ती सध्या काय करते…?
खूप दिवसांनी आज जुना अल्बम काढला.....माझ्या कॉलेज मधील अल्बम....मी आणि माझी मुलगी तो अल्बम पाहत होतो....अल्बम पाहताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या..कॉलेज मधील धमाल, मस्ती,बंक केले लेक्चर आठवले.....मी माझ्या कॉलेज च्या आठवणीत रमून गेलो.....तोपर्यंत
बाबा ही कोण......माझ्या मुलीने अल्बम मधील एका मुलीकडे बोट करून विचारल
तिच्या ह्या प्रश्नावर मी माझ्या कॉलेजच्या आठवणी मधून बाहेर आलो..आणि अल्बममध्ये पाहिलं....आणि २ मिनट मी शांतच झालो....मी काहीच बोलत नाही म्हणून मुलीने परत विचारल.....
बाबा सांग ना ही कोण आहे....मुलगी
तसा मी परत भानावर आलो....बाळा ही माझी मैत्रीण आहे.....
तीच नाव काय बाबा......मुलगी
तनु......
तनु ....म्हणजे तनिष्का नाव होत तीच....किती दिवसातून....दिवसातून काय किती वर्षातून...तनुच नाव घेतल होत मी.....तनु माझी कॉलेज मधील मैत्रीण....मैत्रीणणणण...मैत्रीणी पेक्षा थोडी जास्तच कुणीतरी होती.... बी.कॉम फस्ट इयरला आमची भेट झाली दोघे एकाच वर्गात होतो....हळूहळू ओळख होत कधी मैत्री झाली कळलच नाही.. आणि मात्रीचे कधी बेस्ट फ्रेड झालो हे सुद्धा कळल नाही...कुठेही जायचं झाल तरी दोघेच जाणार टिफिन सुद्धा एकत्र शेयर करणार...दोघांपैकी एकजण सुद्धा कॉलेजला आल नाही तरी करमणार नाही....तनु वर्गात हुशार होती..त्यामुळे सगळेजण तिच्याशी कामासाठी का होईना गोड बोलायचं...दिसायला तर खूपच सुंदर होती....
आमच्या मैत्रीच रुपांतर कधी प्रेमात झाल कळलच नाही...मीच तिला पहिल्यांदा प्रपोज केल होत....आणि तिनेही होकार दिला होता....हळूहळू आमच प्रेम फुलत होत....
लास्ट इयर ला असतना अमोल नावचा मुलगा आमच्या कॉलेज मध्ये आला..तो हि खूप हुशार होता त्यामुळे तनु व त्याची चांगलीच मैत्री झाली...ते सतत अभ्यासच काहीतरी बोलत बसायचे...त्यामुळे आता तनु माझ्या सोबत कमी असायची माझ्याशी कॉलेज झाल्यावरच बोलायची... पण मला ते आवडायचं नाही माझी चिडचिड होऊ लागली आमच्यात सारखी भांडण होऊ लागली आणि ह्याचाच फायदा त्या अमोल ला झाला....तो तनुशी जवळीक करू लागला....त्याने मला येऊन सांगितले कि तनु ने त्याला प्रेमासाठी होकार दिला आहे ....त्यामुळे माझा गैरसमज झाला..आणि मी तनुवर संशय घेतला...
मी तनुवर संशय घेतल्यामुळे तनु खूप कोलमडून गेली तिने माझ्याशी असलेले सारे संबध तोडुन टाकले..कसेबसे तिने लास्ट इयर कम्प्लीट केले व ती हे शहर सोडून निघून गेली त्या नंतर ती कोणालाच भेटली नाही..मलाही नाही.....
ती सध्या काय करत असेल...?
मी तनुच्या विचारात होतो इतक्यात माझ्या कॉलेज मधील मित्राचा फोन आला तसा मी भानावर आलो....हेलो दीपक...कशी काय आज आमची आठवण झाली....अरे अभी आपल्या बी. कॉमच्या बँच चा गेटटुगेदर आहे..आपल्या फॅमिलीसोबत यायचं आहे...ह्या रविवारी आहे बग आठवणीने ए.....मी बाकीची माहिती तुला मेसेज करतो..ओके बाय
गेटटुगेदर.....म्हणजे सगळे येणार हो ना....तनु येईल का तिची माझी भेट होईल का.....बघू जाऊया..आली तर भेटेलच...नाहीतर कोणाकडून तरी तिच्याबद्दल थोडफार कळेल तर ना.....
