Jul 04, 2022
प्रेम

नाते व्यक्त करण्या पलीकडचे.

Read Later
नाते व्यक्त करण्या पलीकडचे.

नातं - शब्दा पलीकडचं.


आपल्या रोजच्या जगण्यात आपला खूप लोकांशी संबंध येतो.त्या प्रत्येक माणसाशी आपलं एक नातं जोडलेले असते.आई - वडिलांचं , भावा - बहिणीच , सूनेच , मुला - मुलीचं,मैत्रीचं, ऑफिस मधील कलिग च,विश्वासाचं ,ओळखीचं अस कोणतही, पण नातं असत.

या सगळ्या नात्यांना एक विशिष्ठ ओळख,नाव असते.प्रत्येक नात्याची वेगळी ओळख असते.पण कधी कधी इतकी नाती असूनही आयुष्यातील अडचणी कोणाला सांगता येत नाहीत.मन मोकळं करून बोलता येत नाही.अडचणींना सामोरे कसं जावे समजत नाही.सगळे अवती भोवती असूनही आपण एकटेच असतो.अस होत ना ??

काय करावं,कोणाशी बोलावं असा प्रश्न पडतो.पण आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जी आपली प्रत्येक अडचण स्वतःची आहे अस समजून सोडवत असेल,तिच्याशी बोलताना संकोच वाटतं नसेल, प्रत्येक संकटात आपल्या सोबत असेल, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला सोडून जाणार नसेल तर. 

तर आयुष्य किती सुकर,सोपे होऊन जाईल ना ??


अशी नाती शब्दात व्यक्त करण्या पलीकडची असतात.म्हणजे त्या नात्याला काही नाव देण्याची, ओळख देण्याची गरज नसते पण ते नातं असत आणि महत्वपूर्ण असतं.

कधी कधी आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येते की तिच्यासोबत बोललं, वेळ घालवला ,मनातल्या सगळ्या भावना व्यक्त केल्या की मोकळं वाटायला लागते. आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीला तोंड देताना कोण आपलं आहे आणि कोण परक हे समजतं. हळू हळू नातं उलगडत जातं कधी कधी ,स्पर्शातून,वागण्यातून,अडचणीतून.

मग स्वभाव आणि मनं जुळायला लागतात.एकमेकांनचा सहवास आवडायला लागतो,एकमेकांसोबत वेळ घालवावा वाटतो,ओढ लागते.आणि नातं फुलत जात.इतकं घट्ट होत की कधी हे नातं सर्वात जवळच होऊन जातं कळत ही नाही.

 असं एखाद नात जर आपल्या जीवनात असेल तर ?? असं नातं जे मैत्रीच्या पलीकडे पण प्रेमाच्या अलीकडे आहे.नातं कोणतही असो जपायला हवं अगदी मनापासून.कारण नातं मनातून निर्माण होते.नाती ही जगण्याचा पाया असतात. त्यामुळे नात्यात तफावत आली तर आपल्या मनावर परिणाम होतो.


कोणत्याही नात्याचा पाया विश्वास असतो.अस नातं जिथे आपण आपल्या मनातील प्रत्येक भावना, इच्छा,घटना व्यक्त करू शकतो.कोणत्याही विषयावर अगदी मोकळे पणाने,संकोच न करता बोलू शकतो.असा विश्वास असतो की काहीही झालं तरी ज्या माणसासोबत नातं आहे ती व्यक्ती आपल्या सोबत आहेच आहे.कोणीतरी आपल्या सोबत आहे ही भावनाच किती बळ देते जगण्याला.

जीवन जगत असताना खूप अडचणी येतात,उदास वाटतं, एकटं वाटायला लागते,कधी कधी जगण्याची उमेद संपून जाते. कधी मन इतकं व्यग्र होऊन जातं की शब्द च निघत नाही तोंडातून.अशा वेळी जर कोणी फक्त आपल्याकडे बघून आपल्या मनातील भावना समजून घेतल्या तर ,आश्वासक नजरेने " मी आहे ना " म्हणणार कोणी असेल तर ,मोकळे पणाने रडता येईल असा हक्काचा खांदा कोणी दिला तर,तर अडचण अडचण रहात नाही.आयुष्यातील कितीही मोठी समस्या सहज पेलण्याची ताकद वाढते आणि आयुष्य जगण्याची वेगळीच मजा येते.

नात्यात गोडवा हवा,रुसवे फुगवे हवे,राग हवा,भांडणं हवेत पण गैरसमज आणि संशय नको.अशी कोणतीही गोष्ट नको ज्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होईल.

नात्यांची मजा ती उलगडण्यात आहे.अस एखाद उलगडलेलं,समजून ,उमजून निर्माण झालेलं, मनाने जोडले गेलेले नाते आपल्या आयुष्यात असेल तर आणखी काय हवं?? नाही का.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now