Oct 26, 2020
विनोदी

कुणाचं काय तर कुणाचं काय?

Read Later
कुणाचं काय तर कुणाचं काय?

ती पहिल्यांदाच घरापासून नोकरीसाठी दूर आली,एका जवळच्या नातेवाईकांकडे राहत होती.नवीन शहर,सगळंच नवीन होतं तिच्यासाठी.एक दिवस महत्वाच्या कामामुळे अडकली ऑफिसला,निघायला रात्रीचे नऊ वाजले.कशीबशी एक रिक्षा मिळाली.किर्रर्रर अंधार,सामसूम रस्ता आणि रिक्षात ती एकटी,आतून खूप घाबरली होती पण चेहऱ्यावर दिसू दिलं नाही.अचानक पूढे गेल्यावर तिला जाणवले की रिक्षावाला आजूबाजूला बघतोय,तिला संशय आला की याच्या डोक्यात नक्की काहीतरी शिजतय.तिने हळूच बॅगमधून तिचं हत्यार कैची काढली,ती सगळी हिम्मत आणि ताकद एकवटून तयार होती.तितक्यात तो मागे वळून म्हणाला,"ताई किती सामसूम रस्ता आहे,आजूबाजूला काहीच नाही इथे गाडी बिघडली तर मी घरी कसा जाणार?"तिला खरंतर हसू आलं,"काही नाही भाऊ हा माझा रोजचाच रस्ता आहे,काही भीती नाही..चला तुम्ही लवकर".