Jan 29, 2022
कथामालिका

तेरे इश्क की मुझको आदत है.. Part 3 अंतिम भाग

Read Later
तेरे इश्क की मुझको आदत है.. Part 3 अंतिम भागमंदारने गिफ्ट बघितल्यावर त्याला हे आपलंच हरवलेलं घड्याळ आहे, याची खात्री पटली. पण कोणी पाठवलं असेल हे?? नाव वगैरेही नाहीये काही यावर.. मंदार स्वतःशीच बोलत होता..

इतक्यात क्षमा आत आली.. क्षमा म्हणजे मंदारची नुकतीच झालेली लग्नाची बायको..

मंदार, काय रे.. काय झालं..??
काय एवढं निरखून बघतोयस त्या गिफ्ट मधल्या जुन्या घड्याळाकडे??  : क्षमा

क्षमा मंदारच्या दिशेने थोडं आणखी पुढे होऊन.. 
एक मिनिट.. बघू ती चिट्ठी.. काय लिहिलंय ते आणि क्षमाने ती चिट्ठी हातात घेतली..

तेरे इश्क की मुझको आदत है with heart image 

मंदार, काय आहे हे सगळं?? तुझं जर दुसऱ्या कोणावर प्रेम होतं तर तसं सांगायचं होतंस मला लग्नाआधी.. मी नसती जबरदस्ती केली तुझ्यावर.. तू विश्वासघात केलायस माझा.. मला एक क्षणही इथे थांबायचं नाहीये.. किती स्वप्न रंगवली होती मी आपल्या नवीन आयुष्याची आणि तू सगळं सुरु होण्याआधीच संपवलंस.. का केलंस तू मंदार असं?? का??

क्षमा बोलता बोलता रडायला लागली..

क्षमा.. हे बघ जे झालं त्यासाठी सॉरी पण खरंच तू समजतेस तसं काही नाहीये.. मलाही काही कळत नाहीये की माझं दोन वर्षांपूर्वी हरवलेलं घड्याळ आजच्या दिवशी कोणी पाठवलं.. आणि सोबत ही चिट्ठी.. मी स्वतःच गोंधळून गेलोय ग.. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव..     : मंदार समजुतीच्या स्वरात म्हणाला.

आतापुरता मी हा विषय बाजूला ठेवतेय पण तुला सिद्ध करावं लागेल की तू खरं बोलतोयस.. तरच मी विश्वास ठेवेन तुझ्यावर आणि जोपरेंत तू हे सिद्ध करत नाहीस तोपरेंत मी आपलं नातं मनापासून स्वीकारु शकत नाही..     : क्षमा

क्षमा अग.. ठीक आहे मी करेन सिद्ध की यात माझी काही चूक नाहीये..    : मंदार

दुसऱ्या दिवशी मंदार आणि क्षमाच्या लग्नाची पूजा झाली.. नातेवाईकांसमोर ते दोघ वरवर हसून बोलत होते पण रूम मध्ये गेल्यावर दोघांची तोंडं दोन दिशेला.. असेच काही दिवस गेले..

बिचाऱ्या क्षमाची तरी काय चूक होती.. कुठल्याही मुलीला लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याबद्दल असं काही कळल्यावर ती कशी शांत राहील..

मंदार त्या घड्याळ पाठवणाऱ्या माणसापरेंत कसं पोचता येईल, याचा विचार करत होता कारण त्याला क्षमाला आणखी दुखवायचं नव्हतं..

त्याला विचार करता करता लक्षात आलं की, त्याला आलेले ते निनावी फोन, बुके.. आणि त्यादिवशीची ती चिट्ठी.. हे सगळं करणारी व्यक्ती एकच तर नसेल ना.. शक्यता नाकारता येत नाही.

तो बुके देणारा म्हणाला होता की कोणीतरी फोनवरून ऑर्डर दिली होती म्हणून.. हा करेक्ट.. त्याला जाऊन भेटायला पाहिजे..पण कसं भेटणार तो बुके देणारा माणूस.. कसं शोधू त्याला..
तो दोन तीनवेळा आलाय बुके घेऊन.. कदाचित इथे कुठेतरी जवळपासच दुकान असेल बुकेचं.. मी जाऊन बघतो..

आणि तो निघाला.. वाटेत लागणारी सगळी दुकान तो तपासत होता.. खूप शोधल पण तो बुकेवाला कुठे सापडला नाही.. इतक्यात तोच बुकेवाला त्याला समोरून येताना दिसला..

