Jan 19, 2022
नारीवादी

नैराश्य

Read Later
नैराश्य

नैराश्य.. 
रात्रीचे 11:30 वाजले असतील.. की त्याने त्याचा आईला हाक मारली न म्हणाला "हिला आत्ताच्या आत्ता बस स्टॉप ला सोडून ये.. जाईल ती  तिच्या घरी.".. तिला काय करावे कळेना..लग्नाला  तर फक्त  15-20 दिवस झालेले.. ज्याच्या जीवावर ती  आली त्यानेच असं म्हणावं.. परत हे रोजचंच  झालं.. रोज म्हणू लागला निघ माझ्या घरातून.. ती  आपली रात्र रडून काढायची तरी तो लक्ष न्हवता देत.. मोठ्यानं आवाज जरी आला,  तर तो पाठ फिरवून झोपी जायचा.. सकाळी उठून परत काम आणि ऑफिस  बस रात्री परत हेच.. एक वेळेस तर हद्द झाली तिने तिच्या वडिलांना फोन केला या शुल्लक  कारणाने  सर्वानसमोर त्याने तिला त्या क्षणी "डिवोर्स दे न माझी सुटका कर "म्हणाला.. प्रत्येक दिवशी नवीन चुका निघायला लागल्या.. काही काळ गेला की होईल सर्व ठीक असं तिचे आई वडील तिची समजूत काढायला लागले होते  पण हे रोजच तिला असह्य  होऊ लागलं होत.. जी स्वप्न  आपण पहिली त्याची धूळ सुद्धा  दिसत न्हवती.. कधी वाटायचं द्यावं सगळं सोडून.. कारण आई वडील यांच्या कडे जावे तर लोक नाव ठेवतील न इकडे राहावे तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही.. जे सर्व TV वर पाहिलं होत त्यातलं  तिळमात्र ही खरं न्हवत.. खरंच  मुली किती सुंदर स्वप्ने बघतात आपल्या आयुष्याचे.. न होत सर्व उलटच.. इकडे काही काम करत नसतात  पण तिकडे गेल्या की जबाबदारी  घेऊन सर्व करतात.. न त्यात तिच्या नशिबात  हे सतत  टोमणे.. घरात एक तरी जण असावा ना तीच समजून घेणारा.. सासू तर नाहीच.. निदान सासर्याने तरी वडील माणूस म्हणून करावे..ते ही असून नसल्या सारखे.. न नवरा  तर नावालाच.. सकाळी उठल्या पासून सासूचे न रात्री झोपे पर्यंत  त्याचे टोमणे ऐकून कंटाळा  यायचा तिला.. आपलं माणूस म्हणावं असं कोणाचं न्हवत.. होते ते एवढे दूर ना त्यांना सर्वाना सांगता यायचं न रडता यायचं.. नंतर तर त्यानं तिला आई वडील,नातेवाईक आणि मैत्रिणी सोबत पण बोलणं बंद केल.. बोलाव कोणाला न सांगावं कोणाला.. घुसमट  होई  तिची.. बोलायचं तर आमच्या समोर बोल ही  सक्ती होती.. काय बोलणार ती तरी.. जेवढं जमेल तेवढं ऑफिस  time मधेच.. आईला बोलणं होत.. जेव्हा सकाळी 11 ला आई ला फोन जायचा त्याचा पुढे त्यांना हायसं  वाटायचं की आज ठीक आहे पोरगी आपली.. कधी कधी तर जिवंत आहे आज अशी पण धास्ती.. समाजाला दिसत सून सासू सासर्यांना जवळ ठेवत नाही.. त्यांना बोलत नाही पण जी दुसरी कडून आलीये तिला वेळ लागेलच ना..तिला तुमचं म्हणून स्वीकारा ती ही स्वीकारेल च ना.. प्रत्येक गोष्टीत तुम्ही तिचा अपमान करत असाल तर तिची पण सहनशक्ती  संपेलच, इथे तर नवरा पण सोबत न्हवता ..तिने पण हेच केले तिला न्हवत बोलणं होत जास्त.. म्हणून तुम्ही किती पण बोला.. मी शांत असं वागणं चालू होत.. आणि खरं म्हणावं तर तिला बोलू देत न्हवते.. नाविलाज  होता.न दुसरा पर्याय न्हवता..काय कराव कळेना.. रोजचे टोमणे.. "तुला मी बायकोचा दर्जा  कधी दिलाच नाही न देणार  पण नाही" असंही तो बोलून गेला.. काळजात र्चरर झालं.. बाहेरून कितीही दाखवलं तरी मनात नातं संपायला  लागलं होत.. एक दिवस तर रात्र भर  ती  खिडकीत  उभारून  रडत राहिली पण त्याला तिळमात्र  फरक  पडला नाही..