दिसे सर्व प्रकाश....

भक्तीप्रद रचना साद मनातली भाव मनातला देवा तुझियासाठीचा
नाम तुझे घेता देवा
हट्टे अंधकार
उजळून दाही दिशा
दिसे सर्व प्रकाश

जीवातल्या प्राणात तू
वसशी शक्ति रुपे
कण कण असे सारा
तुझाच रे अंश

काय देवू तुला आता
तुची जगाचा रे पिता
भक्तीविना काही नाही
माझे हाती मोठे देवा

स्विकारूनी घेशील का?
भक्ती तुझ्या लेकराची
स्थान तुझे चरणाशी
देशील का मजलाही

नाम तुझे घेता देवा
हट्टे अंधकार
उजळून दाही दिशा
दिसे सर्व प्रकाश

©️®️ प्राजक्ता कल्पना रघुनाथ पानारी


🎭 Series Post

View all