Login

प्रेमवीर भाग 3

Short lovestory

जेव्हा वीर आईला संगीताबद्दल सांगतो, तेव्हा आई विरवर थोडी नाराज होते, चिडते. ती त्याला समजते की, मी तुझ्यासाठी एक छान मुलगी बघितली आहे. ती दिसावयास सुंदर तर आहेच परंतु तिचं घरदार सर्वच गोष्टी उत्तम आहे. ते स्थळ तुझ्यासाठी योग्य आहे. पण पण वीर आईला सांगतो,"आई, ती मुलगी कितीही चांगली असली तरी माझं तर संगीतावर प्रेम आहे ना."

आईही मग विरला समजून घेते.असेच काही दिवस जातात. या काळामध्ये वीर ची आई खुप आजारी पडते. वीर च्या आईला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेले असते. त्या काळात कॅन्सरवर योग्य उपचार नसल्याने आईचा आजार अजून बळावतो. इतका की तो शेवटच्या स्टेज पर्यंत पोहोचतो. आईला मुंबईला उपचारासाठी नेण्यात येते. परंतु, बराच उपचार घेतल्यानंतर ही डॉक्टरांनी सांगितले की, आता हा आजार बरा होऊ शकत नाही. आईकडे आता आता काही दिवसांचाच कालावधी आहे. तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. असं विरला व त्याच्या घरच्यांना सांगितलं. या परिस्थिती वीर आतून बराच तुटून गेलेला असतो. या परिस्थितीत संगीतही विरला मानसिक आधार देते.

        त्यानंतर आईला वाचवण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात आणि एक दिवस आई सर्वांना सोडून हे जग सोडून परत नाही येणार वाटेवर चालली जाते. विर तर पूर्णपणे तुटून गेलेला असतो. कारण वीर आईच्या खूप जवळ असतो.

     नंतर घरातली कोणी व्यक्ती वारल्यानंतर तीन वर्ष लग्न करत नाही अशी प्रथा आहे. म्हणून घरचे एक वर्षाच्या आत वीर आणि संगीताचं लग्न करावयाच ठरवतात. दुःखामध्ये सुद्धा सर्वांना थोडा आनंद होतो. लग्नाच्या तयारीला सुरुवात होते.

   वीर आणि संगीताचे लग्न कसे होते? पुढे काय होते? बघूया पुढच्या भागात.

क्रमशः.............

🎭 Series Post

View all