तिचा self  respect  संपत होता.. या माणसा सोबत आयुष्य  काढणं जमेल का? हा मात्र मोठा प्रश्न  होता.. न आयुष्यभर  असच खिडकीत उभारून रडत नाही बसायचं.. ज्याच्या  जीवावर  आलो त्यानेच उंचावरून उडी मार म्हणावी या सारखं दुर्दैव  कोनत  असणार होत.. बस वाटायचं आजचा शेवटचा दिवस.. आज ऑफिस वरून परत नाही यायचं तिकडेच कुठेतरी जीव द्यायचा.. थोडे दिवस रडतील परत सर्व नॉर्मल होतील.. आणि ही तिसरी वेळ  होती त्याला न त्याच्या घरच्यांना तिच्या घरच्यांनी समजावून सांगायची.. सगळं व्यर्थ होतय हे स्पष्ट  दिसायचं तिला.. पण वाटायचं सुधरेल कधीतरी.. कधी शंकेची पाल यायची मनात.. बाहेर काही असेल का.. शेवटी दिवस उजाडला.. त्याने तिच्या कामासाठी लॅपटॉप  घरी ठेवला.. आणि तिने ओपन केला त्यात fb नोटिफिकेशन.. just click.. न जे दिसायचं न्हवत ते सर्व तिला दिसलं.. घाबरून ती थरथर कापत होती.. एवढा विश्वास  ठेऊन आपण  या माणसासोबत  राहतोय न त्यानं असं कराव.. किती घाणेरडी  भाषा होती ती.. न एकीसोबत न्हवे तर अशा किती तरी होत्या.. समोर सासू बसलेली.. आईला सर्व माहिती आहे ही कबुली  त्यानेच तर  दिलेली..सांगावं कोणाला..बस्स  संपलं  होत सर्व.. आयुष्यात  एवढं वाईट कधी वाटल न्हवत..कॉलेज मध्ये  सर्वात हसरी म्हणून  ओळखली जाणारी ती.. कधी दुःख  माहित नसणारी तीने  सर्व सहन केल गपचूप.. पण आज हे नवीनच काय ??  तो आला नेहमी प्रमाणे आईला लाडीगोडी.. हिला त्याचा चेहरा पण  पाहू वाटेना.. घृणा  म्हणतात ना तेच..बस्स ठरवलं  आता नाही राहायचं..रात्रीच काहीतरी कारण सांगून बाहेर गेली आणि भावाला फोन केला.. बस इथे नाही राहायचं.. तरी तिला वाटायचं सुधरेल का तो पण जे तिने पाहिलं त्याच काय करावं.. आणि दुसऱ्या दिवशी सासू ला म्हणाला "आई मी दुसरी पाहून ठेवली आहे".. न सासू म्हणली  "आन बर घरी तिला बघू तर दे कशीये".. "दुसरी बायको आहे माझी तुझी गरज नाही".. ऐकून तिला काय करावं कळेना.. सासू म्हणे "जा बाळा फिरायला तूझ्या  दुसऱ्या  family सोबत". याचा अर्थ काय असतो.. शेवटी घरी सर्वाना सांगून ती ढसाढसा रडली..नाहीच राहायचं हे ठरलं.. एखादी स्त्री  सर्व सहन  करते पण नवऱ्या चे बाहेर असलेलं नातं  कधीच नाही स्वीकारू  शकत..बस्स एवढं सहन करून.. आई वडिलांनी  आयुष्याची  शिदोरी जपून ठेऊन  लग्न केल होत त्याचे असे  परिणाम.. तिला वाईट वाटल.. आता मरावं जगून फायदाच नाही.. माणुसकी  वरचा विश्वास उडाला  होता.. तसा आत्ता पण नाहीच.. पण प्रत्येक घरात वातावरण  वेगळं असत.. जे सर्व होतय हे पाहून ती नैराश्यात गेली.. धड जेवण नाही कोणाला बोलणं नाही.. फक्त रडायची.. खूप रडली.. याच जास्त वाईट वाटल की,  आपली काही चूक नसताना आपल्याला का हे सहन करावं लागतंय...पण म्हणतात ना वेळ सर्व  शिकवते,   तस ती नैराश्या तुन बाहेर आली.. सर्वात  जास्त आईने तिला सावरल.. वडील,  भाऊ, थोडेफार  नातेवाईक  यांनीही बोलून परत माणसात मिसळून घेतलं.. सर्वात मोठा धक्का तर हा होता की  त्याने मुली पाहायला पण सुरुवात केली होती.. बापरे माणूस एवढा लवकर बदलतो,  मग मी  का नको.. म्हणजे  त्याला जरा सुद्धा वाईट नाही वाटल त्याच्या साठी आपण रडावं..... दुसऱ्याची दासी  बनून राहण्या पेक्षा आपल्या मनाची  राणी  बनून राहणं कधी ही चांगल... पण तिला याचा अभिमान आहे की ती कधी चुकीची वागली नाही.. याच विचाराने ती आयुष्य  जगतेय.. पूर्ण नैराश्य गेलं आहे असं नाही पण नवीन उमेद तर नक्कीच आहे.
व्याकरण चुकांबद्दल क्षमस्व...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now