Jan 29, 2022
कथामालिका

तेरे इश्क की मुझको आदत है.. Part 1

Read Later
तेरे इश्क की मुझको आदत है.. Part 1


एहसास तेरे और मेरे तो
एक दुजे से जुड रहे,
एक तेरी तलब मुझे ऐसी लगी
मेरे होश भी उडने लगे..

मंदार गॅलरीत उभा राहून हातात वाफाळलेल्या चहाचा कप घेऊन गाणं गुणगुणत होता..

तेवढ्यात दारावरची बेल वाजली.. मंदारने दार उघडलं तर एक छान गुलाबाच्या फुलांचा बुके घेऊन एक माणूस समोर होता..

मंदार महाजन, इथेच राहतात का??   :  दारावरचा माणूस

हो, मीच आहे.. बोला     :  मंदार

सर, हा बुके तुमच्यासाठी    :   दारावरचा माणूस

कोणी पाठवलाय हा??   :  मंदार

ते काही माहित नाही, सर.. आमच्या इथे फोनवर कोणीतरी order दिली आणि हा पत्ता दिला..   :  दारावरचा माणूस

बर, द्या तो बुके..   :  मंदार

आणि मंदारने दार लावून घेतलं..

कोणी पाठवला असेल हा बुके, काही चिट्ठी वगैरे आहे का बघतो याच्यासॊबत..  :  मंदार

आणि त्याला एक चिट्ठी सापडली..  फक्त तुझ्यासाठी with heart image 

नाव वगैरे काहीच नव्हत त्यावर.. त्याला वाटलं असेल कोणीतरी त्याचा फॅन.. famous RJ होता ना तो.. तरुणांच्या गळ्यातलं ताईत.. Specially मुलींच्या.. RJ Mandy 

दुसऱ्या दिवशी तो स्टुडिओ मध्ये पोचला आणि त्याचा show सुरु झाला..

Goooood Moooorning my Friends 
मी आहे तुमचा लाडका RJ
RJ Mandy 
घेऊन आलोय तुमच्यासाठी एंटरटेनमेंट आणि मस्तीचा खजाना
सो आजचा आपला गप्पांचा विषय आहे..

आपली आवडती व्यक्ती..

तर पटापट फोन करा आणि सांगा
कोण आहे तुमची आवडती व्यक्ती आणि का आहे ती तुमची favorite ??

तोपरेंत हे छान गाणं ऐका..

त्याने गाणं play केलं..

ओ साथी तेरे बिना

थोड्याच वेळात लोकांचे धडाधड phones यायला लागले..

गप्पा रंगात आल्या होत्या.. तोच मंदारच्या फोन वर एक call आला.. कितीवेळ तो hello hello बोलत होता पण समोरून काहीच उत्तर नव्हत.. त्याने फोन cut केला..

मंदार show संपवून घरी आला.. तो एकटाच राहायचा.. आई वडील गावी असायचे.. अधून मधून यायचे इकडे..

तो social media वरही बराच active होता.. फॅन following ही खूप होते.


मस्त बहारों का मैं आशिक़ मैं जो चाहे यार करूँ

चाहे गुलों के साए से खेलूँ, चाहे कली से प्यार करूँ

सारा जहाँ है मेरे लिए, मेरे लिए..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

✨️✨️❤️विश्वकांक्षिका ❤️✨️✨️

लिहायला आवडतं.. आवडतं म्हणण्यापेक्षा व्यक्त व्हायचंय.. आणि भावनांच्या बंधनातून मुक्त व्हायचंय..