Oct 24, 2021
कथामालिका

एक तू एक मी भाग 2 रा

Read Later
एक तू एक मी भाग 2 रा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 

एक तू एक मी
भाग दुसरा

आश्विनीने आईच्या हातात एक पिशवी ठेवली."आई,आता डोळे उघड आणि बघ सरप्राईज फॉर यु."

"हे काय?आईने पिशवी उघडली.वस्तू बाहेर काढून  बघते तर मंगळसूत्र. "अश्वि ,काय हे,अग कोणाचं  आहे.
"आई हे तुझं आहे. तेच आणायला गेली होती. म्हणून उशीर झाला".

आई मंगळसूत्र हातात धरून स्तब्ध उभि होती.
"अश्वि, अगं कशाला हा खर्च".

"आई,थांब  मी बोलू .तर ऐक, माझ्या नोकरीला एक वर्ष पूर्ण झालं.माझा पहिला पगार जेव्हा मी तुला देत होती तर तू  म्हणालीस. तुझ्याकडेच ठेव, शेवटी कशीतरी अर्धा पगार घ्यायला तयार झालीस. त्यातला अर्धा पगार तू मला माझ्या भविष्यासाठी बचत म्हणुन करायला सांगितल
होतंस. आठवत का?"

हो आठवतंय, मग त्या पैशाने तू हे आणलस. अग तुझ्यासाठी काहीतरी करायचं".

आई ,अग ऐकून तर घे.सगळेच पैसे थोडी ना संपवलेत तुझ्यावर,तू मला कधी माझा पगार  तरी विचारलंयस का?
          मला चांगलं आठवतंय, पाच वर्षांपूर्वी  आत्याच लग्न ठरलं होत ,तेव्हा आजी गावावरून आली होती. आत्याच्या लग्नात दागिने खरेदीसाठी बाबांकडे पैसे मागत होती.
_______
           "हे बघ, माधवा सुमी तूझी एकुलती एक बहीण आहे. तिच्या लग्नात तू खर्च नाही करणार तर कोण ? मला पैसे दे. मग मी लगेच निघते. खूप काम आहेत".  माधवची आई
"हो आई, मला मान्य आहे. पण आता लगेच कुठून आणू मी पैसे. तू थांब ना , दोन तीन दिवस मी करतो काहीतरी, आजच तर आलीस. आता आल्यावर सांगतेस लग्न ठरलय.मला आधी कल्पना तरी द्यायची होतीस. आठवड्यातून एकदा फोन असतोच ना माझा".माधव
"काय?दोन तीन दिवस ,मी इथे दोन तास ही थांबणार नाही".माधवची आई जोरात ओरडली.
"आई, विसर ना सगळं. कित्ती वर्ष निघून गेली. तुला  मानसी माझी बायको म्हणून  का आवडली नाही. तेच मला कळल नाही. तुझ्या मैत्रिणीचीच  तर मूलगी आहे". माधव
  "म्हणूनच नाही आवडली. आणि कधी आवडणार ही नाही.  आत्ता ते महत्वाच नाहीये. तू मला आत्ता पैसे देतोस की  नाही". माधावची आई
"आता नाही देऊ शकत". माझ्याकडे नाहीत. माधव
ठीक आहे.  तर मग मानसी च्या गळ्यातल हे मंगळसूत्र दे .
तसही ते तूच बनवलयस ना, म्हणत त्या मानसी जवळ आल्या
मावशी, त्यांना इतक्या बाजूला बघून ति घाबरुन गेली
"आई ,काय  बोलतेस" माधव
"बरोबर बोलतेय, तसंही आजकल कोणी खरं मंगळसुर रोज घालत नाही.  मानसी तूच सांग . आत्ता काय करायच.
"ती काय सांगणार, अस काही होणार नाही 2 दिवस थांब "
"दोन दिवसांनी काय होणार आहे.  आधीच उशीर झालाय.
दहा दिवसांनि लग्न आहे. एक दिवस आधी साखरपुडा आहे. " आई
"ठीक आहे मावशी,देते मी तुम्हाला मंगळसूत्र.  तुम्ही दोघे शांत व्हा. छोटीच लग्न होतंय किती आनंदाची गोष्ट आहे.
उगाच विघ्न नको." म्हणत  मानसीने मंगळसूत्र काढून
माधवच्या आईकडे दिले.
"अग ,मानसी काय करतेस."माधव
"बरोबर करतेय मी, आणि आईही बरोबर बोलत आहेत."

माधवच्या आईने पटकन ते मंगळसूत्र पर्स मध्ये ठेवलं.
"चला, आता निघते मी." म्हणत त्यांनी पर्स खांद्यावर अडकवली.
मावशी, थांबा ना जेवून तरी जा. मानसी
"आता राहू दे जेवण नंतर कधीतरी येईन.माझी गाडी सुटेल.
माधवा काळजी घे.लग्नाला चार दिवस आधी ये. एकटाच ये. काय  पाहिजे तर अथर्वला आण. ठीकेय." बोलता बोलता निघूनही गेली.
"सॉरी मानसी."माधव
___

आई,  अश्विनीने जोरात हाक मारली तशी मानसी  विचारातून  बाहेर आली.
"हम्म", काय ग काय बोलतेस.
"फ्लॅशबॅक मधून बाहेर या, आईसाहेब आणि आपला उपहार कबूल करा "अथर्व
हम्म.मानसी
"आई,ते सर्व सोड  आता,आणि हे मंगळसूत्र घालून दाखव. बघू तरी कसं दिसतंय".
"ठीक आहे. तू म्हणशील तस  पण थांब जरा ,आधी त्याला हळदीकुंकू लावते."
"आणि  हो थँक्यु. अश्वि... "
"युवर वेलकम"

--मधुरा महेश

भाग कसा वाटला  नक्की सांगा. मानसी माधवच्या आईला का आवडली नाही 
Thank u...Irablog

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Madhura Mahesh Kijbile

Housewife

I Like to read stories.