अहो थांबा.. हो हो तुम्हीच..   : मंदार त्या बुकेवाल्याच्या दिशेने हातवारे करत होता..

अरे साहेब, तुम्ही.. मी खूप मोठा फॅन आहे तुमचा.. पण तुम्ही मला का बोलवलत.. बुके हवाय का तुम्हाला??   : बुकेवाला

नाही.. मला बुके नकोय.. तुमची मदत हवी आहे.. माझ्यासाठी तुम्ही जे बुके पाठवायचात ते कोण पाठवत होतं.. कोण ऑर्डर द्यायचं ते पाठवायला..     : मंदार

एकच मिनिट साहेब, हा तुम्हाला त्या माणसाचा नंबर मिळू शकतो.. डायरीत लिहिला असेल.. ते आम्हाला ऑर्डर पोचली हे सांगावं लागत ना..   : बुकेवाला

बर.. दे मला तो नंबर..   : मंदार

बुकेवाला नंबर आणून देतो..

थँक यू : मंदार

मंदार त्या नंबरवर फोन ट्राय करतो.. रिंग जाते पण कोण उचलत नाही.. तो सारखा तो नंबर लावून बघतो.. बराच वेळ रिंग जाते आणि समोरून हॅलो असा आवाज येतो..

समोरून हॅलो, कोण बोलताय आपण..

हॅलो, मी मंदार   : मंदार

मंदार.. मंदार महाजन का??   :  समोरून

हो, पण तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं..  : मंदार

मी सरिता..  : सरिता

तुम्ही कशासाठी फोन केलायत ते नाही सांगितलं तुम्ही..  : सरिता

मला एक दोनवेळा निनावी बुके आले.. आणि त्यासाठी या नंबरवरून ऑर्डर दिली होती.. आणि ते घड्याळ.. जे दोन वर्षांपूर्वी हरवलं होतं.. ते मला परत कोणीतरी पाठवलंय.. तुमच्याकडे होतं का माझं घड्याळ.. तुम्हीच पाठवायचात का ते बुके???     : मंदार एकामागून एक प्रश्न विचारत होता..

मंदार, तुम्ही मी दिलेल्या पत्त्यावर उद्या सकाळी पोहोचा.. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील..    : सरिता

बर ठीक आहे.. तुम्ही पत्ता पाठवा..   : मंदार

सरिता त्याला गावचा पत्ता पाठवते आणि एका मंदिराजवळ भेटायला बोलवते..

दिलेल्या पत्त्यावर मंदार दुसऱ्या दिवशी लवकर जायला निघतो.. 

क्षमा, माझ्यासोबत चल.. आपल्याला एका ठिकाणी जायचंय      : मंदार

पण कुठे?? : क्षमा

क्षमा, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना, मग चल माझ्याबरोबर..    :  मंदार

ठीक आहे.. येते मी..    : क्षमा

मंदारने गाडी काढली आणि ते गावच्या दिशेने निघाले..

मंदिरात सरिता त्याचीच वाट बघत थांबली होती..

मंदार.. तिने त्याला मागून हाक मारली

हाय.. मी सरिता   : सरिता

हॅलो, मी मंदार  आणि ही माझी वाइफ क्षमा   : मंदार

तुम्ही दर्शन करून या आत जाऊन मग आपण तिकडे बाकड्यावर बसून बोलूयात : सरिता

ओके : मंदार

चल क्षमा, आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ..   : मंदार

ते दोघेही मंदिरात आत गेले..

देवा, काय चूक होती रे माझी.. का असा खेळ मांडलास माझ्या आयुष्याचा.. तूच मार्ग दाखव आता आणि सत्याला सामोरं जायला बळ दे मला..   : क्षमा देवाकडे भरल्या डोळ्यांनी प्रार्थना करत होती..

मंदार आणि क्षमा दर्शन घेऊन बाहेर आले.. आणि ते तिघं जवळच असलेल्या बाकड्यावर जाऊन बसले..

सरिताने बोलायला सुरुवात केली..

