प्रेमाचे क्षण गवसले
भाग 26.
एकदिवस मात्र सासूबाईला मुलीचा फोन आला ,ती म्हणाली आई आता तू माझ्या घरी येऊ शकतेस..सासूबाई गेल्या आहेत..पण त्या आठ दिवसांनी येतील..मीच पुन्हा बोलावले आहे तर तोपर्यंत तू ये...इकडे दादा वहिनीला ही निवांत वेळ मिळेल एकमेकांसोबत..खूप दिवस ते कुठे बाहेर फिरायला गेले नाहीत..तू असल्यावर त्यांना बाहेर फिरायला वेळ मिळत नाही ,दादा तर वेळ काढत नाही..वहिनी तक्रार करत नाही पण तिला का सतत त्रास...तिची बाजू तू समजून घेत चल..जशी माझी ननंद माझी बाजू घेते...त्यात तूच त्यांना सांग बाहेर फिरायला जा...तसे ते स्वतःहून जाणार नाहीत...
सासूबाई ही लगेच समजूत घातल्यावर सुनेला आणि लेकाला म्हणाल्या ,मला ताई कडे नेऊन घाल...सासूबाई नाहीत तोपर्यंत मी जाऊन येते लेकीकडे...आणि हो मी नसेपर्यंत तुम्ही दोघी ही कुठे तरी फिरून या...मग पुढे संधी नाही...माझी कटकट फक्त आठ दिवस तिकडे असेल ,मग पुन्हा आहेच तुमच्या मागे...
"आई नको आम्ही कुठे ही जायचा प्लॅन केला नाही ,तुम्हाला जायचं तर तुम्ही जाऊन या.."
तिला सासूबाई पुन्हा म्हणाल्या, "मी आठ दिवस जाते..मी पुन्हा पुन्हा सांगते. नाहीतर लेकीला जाब द्यावा लागेल.."
"बरं आहे आम्ही उद्या ठरवतो ,आज जरा नाटक बघून येतो..तुला यायचं असेल तर चल तू ही आमच्या सोबत.." मुलगा
"नको इथे ही मी सोबत कश्याला हवी आहे..नात नातू आहेत जरा बोलते त्यांच्याशी.. मग आठ दिवस नसेल मी.."
"फार लाड करू नकोस..चाललंय ते बरंय आहे"
"फार लाड करू नकोस..चाललंय ते बरंय आहे"
मुलगा आईला सांगून ठेवतो की तू बोलायला जाशील ,त्यांना नाही आवडले तर पुन्हा आवाज वर करून बोलतील..तितक्यात शशांक ऐकतो..त्याला आठवते आजीला उलटून बोललो होतो ,पण मग सतत असेच कोण बोलणार..एकदा झाली चूक म्हणून तीच परत का ऐकवायची..
आजीच्या मनात का वाईट घालायचे..बाबांचा राग आला होता. पण ठरवले त्यांना चांगले वागवून दाखवू मग त्यांना पटेल..आपण बदललो हे समजेन...समर्था आज तिच्या जॉबच्या ठिकाणी गेली होती ,तसे तिने शशांक ला संगीतले होते..आज सातवा दिवस होता..आणि अजून तिने आई बाबांना सांगितले नव्हते..
तिला पहिल्या पगारात त्या तिघांना आणि दादाला काही तरी गिफ्ट घ्यायचे होते.. आणि तेव्हा जॉब बद्दल सांगायचे होते .
पण आता त्यांना शिक्षा म्हणून आई बाबा ने बोलणे बंद केले,कामापूरते बोलत असे
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा