
तिच्या नाजुक कायेला
त्याच्या मिठीची आस
तिच्या नेत्रांतल्या स्वप्नांना
पुर्णत्व देण्याचा त्याचा ध्यास
तिची चिडचिड,तिची धुसफुस
तो मुकाट्याने ऐकून घेतो
का बरं चिडले त्याच्यावर
तीच मग मनाशी हळहळते
सांजेला आवरुन सावरुन
त्याचं हसून स्वागत करते
तोही मग गालात हसतो
चल फिरुन येऊ म्हणतो
दोन पाखरं पुन्हा एकसाथ
जातात दूरवर
शब्दांची गरजच नसते
नजरेनेच बोलतात
एकमेकांचे प्रमाद
सहजच स्वीकारतात
पुन्हा नवी आव्हानं झेलण्या
सज्ज होतात.
------सौ.गीता गजानन गरुड.