A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session06087cdf902a9194bd3e100cbb34d8dfeb450d327a5801f5d1f3494b398ab12f264cb05f): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

आयुष्य जगायला शिकवणारा क्?
Oct 26, 2020
प्रेरणादायक

आयुष्य जगायला शिकवणारा क्षण

Read Later
आयुष्य जगायला शिकवणारा क्षण

#माझ्याआयुष्यातीलअविस्मरणीयप्रसंग 
#आयुष्यजगायलाशिकवणाराक्षण 

आज मी माझ्याजीवनातील एक छोटीशी आठवण सगळ्यांना सांगणार आहे.. प्रसंग तसा छोटा आहे पण त्यावेळी तो माझ्यासाठी खूपच मोठ होता,  त्या प्रसंगामुळे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला,  माझे मित्र मैत्रिणी, सासरचे लोक,नवरा सगळेच बोलतात की मी मानसिकरीत्या खूप खंबीर आहे..त्याचं श्रेय खरंतर माझ्या आयुष्यात घडलेल्या या सगळ्या प्रसंगानाही आहेच पण सगळ्यात जास्त माझ्या आईला आहे.

ही छोटीशी गोष्ट वाचून तुम्हाला अंदाज येईल माझ्या माऊलीच्या धैर्याचा... वाचून अभिप्राय नक्की द्या.

#आठवण 

"चल लवकर आवर उशीर होतोय,  कुठे हरवलीस? "
आईने मला आवाज दिला आणि माझ्याच विचारात हरवलेली मी भानावर आले.
माझे पाणावलेले डोळे तिच्या नजरेतून सुटले नाही. तिने माझ्या डोक्यावरून अलगद हात फिरवून डोळ्यांनीच मला सांगितले रडू नको.

माझी अजिबात इच्छा नसतानाही आवरून आम्ही दोघी निघालो. दहावीच्या परीक्षेत मी केंद्रात पहिली आल्यामुळे रोटरी क्लबने माझा सत्कार आयोजित केला होता. माझ्या वर्षभराच्या मेहनतीचं चीज झालं  होतं. सत्कारासाठी त्यांच्या आमंत्रणाचं पत्र आलं तेव्हा घरात खूप पाहुणे होते. मी पत्र वाचलं आणि खूप रडले. आता तुम्ही विचार करत असाल कि इतका आनंदाचा क्षण आणि मी का रडत होते?

ही गोष्ट आहे २००६ सालची. तेव्हा आमची घरची परिस्थिती खूप नाजूक होती, आई धुणी भांडी, स्वयंपाक, लहान बाळांची मालिश असं जे काम मिळेल ते करायची आणि वडील रिक्षा चालवत होते. आम्ही पाच भावंडं... चार बहिणी आणि एक भाऊ. आम्ही सगळे छोट्याश्या दहा बाय दहाच्या खोलीत चाळीतल्या भाड्याच्या खोलीत राहत होतो.
परिस्थिती नाही म्हणून आम्ही सगळेच सरकारी शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेत होतो.  पण म्हणतात ना सरस्वती आणि लक्ष्मी कधीच एका घरात नांदत नाही तसंच काहीसं आमच्या बाबतीतही होतं. आम्ही सगळीच भावंड अभ्यासात हुशार होतो. त्या छोट्याश्या पत्र्याच्या खोलीतही आम्ही खुश होतो कारण गरजा कमी होत्या आणि शिक्षण घेऊन आयुष्यात काहीतरी मोठं नाव कमवावं इतकंच ध्येय डोक्यात होते. ते माझं दहावीचं वर्ष होतं जे खूप छान गेलं, शिक्षकांनी खूप साथ दिली. आमच्या एक  ओळखीतल्या सरांनी केवळ परिस्थितीमुळे क्लास लावता येत नाही त्यामुळे स्पर्धेच्या युगात मी मागे पडू नये म्हणून पूर्ण दहावीचं वर्ष विज्ञान आणि गणिताचे माझे क्लास विनामूल्य घेतले. माझ्या पप्पांना परिस्थिती नसल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते, त्यामुळे मुलींनी खूप शिकावे मोठे व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. माझा सकाळी सहा वाजेला क्लास असायचा, मी पहाटे चारला उठून थोडा अभ्यास करून मग क्लासला जायचे. पप्पा मला रोज न चुकता उठवायचे, मी फ्रेश होईपर्यन्त माझ्यासाठी चहा बनवून ठेवायचे. मी कितीही सांगितलं कि 'तुम्ही झोपा मी क्लासला निघायच्या वेळी उठवेल तुम्हाला' तरीही ते माझ्यासोबत बसून रहायचे. मला काय हवं नको ते बघायचे मला नाश्ता बनवून द्यायचे नंतर मला क्लासला सोडायला यायचे. वर्षभर मला शाळेत सोडायलाही आले जेणेकरून प्रवासात माझं वेळ वाया जायला नको.
माझ्याइतकीच मेहनत त्यांनी पूर्ण वर्षभर तर  घेतलीच परीक्षेच्या वेळीही घेतली.

