थोडं तुझ थोडं माझ

घरात दोन पिढ्या असल्या की वाद हे होणारच पण ते कसे थांबवायचे, त्यातून काय शिकायचं आपण आपला ठरवाय?

" आई चल ना ग लवकर घरी, किती वेळ बोलत बसणार, मला खुप होम वर्क आहे,"  परी वैतागली होती,

"  हो आले ग, काकू मी करते तुम्हाला फोन नंतर" , सुलभाने स्कूटर स्टार्ट केली

" काय चाललय परी, दोन मीनट कोणाशी मोकळ बोलू देत नाही , काय घाई असते एवढी तुला??", भांडत दोघी घरी आल्या

" परीला कुठे नेऊ नये अशी आहे ही, कोणाशी बोलली नाही ही तिकडे", सुलभा सासुबाईना सांगत होती

"नाही ग आजी आई ना जास्त सांगते, तिकडे माझ्या कोणी ओळखीच नव्हत, आई उगीच नेते मला प्रोग्रामला "

" जिकडे बघावे तिकडे पुस्तक पडलेले, परिच कपाट एकदम खराब, बर आपण आवराव तर पुस्तकांना हाथ लावला म्हणून ओरडतात मॅडम, कसा होणार पुढे, परी पुस्तक कपडे आवर"..... आई

"कोणी येतय का आपल्या कडे??, नाही ना , राहू दे माझ समान अस" , परी चिडली होती

शाळेची वेळ झाली तरी परीचे आवरले नव्हते , आई ओरडत होती त्याकडे साफ दुर्लक्ष करून परी सावकाश वेणी घालत होते, " आईच नेहमीच आहे, काय करणार एवढ्या लवकर जावून शाळेत उगीच 10 मीनट गेट वर उभ रहावे लागते , आईला माझ्या सगळया  गोष्टीत मध्ये मध्ये करायच असत,  जस काय मला काही कळतच नाही "

आईच्या तोंडाचा पट्टा सुरू होता, " आटपत नाही लवकर, घरात मदत तर नाहीच, अजून काहीही काम येत नाही" 

आजकाल हे  नेहमी होत होते,  आई आणी परीच दोन क्षण पटत नव्हते  , किंवा त्या दोघी समजून घेत नव्हत्या एकमेकींना, परी टिनेजर, आईला ही मूड स्विंग .

आजी बघत होती हे, काय हे अस, एक मीनट शांतता नाही, तिने बोलायचा ठरवल दोघींशी, परी शाळेत गेली आजी उठून सुलभा जवळ आली

" मी करते पोळ्या तू बस जरा, गेली का परी शाळेत? " आजी

"हो आई, तुम्ही राहू द्या मी आवरते, "

"मला बोलायचा तुझ्याशी, तू आता हल्ली परीच्या फार मागे लागतेस, किती बोलतेस तिला? अग वेळ दे तिला जरा, ठरवू दे तिला काय ते , होतो वेळ तर होवू दे शाळेला , तिलाच शिक्षा होईल, अनुभव येवू दे, चांगल वाईट यातून समजेल तिला, आपण काय आयुष्यभर पुरणार आहोत तिला??तु का एवढा त्रास करून घेते??, त्याने तुझ्यात तिच्यात एक दरी निर्माण होते आहे ,  समजत नाही का तुला? आताच वेळ आहे, ही दरी तु मिटवू शकते"

आई ऐकत होती तिला पटत होत सगळ, तिने मनातुन बदलायचा निर्णय घेतला,

संध्याकाळी परी  घरी आली, आई घरी नव्हती, " आजी आई कुठे गेली ग? "

" काय ग का हवी आई? तुला तर ती आवडत नाही ना? तिने काही सांगितल  की मुद्दाम तू उलटे करते ना? बर झालं ती गेली आता गावाला, रहा तू नीट आता, तिच ऐकायला नको तुला , मुद्दाम अपमान करते ना तू तिचा, तुला माहिती आहे का? तुझ्या अश्या वागण्याने तिला किती त्रास होतो, कित्येकदा तू शाळेत गेली की ती रडत असते, जर तिला प्रेम देता येत नसेल तर त्रास तरी देवू नको, नाही पटल तिच तर सांग ना  नंतर, सावकाश बोल तिच्याशी, तिच्या अनुभवाचा फायदा होईल तुला, ती जे सांगते त्यातून शिक काही तरी, तिने किती केलाय तुझ, , आईच मान सम्मान  तुझ्या हातात आहे "

" नाही ग आजी मला आई आवडते, मी अस नाही करणार या पुढे, मी विचार करून वागेन, कुठे गेली आई?"

"अग बाजारात गेली, तू आवरुन घे "

आई आली, बघते तर परी आवरुन रेडी, घर आवरलेल,आजी जवळ बसुन होम वर्क सुरू होता , आई स्वैपाकाला लागली, आज परीचि आवडती खीर केली, आज आई काहीही बोलत नाही रागवत नाही परीचा आत्मविश्वास वाढला, अशी आई खूप आवडली, मनोमन ठरवला तिने नीट वागायच, आईच एकायच

आजीने आपल्या अनुभवातून हा प्रश्न मस्त सोडवला होता, घरात दोन पिढ्या असल्या की वाद हे होणारच पण ते कसे थांबवायचे, त्यातून काय शिकायचं आपण आपला ठरवायला हव.

घरातील मोठ्या व्यक्तीनी मुलांना समजून घ्यायला  हव, त्यांना थोडा वेळ द्यावा, कसे वागतात ते बघावे, उगीच उठ सुट सल्ले देत बसू नये

लहानांनी मोठ्यांचा मान ठेवावा, नसेल पटत एखादी गोष्ट तर सावकाश सांगावे, कधी कधी काही गोष्टी नाही जमत जेष्ठ मंडळीना तर त्याची टर न उडवता नीट समजून सांगावे, त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यावा,

एकमेकांसोबतचे  जगणे आनंदी करावे एकमेकांना समजून घेवून आनंद पसरवा, शेवटी आपण आहोत एकमेकांना, विचार करून बघायला काय हरकत आहे........

कथेचे सगळे अधिकार लेखिकेकडे राखीव  आहेत, नावासकट आणि जोडलेल्या लिंक सोबत कथा पोस्ट करू शकता. धन्यवाद !!

-- शिल्पा सुतार

------------------------------------------------------------------------