प्रिया अणि सुधीर चा प्रेमविवाह ठरला.सुधीरचि आई खूप देव देव करते हे प्रियाला माहीत होत पण सुधीर साठी तिने सर्व करायचे ठरवल. लग्नकार्य झाल्यानंतर सर्व पाहुणे आपल्या दिशेने गेले. आता वेळ आली होती प्रियाच्या व सुधीर च्या मिलनाची .रात्रीचे १० वाजले होते, सासूने प्रियाला हिरवी नवीनच साडी नेसायला दिली. प्रिया साडी नेसून खाली गेली तर तिथे नात्यातील ५,६ स्त्रिया हजर होत्या ,त्यांनी तिची ओटी भरली, पदरात ५ फळेही घातली. देवाच्या पाया पडायला सांगितले. हे सर्व नुकतेच लग्न झालेल्या प्रियाला नवीच होते. तिला लाजही वाटत होती आणि विचित्र वाटत होते.ही नवरा बायकोची खाजगी बाब अशी नातेवाईकास जाहीर करणे योग्य आहे का? हाच विचार येत होता. रात्र उलटली..प्रिया आंघोळ करून खाली आली, सासूने सांगितले केस धुवून ये. घरातील आजीने सांगितले ४,५ दिवस रोज केस धुवायचे. प्रियाने रोज केस धुतले..थोड्या दिवसांनी आज्जी गावी निघून गेल्या पन हे रोज केस धुण्याचे प्रकरण काही संपायला तयार नाही. प्रियाने केस धुतले नाहीत तर सासू तिने बनवलेले जेवण जेवत नसे. स्वतः बनवुन खाई. प्रियाने हे सुधीर ला सांगितले तर त्यानेही आई म्हणेल तसे कर असे सांगितले. प्रियाने शेवटी सासूला विचारले किती दिवस केस धुवायचे तर उत्तर आले एक मूल होईपर्यंत!!! आता मात्रा प्रिया आणि सुधीर मधे वाद होऊ लागले. नवीच जमान्यातील प्रियाला हे अजिबात मान्य नव्हते पण ती सर्व सहन करत होती ते फक्त सुधीर वर असलेल्या प्रेमामुळे...
थोड्या दिवसांनी प्रिया ची नणंद आली तेव्हा प्रियाने तिला विचारलं ताई तुम्ही ३ वर्षं रोज केस धुतले का?( तिला लग्नाच्या ३ वर्षानंतर मुलगा झाला होता) हा प्रश्न ऐकून तिने का अस का विचारतेय म्हंटल्यावर प्रियाने तिला सर्व प्रकार सांगितला...तिच्या नणंदे आईची समजूत काढली...पण सासू काही ऐकायला तयार नाही. ६ महिने रोज केस धुतले. Pregnant असतानाही केस धुतले पन हा एका प्रकारे असलेला शारीरिक छळ काही संपत नव्हता. प्रियाला एक गोड मुलगी आहे .आता सासूचे उपवास असतील त्यादिवशी प्रियाने केस धुवायचे अस सासूचे म्हणणे आहे...पन प्रिया आता लक्ष देत नाही. आजही यावरून सासू किरकिर करत राहते. कारण सासूचे उपवास काही संपत नाहीत सोमवार, शिवरात्री, चतुर्थी, एकादशी,गुरुपुष्यामृत, आणि बरेच चालुच राहतात.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा