Sep 23, 2023
मराठीत अर्थ - meaning in Marathi

काटा रुते कुणाला (kaata rute kunala) lyrics meaning in marathi

Read Later
काटा रुते कुणाला (kaata rute kunala) lyrics meaning in marathi
काटा रुते कुणाला (kaata rute kunala) lyrics meaning in marathi


काटा रुते कुणाला हे शांता शेळके द्वारा लिखित एक फारच सुंदर गीत आहे. या गीताचे बोल थरथरणाऱ्या ओठांसारखे मनाला स्पर्शून जातात आणि स्वतःमध्ये गुंतायला भाग पाडतात.

शब्दशः अर्थ पाहण्या अगोदर आपण पाहूयात बोल


काटा रुते कुणाला,आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे

काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे

हा स्नेह वंचना की काहीच आकळेना?
आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे

शांता शेळके


अतिशय मंत्रमुग्ध करणाऱ्या ह्या ओळी कळायला थोड्या अवघड जातात .पण प्रत्येक गीत कविता यांचे अर्थ कवी जेव्हा लिहितो तेव्हा आणि वाचकांपर्यंत पोहोचतात तेव्हा बदलत असतात.
प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार आणि भावनांच्या आवेगा नुसार त्या गीताच्या अर्थाला पकडतो आणि मग एखादं साधंसं गीत कधीकधी त्या व्यक्तीसाठी फार जास्त महत्त्वाचं होऊन जातं तर कधीकधी खूप जास्त सुंदर गीत सुद्धा निरर्थक वाटतं

तरी या ओळींचा अर्थ मी मला समजलेल्या भाषेत लिहिते.


काटा रुते कुणाला,आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे


बोलताना आपण फार वेळा म्हणतो की मला काटा रुतला शांता शेळके या गीतात म्हणत आहेत , हा किती दैवयोग आहे की मला फुलही रुतत आहेत.
शब्दांचा थोडसं पांघरून बाजूला केलं की गुड अर्थ लपलेला दिसतो या ओळींमध्ये की प्रेमळ भावनेचा सुद्धा त्रास होताना पाहतोय आपण.


सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे

काही दुःख अबोल असतात त्यांना शब्दात इतरांना सांगणे शक्यही नसते या ओळींमध्ये हेच दुःख त्या व्यक्त करत आहेत.
त्या म्हणतात आयुष्यभराच्या वेदनेचा मला शाप आहे आणि ही वारंवार त्रास देणारी वेदना मी कोणाला सांगू शकत नाही.


काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे


मी काहीतरी करू पाहत आहे त्यासाठी तिथेच थांबत आहे पण माझं थांबणं देखील अनर्थ आहे म्हणजे त्याला कुठलाही अर्थ नाहीये. मला वाटतं की मी शांत राहिला आणि सगळं काही ठीक होईल पण ते सुद्धा विपरीतच घडत आहे.



हा स्नेह वंचना की काहीच आकळेना?
आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे

हा स्नेह नेमका माझ्यासाठी चांगला आहे की वाईट यातलं मला काहीच कळत नाहीये,, कारण माझा आयुष्य माझ्या सर्व अर्पण करून सुद्धा माझे हात आता रिक्त आहेत.
माझी प्रत्येक कृती निरर्थक आहे आणि मला कळतही नाही की माझ्यासोबत नेमकं जे घडत आहे त्याचे कारण काय.


तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही कविता आणि याचा अर्थ दोन्ही कळलं असेल . पण मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कविता आपल्याला जशी रुचेल, तशी ती ऐकावी, गावी आणि इतरांना सांगावी. पण इतरांना सांगताना त्याच्यावर जबरदस्ती आपला अर्थ लागू नये त्याला त्याचा अर्थ घेऊ द्यावा शब्दांची मजा स्वतःची स्वतः अनुभवावी.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anjali Dinkar Autkar

Keep Smile