प्रेमाचे क्षण गवसले
भाग 27
इकडे हे दोघे खरेदीला गेले होते, एक नाटक पाहिले...माउंट अबू साठी हॉटेल बुक केले ,तिकीट बुक केले आणि आता काहीतरी खाऊन घरी निघणार होते..त्यासाठी हॉटेल मध्ये आले होते..
"कोणती जागा पाहू,आत बसू या कोपऱ्यात..?" तो लगेच म्हणाला
"हो कोपऱ्यात बसून गप्पा मारू,आठवणी ताज्या करू ." ती त्याला हात धरून कोपऱ्यातील टेबल कडे घेऊन जात होती
त्याने ही मग मुद्दाम हात पकडला आणि दोघे बसणार इतक्यात त्याने तिला थांबवले..
"थांब जरा काही खास वागणूक मिळाली पाहिजे तुला आज.." तो तिच्या डोळ्यात बघून म्हणाला
आणि हसून तिच्या साठी खुर्ची मागे घेतली आणि मग म्हणाला ,"प्लिज हॅव अ सिट माय डिअर बेऑटिफुल लेडी.." आणि त्याने हळूच मागून फुल काढत ,तोंडात धरलं आणि तिच्या समोर खाली गुढग्यावर बसून तिला पुन्हा प्रपोज केले आणि मग ती हो म्हणाल्यावर तिला फुल देत तिच्या हातावर किस केलं...तिने ही त्याच्या माथ्यावर किस केले..आणि त्याला हात देत उठवले.
"मागे म्युझिक चालू आहे आणेशा.." तो तिला चल सोबत डान्स करू असे खुणावत म्हणाला
"मग काय इरादा आहे तुझा." ती हसत म्हणाली आणि त्याचा मूड बघून नकार न देता हात पुढे केला.
तिने आज काही नकार दिला नाही हे पाहून नवरा खुश झाला ,तिच्या कडे एकदम चकित होऊन पाहू लागला..
"आज दिवस पुन्हा उगला ,तो तसा. "
"हम्मम्म,पण तसा म्हणजे कसा सांगशील का मला ?" डोळे मिचकावत ती म्हणाली
त्याने तिला आपल्या कडे हळूच ओढले आणि तिची बट जी तिने मागे पिन लावून पॅक केली होती ती हळूच सोडत म्हणाला ,"असा..म्हणजे हृदय पुन्हा धडधडायला लावणारा..तुला बघून पुन्हा प्रेमात पडणारा...जसा एक कॉलेजमध्ये अचानक पणे मला लाभला होता..तू एक challenge स्वीकारायला लावले होते ,आणि ते कोणी ही घेण्यास तयार नव्हते ,ते मी पुढे येऊन स्वीकारले होते..ते कठीण होते पण तुला बघून ते मी स्वीकारले होते..तुझ्यासाठी..तुझ्या जवळ येण्यासाठी..तुझी इमेज कॉलेजमध्ये अतूट रहावी..म्हणून मी बळी जायला तयार होतो..कठीण challenge होते, त्यात ते कोणी ही स्वीकारणार नाही हे तुला वाटत होते..म्हणून ते जर कोणी घेतले आणि जिंकले तर तू त्याच्या सोबत डान्स करशील असे म्हणाली होतीस..तेव्हा ती डॅशिंग मुलगी मला खूप आवडली होती..आणि मी म्हणालो हे धर्य मी करून दाखवतो.."
"अरे हो आठवते मला,सावळा उंच मुलगा,त्याचे ते रूप..त्याची गंभीर मुद्रा आणि तशीच त्याची वाणी..त्याला पाहून वाटले होते..ह्यानेच जिंकावे ते challenge आणि मग मी हारून जावी.. आणि त्याच्या सोबत मी डान्स करावा..खरंच सगळे तन मन हरवले होते तुला पाहून...तू बघतच होतास माझ्याकडे..ते पाहून दोन तीन वेळा मी ही मुद्दाम बघत होते तुझ्या डोळ्यात ,आणि मग मलाच काय वाटले माझे मला कळेना..मग नजर मिळवू शकले नाही..मी नजर चोरत राहिले..पुन्हा तुझ्या डोळ्यात पहायची हिम्मतच झाली नाही..कारण..."
ती पुढे काही बोललीच नाही ..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा