरले असत. तिला वाटते की ती घरापासुन दुर राहिली तर तिचा मनस्ताप कमी होईल पण अस न होता. घरातली कामे आणि बाहेरची कामे तिला करावे लागतात. त्यातल्यात्यात तिच्या नवर्याला फुक्कटच खायची सवय होते. त्या कारणाने तो कामावर जाईनाशा होतो.

     एवढ्या काळात ति दोन अपत्याची आई होते. तिच्या मनात असुनही ती धुणीभांडीच काम आणि बिनकामाचा नवरा सोडु शकत नाही. अशा प्रकारे ति आयुष्यभरासाठी बिनपगारी मोलकरीण होऊन जाते.

   वरील गोष्टी फक्त अडाणी मुलीसोबत घडत नाहीत तर यात खुप प्रमाणात शिक्षित मुलीच्या सोबत तसंच घडत आहे. म्हणुन हा लेख लिहिला गेला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reena Pawar

Simple is beatiful