बाळा तू बाबाच्या शाळेला ला येणार का.....अभी
बाबाच्या शालेला ...हो...ए मी बाबाच्या शाळेला जाणाल जाणाल....अभिची मुलगी बाबाच्या शाळेला जाणार म्हणून आनंदात बडबडत तिच्या आई जवळ जाते...तीच बोलन ऐकुन अभिची बायको त्याला विचारायला येते
अहो ही काय म्हणतेय तुमच्या शाळेला जायचं..म्हणजे काय.....नेहा
अग हो नेहा रविवारी आपल्याला माझ्या कॉलेजला जायचं आहे आमच गेटटुगेदर आहे आणि आपल्या फॅमिलीसोबत यायचं आहे...अभी
बर....नेहा
कधी एकदा तो दिवस येतो अस अभीला झाल होत.....
नेहा आवर लवकर वेळ होतोय आपल्याला...... सगळे आले असतील..... अभी
हो हो हे काय झालच आवरून चला निघूया...नेहा
अभी आपल्या बायको व मुली सोबत कॉलेजमध्ये पोहचला...सगळेजण आपल्या फॅमिलीसोबत आले होते सगळे आपल्या फॅमिलीची ओळख करून देत होत..खूप दिवसातून भेटल्यामुळे सगळेच खूप आनंदी होते..गेटटुगेदर निम्मित्त काही खेळ पण ठेवण्यात आले होते खायचे पदार्थ ही ठेवले होते त्यामुळे कोणी ते खेळत होते तर कोणी खाण्यात मग्न होत ....अभी सगळ्यांशी भेटून आपल्या बायकोची व मुलीची ओळख करून देत होता....सगळ्यांशी भेटून झाल्यावर अभिचे डोळे तनुला शोधत होते....पण ती कोठे दिसतच नव्हती....
आली कशी नाही.....कि येणारच नाही....नाही अस नसेल थोडा वेळ होईल यायला...आता कुठे सुरवात झाली आहे.....अभी त्याच्याच विचारात होता....
अहो...... अहोओओ......नेहा अभिला हाताला हलून बोलवते
नेहाच्या बोलवण्याने अभी आपल्या विचारातून बाहेर येतो....काय अशी का बोलावत आहेस.....
अहो केव्हाची बोलवतेय कुठे हरवला आहात.....नेहा
कुठे नाही ..काय म्हणत होतीस.....बोल....अभी
अहो माहिला भूक लागलेय काही तरी खायला घेऊन या ना...नेहा
बर आणतो पण माही कुठेय....अभी
अहो ही काय माझ्या शेजारीच आहे नेहा आपल्या बाजूला हात करत बोलते..पण माही तिथे नसते.....
अग कुठे आहे...... नाहीये ती इकडे....अभी थोड्या मोठ्याच आवाजात बोलतो
अहो इथेच होती....नेहा रडवेला चेहरा करून बोलते....
तू थांब इथे मी बघतो कोठे आहे...अभी माहीला शोधायला जातो इकडे तिकडे शोधत असतो पण त्याला माही कोठेच दिसत नसते...आता अभी पण घाबरला होता.....आणि अचानक मागून बाबा.....अशी हाक आली...तो पटकन मागे वळून पाहतो तर माही त्याच्या मागेच उभी असते....तो धावत माही जवळ जातो...बाळा कुठे गेली होतीस तू.....अभी महिला मिठी मारत बोलतो...
बाबा मला कोणी आणल माहितेय का.....माही
कोण बाळा...अभी महिकडे बघत बोलतो.....
बाबा मला त्या अल्बमवाल्या तुझ्या मैत्रीनेन आणल इथे....माहीच्या तोंडातून अल्बमवाली ऐकल्यावर अभी इकडे तिकडे पाहू लागला......
ए बाबा काय शोधतोयस तू......बाळा अल्बमवाली मैत्रीण कुठे आहे.....अले बाबा ही काय माझ्या शेजारी उभी आहे....माही अस बोलल्यावर अभी पटकन उभा राहतो व पाहतो तर तनु समोरच उभी होती..तिला पाहिल्यावर काय बोलाव त्याला कळेनाच खूप वर्षातून त्याने तनुला पहिले होते......
तनु...........कशी आहेस...कसाबसा दोन शब्द तोंडातून फुटले
मी ठीक आहे अभी..... तू कसा आहेस.....तनु
मस्त....अभी
ही तुझी मुलगी आहे का....तनु
हो....ही माझी मुलगी आहे...माही...... थॅङ्क्स्....अभी
थॅङ्क्स् काय.....खूप क्युट आहे....तनु
नेहा अभिला शोधत तिथे येते....अहो मिळाली का माही..कसली घाबरले होते...