आज त्या मेहनतीचं फळ मला मिळालं होतं, मी केंद्रात पहिली आले होते पण मला आनंद नव्हता त्या गोष्टीचा कारण माझ्या यशात सिंहाचा वाटा असलेले माझे खऱ्या आयुष्यातील सिंह, माझे हिरो...माझे पप्पा माझ्या आयुष्यात नव्हते ????..हो बरोबर वाचलं तुम्ही..माझा  निकाल लागायच्या काही दिवस आधीच माझे पप्पा अचानकच हे जग सोडून गेले निमित्त झालं हृदयविकाराच्या झटक्याचं..
खरंच नियती इतकी निष्ठुर का होते कधी कधी?  इतके कष्ट आणि त्रास भोगून जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा त्यांना काहीतरी चांगल, आनंद देणारं बघायला, अनुभवायला मिळणार होतं त्याआधीच त्यांचे डोळे मिटले होते.

आज माझ्या सत्काराच्या दिवशी मला रोटरी क्लब कडून पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतही जाहीर होणार होती आणि प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफीही मिळणार होती.

नवरा गेल्यानंतर बाईने कसे जगावे यासाठी समाजाने काही निर्बंध आखून ठेवलेले आहेत, त्यावेळी तर जास्तच बंधन होती. सगळे नातेवाईक, शेजारीपाजारी आईला बोलत होते,  'सत्काराला जायचं नाही,अजून एक महिनाही झाला नाहीये नवरा जाऊन तू घराबाहेर जाऊ शकत नाही, ते लोक घरी पाठवतील बक्षीस,लोक नाव ठेवतील वगैरे वगैरे'..

माझी आई जिच्या डोळ्यापुढे तेव्हा किती अंधःकार असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही, पाच मुलं, रहायला स्वतःच घर नाही, जमीनजागा नाही कि कमाईचा दुसरा काही स्रोत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी शिवाय दुसरा काही मार्ग नाही कसं वाढवणार सगळ्यांना?  इतके सगळे प्रश्न तिच्यासमोर उभे असतानाही ती इतक्या पाहुण्याच्या गर्दीत ताडकन उठून म्हणाली, " लोक काय म्हणतील या विचाराने मी माझ्या मुलीचं मन का मारू?  तिचा हक्क आहे हा सत्कार, हा सन्मान तिच्या मेहनतीचं फळ आहे आणि सगळ्यात महत्वाचे तिच्या पप्पांना कधीच आवडलं नाही लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करणं.. मला लोक काय म्हणतील यापेक्षा माझ्या मुलांचं आनंदी राहणं जास्त महत्वाचे आहे.."

मी त्यावेळेला खूप काही समजण्याच्या वयात नक्कीच नव्हते पण तरीही आतून कुठेतरी जाणवलं कि तिच्यासाठी हे फार कठीण असणार तरीही तिने एवढी हिम्मत दाखवली..बस्स.. तो एकच क्षण माझ्या हृदयावर इतका खोलवर कोरला  गेला..त्या एका क्षणाने माझं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला..मला इतकं समजलं होतं कि दुःख येतात तशीच ती त्याचं वेगाने निघूनही जातात पण त्यावेळी आपल्याकडे दोनच मार्ग असतात एकतर खंबीरपणे उभे राहून लढणे किंवा दुःख कवटाळून बसून राहणे..आईने पहिला मार्ग निवडला होता आणि मी आईच्या पाऊलावर पाऊल ठेवण्याचा..आणि तो एक क्षण मला आयुष्य जगायला शिकवून गेला.

ती मला म्हणाली,  "आपण जाऊया मी येईल तुझ्यासोबत". मी फक्त मान डोलावली.
ती मला लोकांचा विचार न करता तिचं पर्वताएवढं दुःख बाजूला ठेवून मला तिथे घेऊन गेली हाच खरंतर किती मोठा सत्कार होता माझ्यासाठी..
मला सत्कार घेताना बघून किती आनंदी होती ती.
माझ्यासोबत तिथे आईचाही सत्कार झाला..उलट इतक्या बिकट परिस्थतीत ती मला तिथे घेऊन आली यासाठी प्रमुख पाहुण्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं...मला आतून कुठेतरी जाणवलं पप्पाही तिथेच कुठेतरी होते..शरीराने नाही तर मनाने..त्या दिवशी नक्कीच त्यांना त्यांची लाडकी  लेक आणि धाडसी बायको दोघींचाही अभिमान वाटला असेल..

गोष्ट छोटीशीच आहे पण त्यामुळे मला जीवन जगण्याची कला मात्र अवगत झाली म्हणून ती आठवण माझ्यासाठी नेहमीच खास आहे.

अशी ही माझ्या आयुष्यातील एक आंबटगोड आठवण आजही आठवून माझे डोळे पाणवतात पण मला माझ्या आईचा खूप अभिमानही वाटतो.
मला कौतुक वाटतं माझ्या आईचं किती धाडस आहे तिच्यात..ती स्वतःही खचली नाही आणि तिने  आम्हालाही खचू दिलं नाही. आज आम्ही सगळी भावंडं उच्चशिक्षित आहोत, स्वतःच्या पायावर उभे आहोत..

या अवघड मार्गांवर चालताना अनेक अडचणी आल्या पण परमेश्वर कोणत्या न कोणत्या रुपात येऊन आम्हाला मदत करत गेला आणि मार्ग निघत गेला पण खरंतर या अनुभवामुळेच खूप शिकायला मिळालं.. जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध झालं...