मंदार, क्षमा.. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या लग्नाच्या शुभेच्छा..    : सरिता

थँक यू , सरिता   :  मंदार

मी सरिता पण गावात सगळे सरूच म्हणतात , मनूपण मला सरूच म्हणायची.. मनू माझी लहानपणापासूनची मैत्रीण.. तिला रेडिओ ऐकायला खूप आवडायचं.. तेव्हाच मंदारचा आवाज ऐकून ती त्याच्या प्रेमात पडली.. मग तो आवाज ऐकण्यासाठी ती निनावी फोन करायला लागली.. निनावी बुके पाठवताना घरच्यांना कळू नये म्हणून ती माझ्या नंबर वरून बुकेची ऑर्डर द्यायची .. गूगल वर search करून तिने त्या बुके शॉपचा पत्ता मला मिळवायला सांगितला.. कारण गावावरून बुके पाठवणं सोयीचं नव्हतं.. मंदार तू दोन वर्षांपूर्वी या गावात आला होतास.. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने.. तेव्हा फॅन्सच्या धक्का बुक्कीत तुझं घड्याळ पडलं आणि ते मानसीला सापडलं.. तिने ते जपून ठेवलं तुझी आठवण म्हणून..

हे सगळं असलं तरी तिला पक्क माहित होतं की तू कधीच तिला आयुष्यभरासाठी स्वीकारणार नाहीस.. तुला जर हे कळलं की एक छोट्या गावातली मुलगी आपल्यासोबत आयुष्य घालवायची स्वप्न बघतेय तर तू तिचा तिरस्कार करशील.. आणि तिला ते होऊ द्यायचं नव्हतं.. तिला फक्त तिचं प्रेम पोहोचवायचं होतं तुझ्यापरेंत..

आता कुठेय ती.. मला भेटायचंय तिला.. : क्षमा

क्षमा.. : क्षमाकडे मंदार आश्चर्यचकित होऊन म्हणाला

हो, मंदार.. मला भेटायचंय तिला..   : क्षमा

ती आज असती तर तिलाही आवडलं असतं तुम्हाला भेटायला..  : सरिता

असती तर म्हणजे ???  : मंदार

ती आता या जगात नाही.. तिच्या वडलांनी तिचं तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून द्यायचं ठरवलं.. तिने कधीच मंदारशिवाय कोणाचा विचार केला नव्हता आणि म्हणून तिने लग्नाच्या दिवशी विष पिऊन आत्महत्या केली.. पण जाण्याआधी तिने आठवण म्हणून जीवापाड जपलेलं तुझं घड्याळ तुझ्यापरेंत पोहोचवलं..      : सरिता

ओह नो, हे असं व्हायला नको होतं..  : मंदार

आणि ती चिट्ठी, ज्यात तेरे इश्क की मुझको आदत है असं लिहिलं होतं.. त्याचा काय अर्थ आहे..    :  मंदार

सरिताने स्मितहास्य केलं आणि म्हणाली.. तिला सवय झाली होती तुझ्यावर प्रेम करायची.. आणि शेवटपरेंत ती फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहिली.. आज ती या जगात नाही पण तिचं अस्तित्व तिच्या प्रेमामुळे आजही टिकून आहे..

बोलता बोलता सरिताच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या होत्या..

सावर स्वतःला सरिता..   : क्षमा तिला धीर देत म्हणाली

तुम्ही दोघेही सुखाने संसार करा.. देवाचे आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहोत..   : सरिता

थँक्स सरिता, माझ्यावरचा डाग आज तुझ्यामुळे पुसला गेला..  : मंदार

माझं मैत्रीप्रती कर्तव्यचं होतं ते..  :  सरिता स्मितहास्य करत म्हणाली

बरं.. आम्ही निघतो आता.. उशीर झालाय   : मंदार

हो, सांभाळून जा  :  सरिता

सरिताचा निरोप घेऊन मंदार आणि क्षमा दोघेही निघाले..

संध्याकाळ झाली होती.. छान वारा सुटला होता.. मंदारच्या मनावरचं इतक्या दिवसांचं ओझं हलकं झाल्याने त्यालाही मोकळं वाटत होतं.. त्याने गाडीत म्युझिक ऑन केलं..

ये राते ये मौसम
नदी का किनारा
ये चंचल हवा 

I am sorry मंदार.. प्लीज मला माफ कर.. क्षमा हळूच त्याचा हात हातात घेत म्हणाली..

ईट्स ओके, क्षमा.. झालं गेलं सगळं विसरून आपण आता या क्षणापासून नव्याने आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करूया..   : मंदार

क्षमा स्मितहास्य करत प्रेमाने त्याच्याकडे बघत होती..

आणि म्युझिक सिस्टिमवर गाणं प्ले झालं..

वादा रहा प्यार से प्यार का
अब हम ना होंगे जुदा..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

✨️✨️❤️विश्वकांक्षिका ❤️✨️✨️

लिहायला आवडतं.. आवडतं म्हणण्यापेक्षा व्यक्त व्हायचंय.. आणि भावनांच्या बंधनातून मुक्त व्हायचंय..