Login

प्रेमवीर भाग 5

Short lovestory

वीर ला हे जीवन नकोशे वाटू लागले. त्याला आत्महत्या करावीशी वाटली. पण तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्याचा पूर्ण परिवार आला. त्याचे वडील आले. कारण आई तर हे जग सोडून गेली होती आणि अशा वेळेस जर आपण ही मूर्खपणा केला तर आपल्या वडिलांची काय हालत होईल? संगीतावर आपण प्रेम केले ती आपल्याला सोडून गेली. तर आपला परिवार आपल्यावर इतकं प्रेम करतो त्यांना आपण कसं सोडून द्यायचं? माझ्यात आणि संगीतामध्ये काय फरक राहिला?

      मग तो घरी गेला. सगळे पाहुणे मंडळी लग्नासाठी आले होते ती हळूहळू परतीच्या वाटेवर निघाले.ह्यात ठाकूर परिवार ही होता. वैशुही होती.त्यांनाही नवरी पळून गेल्याची बातमी समजली. वैशू ही मुलगी विरच्यां आईने आधी पसंत केलेली मुलगी होती.

       सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. एक आनंदोत्सव क्षणात शोकाकुल वातावरणात परावर्तित झाला. वीरला आता काय करावे समजत नव्हते. सगळ्यांनी त्याला खूप धीर दिला. त्याला समजावले.

       असेच काही दिवस गेले. वीर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. वीर आता ग्रॅज्युएट झाला. आता या गोष्टीतून पुढे जायचंय असे विर नी ठरवले. त्याने पुढचे शिक्षण घ्यायचे ठरवले. घरच्यांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. विरने पोस्ट ग्रॅज्युएशन ला ऍडमिशन घेतले.

        वीर पोस्ट ग्रॅज्युएशन चे शिक्षण घेत असताना त्याला वैशू चे स्थळ आले.वैशू तशी वीरच्या आईची पसंत होती. परंतु, त्यावेळेस विरच्या मनात संगीता असल्याने त्याने वैशू ला नकार दिला होता. आता वैशू चे स्थळ पुन्हा चालून आल्याने वीर च्या वडिलांनी त्याच्या कानावर ही गोष्ट टाकली. वीर तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा असं तो वडिलांना म्हणाला. कारण एकदा त्याच्या मनाने वागून एक अनुभव त्याने घेतला होता.

          वीर ला वाटत होते आता तो पुन्हा प्रेमात पडू शकणार नाही. परंतु, आयुष्यभर आपण एकटे राहू शकत नाही तर लग्न करावे लागले. म्हणून त्याने वैशुला होकार दर्शवला.

   पुढे काय होते बघूया पुढच्या भागात...........

🎭 Series Post

View all