Oct 21, 2020
Poem

तुझ्यासवे

Read Later
तुझ्यासवे

तुझ्यासवे
तुझ्यासवे अंगावरी 
झेलूनी श्रावणधारा
घ्यावा तनूवरी 
बेधुंद हा वारा 
चिंब पावसात भिजूनी
जीव वेडावला 
त्यात साद घालती 
तुझ्या बाहुपाशाच्या माला 
श्वासातले गुंतती 
श्वासही तूझ्यात आता 
मोकळ्या मग होती 
आसमंतीच्या वाटा 
तुझ्यातल्या मी 
अन तू माझ्यातला  
होती एकस्वरूपी  
हाच खेळ अंतरंगातला

©प्रज्ञा भामरे -थोरात