Login

प्रेमाचे क्षण गवसले भाग 24

प्रेमाचे क्षण
प्रेमाचे क्षण गवसले

भाग 24

"काय झालं रे..?"

"आज केस आपोआपच सुटले बघ..?"

"ते अरे ते असेच सुटले.."

"इतक्या दिवसात कधीच नाही सुटले.."

"हो आज सुटले ,त्यांना वाटलं सुटाव.. जरा मोकळी हवा घ्यावी..मोकळीक मिळावी म्हणून वेडे सुटले.."

"पण त्यांना सांग तुम्ही ईथुनपुढे हा सुटण्याचा प्रयत्न ही करू नका, हिम्मत ही करू नका चुकून.." तो तिची बट हातात घेऊन खेळत म्हणाला

तिला काही कळले नाही हा असा का म्हणतो ,आता त्याला मोकळे केस आवडत नाहीत का ?? त्याला ही मी ती तशी हवी का बांधलेल्या केसांची थकलेली बायको..मन बदललं आहे त्याचं की मन उठल आहे माझ्यावरून ??

"असे का म्हणतोस तू?"

"अग त्यांनी का सुटायचे तू सोडशील ना त्यांना ,किंवा मी सोबत असेल तर मी सोडेन त्यांना मोकळे.. आज जसे तुला मोकळे सोडले तुझे आयुष्य जगायला तसेच..खरे तर तुला मोकळीक देऊन मी मोकळा झालो असा भाव येत आहे..तुला अडकवून ठेवले तेव्हा विचार ही नाही केला तुझ्या आवडी निवडीचा. "

"मीच विचार नाही केला तर इतर कोणी का करेन.." ती हळूच म्हणाली

"तुला जबाबदारी सोपवली तेव्हापासून तुझे हे केस बांधले गेले जुड्यात ते कायमच तसे राहिले..व्याप सुटता सुटत नव्हते ,पण ताई आणि मी ठरवले तू अडकून राहायचे नाहीस ,आई मध्ये नाही आणि आई म्हणून ही नाही..." तो असा बोलत होता आणि ती बघत होती शून्यात..


"तुला माझ्यासाठी हे वाटले ते योग्य वेळी वाटले ,नाहीतर मी तुझ्या बद्दल ही आता नकारात्मक विचार करण्याच्या मानसिकतेत पोहचले होते..तू ही त्याच नवऱ्यामधील एक जो स्त्री फक्त जबाबदारी घेण्यासाठी असते समजणारा.."

त्याने तिला जवळ घेतले आणि तिला वचन दिले इथून पुढे तुला हवे ते कर मी सोबत आहे..मोकळी फक्त ह्यासाठी नाही की तू घरातील व्यवहार सोड ,ह्यासाठी दिली की तू मनमोकळे जग...गायन कर..पैंटिंग कर...आणि मैत्रिणीसोबत तू ही फिरायला जा...

"मी चहा घेऊन येते मग एक गम्मत सांगायची आहे.." ती

"गम्मत सांगायची आहे.."

"हो अरे,आजपर्यंत झेप कशी घेऊ हा विचार करत होते ,पण आज खरी झेप घेतली आहे..पण पैसे खर्च झाले आहे..पर्स रिकामी केली आहे त्या नादात..मला वाईट वाटत आहे.." तोंड पाडत