सेजल पुंजे एक प्रतिभावंत लेखिका . खूप छोटी असूनही तिच्यात समंजसपणा खूप आहे. खूप काही शिकण्याची तिची इच्छा आणि सतत लेखन करण्याचा तिचा ध्यास आहे ही तिच्या मधील लेखिकेची चुणूक दाखवून देतो. माझी लाडकी श्रावू उर्फ सेजल सामाजिक सोबत प्रेमकथा उत्तम लिहिते आणि ती एक उत्तम कवियत्री पण आहे. लहान वयात तिने तर माझ्या पेक्षा खूप काही भोगले. एकीकडे शिक्षण चालू असताना तिचे लेखनात सातत्य होतेच. आई वडीलांच्या आजार पणात ती कधीच खचली नाही उलट त्याचा ती आधार बनली. वडीलांच्या अकाली जाण्याने तिच्यावर तर आभाळाच कोसळले पण तीच जणू मी या घरातील कर्ती आहे अशा प्रकारे ती कणखर भूमिका घेऊन ती घराचा आधार झाली. काहीशी अबोल आहे माझी ही बहीण पण तितकीच ती खूप गोड आहे. प्रतिलिपी मुळेच खरंतर एवढी गोड बहीण मला भेटली.
खरंतर अगदी आम्ही एका ग्रुपमध्ये असूनही कमी बोलायचो त्यात ही कमीच ऑनलाईन असायची मग एका घटनेने आम्हा भाऊ बहीणच सुंदर नाते जडले आणि मी तिला माझी मानलेली सख्खी बहीण मानले. तिची काळजी घेणे मला खूप आवडते. माझी ही बहीण खूप स्वावलंबी आहे कितीही अडचणी आल्या तरी नकारात्मक होत नाही, निराश होत नाही तर आत्मविश्वासाने त्यावर मार्ग शोधून मात करते. तिच्या कविता कधी कधी ना वाचताना खूप सुंदर वाटतात की आपोआप दाद द्यावीशी वाटते. अश्या या बहिणी सोबत कधी कधी कॉल वर ही बोलणे झाले असले तरी तिला भेटायची मला खूप इच्छा आहे. तिचे लाड पुरवायचे आहेत आणि या भावाचे तिला भरभरून प्रेम द्यायचे आहे आणि मला खूप प्रतिक्षा आहे तो क्षण लवकर यावा. सेजल ने नुकत्याच मागच्या महिन्यात झालेल्या लिपीवरील स्पर्धेत ती विजेती झाली तेव्हा सर्वांत जास्त मला आनंद झाला व तिचा अभिमान वाटला.
सेजल खरच खूप मेहनती आहे, ती माझ्या पेक्षा लहान असूनही मला तिच्या कडून खूप प्रेरणा भेटली. खूप काही शिकलो तिच्या कडून. तिच्या चेहऱ्यावरील सुंदर हास्य पाहिले की मला ही खूप छान वाटत की एवढीशी मुलगी संकटांना न डगमगता आभाळाला स्पर्श करायला बघते व त्यात यशस्वी ही होते तर मी का नाही करू शकत. माझ्या या लाडक्या बहिणीच माझ्या वर खूप प्रेम आहे आणि माझे ही तिच्यावर तितकंच आहे. तिच्या आयुष्यात काही महत्वपूर्ण गोष्ट घडली की ती मला हक्काने सांगते आपल मानून. माझी एकच इच्छा आहे माझ्या या बहिणीने खूप यश संपादन करावे व एक उत्तम लेखिका बनाव व तिच्या वर कौतुकाचा वर्षाव व्हावा व तिचा पुरस्कारांनी सन्मान व्हावा व ते बघायला तिचे कौतुक करायला मी तिथे असावं. डोळ्यात आनंदाश्रू शिवाय काही न नसाव व अभिमान असा दाटून यावा की ही माझी खूप मोठी लेखिका असलेली माझी सख्खी बहीणच आहे हे सर्वांना सांगावं. मूर्ती लहान पण किर्ती महान हे शब्द खरे व्हावेत हीच सदिच्छा माझ्या या लाडक्या बहीण सेजल करता.