हो मिळाली...तनु ही माझी बायको..नेहा....अभी
हाय...खूप सुंदर आहे ....तनु
तुम्ही पण खूप सुंदर आहात...नेहा
अहो मी माहिला काही तरी खाऊ देते भूक लागलेय तिला...अस बोलून नेहा माहिला घेऊन तेथून जाते
आता अभिला आणि तनुला काय बोलाव कळेनाच
शेवटी अभीच बोलतो...आता काय करतेस कोठे असतेस....
युरोपला असते ....सध्या घरीच असते आधी जॉब करायचे पण लग्ननंतर सोडून दिला..... मिस्टर युरोपमध्ये एका कंपनीमध्ये जॉब करतात त्यामुळे आता तिथेच शिफ्ट झालोय आम्ही...आणि एक छोटासा मुलगा पण आहे....
तनुच लग्न झाल आहे म्हंटल्यावर दोन मिनिट अभिला जेलस फील झाल पण त्याने ते दाखून दिल नाही....तू एकटीच आली आहेस का मिस्टर आणि मुलगा आले नाहीत का....अभी
मिस्टर आले नाहीत...मुलगा आला आहे पण आई जवळ ठेऊन आलेय त्याला....तनु
बर.....अभीला तनुला सगळ खर काय आहे ते सांगायचं होत पण कस सांगू हे कळत नव्हत....ही एकच संधी होती त्याच्याकडे आपल्या मनातील बोलण्याची नंतर तनु भेटेल कि नाही माहित नव्हत..तो शेवटी धाडस करतो....
तनु कॉलेजमध्ये असताना जे काही घडल ते सगळ गैरसमजातून झाल...आणि....अभी पुढे काही बोलणार इतक्यात तनु बोलते
अभी मला माहित आहे सगळ .....तनु
तनुच्या तोंडातून हे सगळ ऐकल्यावर अभिला शॉकच बसतो....माहित होत मग ............
मग काय अभी....मला जेव्हा काळाल तेव्हा खूप वेळ झाला होता...तेव्हा तुझ लग्न झाल होत अभी..आणि त्यावेळी मी येऊन तुला हे सगळ सांगू शकत नव्हते....
कॉलेज झाल्या नंतर मी माझ्या मावशीकडे युरोपला गेले..तिथेच बाकीच शिक्षण पूर्ण केल काही वर्षांनी मी परत आले होते..त्यावेळी अमोल मला भेटला..त्याने जे काही झाल ते सगळ सांगितल...मी त्याक्षणी तुझ्याकडे येत होते..पण त्यावेळी मला कळल कि तुझ लग्न होऊन एक महिना झाला आहे...हे सगळ काळ्यावर मी परत युरोप ला गेले आणि तिथेच मावशीच्या पाहुनाच्यातील मुलाशी म्हणजे साकेतशी माझ लग्न झाल..वर्षाने विरेन झाला..मी पण माझ्या संसारात रमले..पण मला एकदा तुला भेटून हे सगळ सागायचं होत...मग काय हे गेटटुगेदर घेणार आहेत काळल्यावर आले मग इकडे...तू इथे येशील अस वाटल म्हणून आले...
हे सगळ ऐकल्यावर अभिला काय बोलाव हेच कळत नव्हत तो शांतच उभा होता...
अभी मी खूप खुश आहे माझ्या संसारात साकेत माझी खूप काळजी घेतो खूप सुखात ठेवतो.....फक्त तुज्याशी एकदा बोलायचं होत...मनावरच ओझ कमी करायचं होत..आता ते हे झाल आता शांत वाटत आहे..तू हैप्पी आहेस ना....तनु
हो खूप हैप्पी आहे..माझा ही संसार सुखात चालू आहे...मलाही तुला एकदा हे सगळ सागायचं होत..आता तेही झाल..आता निवांत झालो...
मग....तनु
मग काय....अभी
फ्रेंड्स.....तनु अभिकडे हात करते
अभी पण हसत हसत तिची मैत्री नव्याने स्वीकारतो...
एक चुकीचा गैरसमज आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या पासून दूर करतो...त्यामुळे आपल्या माणसावर विश्वास ठेवा त्याला विश्वासात घ्या आणि मगच निर्णय घ्या....
***
(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा काही सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)
आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....