Login

नातं.. भाग 1

नात्याची वेगळी परिभाषा सांगणारी कथा..


" काय चुकलं होतं माझं???... त्याच्या चांगल्याचा विचार केला हे की त्यात स्वतःला विसरले हे???.. मी मैत्री निभावत होते आणि त्याने माझ्या हेतूवरच शंका घेतली.. खूप समजून घेतलं, पण त्याने फक्त गृहीत धरलं.. सोबत घालवलेला क्षण आनंदी व्हावा, छान व्हावा म्हणून प्रयत्न करत राहायचे.. काय मिळालं मला त्या बदल्यात, फक्त मन:स्ताप.. तूच सांग कशी आधीसारखी वागू मी त्याच्याशी??? "   :  शाश्वती


" I am sorry शाश्वती, माझा गैसमज झाला.. मला वाटलं की तू कुठलातरी राग ठेवलायस आणि म्हणून त्याच्याशी बोलणं टाळतेयस.. "   :  काव्या


" मला तुमच्यापर्यंत खरं येऊ द्यायचं नव्हतं.. कारण या गोष्टीची जितकी चर्चा झाली असती, तितका मलाच त्याचा त्रास झाला असता.. म्हणून मी एकदमही नातं तोडलं नाही.. कारण त्याने माझ्या अडचणीच्या काळात माझी मदत केलीये, हे नाही विसरू शकत मी.. त्या कृतज्ञतेपोटी माणूसकीचं नातं आजही ठेवलंय.. "    :  शाश्वती


" हे सगळं ऐकल्यावर खरं तर तुला हा प्रश्न विचारावा की विचारू नये हेच कळत नाहीये मला.. पण  "   :  काव्या


" काव्या, निसंकोचपणे विचार काय विचारायचं आहे ते.. "   :  शाश्वती


" शाश्वती, अन्वयने आपल्याला सगळ्यांना भेटायला बोलावलंय.. खूप वर्षात भेटलो नाहीये ना.. तर तू येशील का?? "   : काव्या


" माहित नाही.. "   :  शाश्वती


ठरलेल्या दिवशी सगळे भेटतात.. अन्वय शाश्वतीला एकांतात गाठून तिची माफी मागतो.. "  तू बोल हवंतर मला रागाने.. ओरड.. मार पण अबोला धरू नकोस, प्लिज.. "

" वेळ निघून गेलीये अन्वय.. सगळ्याच गोष्टींची.. "   :  शाश्वती


त्यांचं बोलणं सुरु असताना पाठून कोणतरी जोरात काहीतरी फेकून मारतं.. तेच अन्वयच्या पाठीत घुसतं.. तो त्याच क्षणी जमिनीवर कोसळतो..


" अन्वय.. "   :  शाश्वती जोरात ओरडते.

🎭 Series Post

View all