Oct 24, 2021
कथामालिका

आयुष्याच्या या वळणावर - भाग 38

Read Later
आयुष्याच्या या वळणावर - भाग 38

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

आयुष्याच्या या वळणावर - भाग 38

 

मागील भागात चा पण बघतो की मधू आणि आशुतोष च्या लग्नाची खरेदी झाली होती. मधू

त्याच दिवशी पुण्याला निघून आली.

 

मधुचे आई-बाबा दुसऱ्या दिवशी त्यांच्या गावी गेले. आता लग्नासाठी 2 आठवडे बाकी होते.

आशुतोष ला हे कळून चुकले कि त्याच्याकडे फक्त 1 आठवडा बाकी आहे.

 

गडबडीने तो मधूला फोन करतो. मधु पुढच्या आठवड्यात सुट्टी टाकणार होते. त्यामुळे ती ऑफिसच्या कामात जरा जास्तच बिझी होती.

 

आशुतोष चा फोन आल्यानंतर ती त्याचा फोन कट करते. तिकडे आशुतोषला मात्र काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. त्याच मन ऑफिसच्या कामात लागत नव्हतं.

 

घरातील सगळ्या लोकांना वॉच गिफ्ट करायचे ठरले होते. त्याचीच खरेदी बाकी होती. हीच गोष्ट आशुतोषला मधूला  आठवण करून द्यायची होती.

 

आशुतोष ला ही खरेदी एकत्र करायची होती. जायचे तर उदयाच जायचं असं त्याचं म्हणणं होतं 

कारण नंतर मधु ही सुट्टीवर जाणार होती. आणि आशुतोष  सुद्धा तिकडेच या फंक्शन मध्ये बिझी असणार होता. या सगळ्या विचारांनी त्याला आता काहीही अपेक्षा नव्हती. त्याला आता वाटू लागले  की आपली भेट होणारच नाही.

 

या सगळ्या विचारात गुंग असताना आशुतोषचा फोन वाजतो. बघतो तर काय मधु चा फोन होता.

 

मधु अगदी आनंदाच्या मूडमध्ये होते. कारण तिला दुसऱ्या दिवशी पासूनच सुट्टीवर जायची परवानगी मिळाली होती.

 

मधू : हॅलो आशुतोष मी फार आनंदात आहे आता...  मला उद्या पासून सुट्टी मिळाली. आता मी आपल्या लग्नाच्या तयारीसाठी उद्यापासून जाऊ शकते.

 

आशुतोष: हॅलो मॅडम.... मला बोलून तर दे.... काहीतरी विसरत आहेस...

 

मधु : लग्नाच्या तयारी पैकी काही आहे का?? असं असेल तर शक्यच नाही माझी सगळी तयारी झाली आहे.... ड्रेसिंग, पार्लर, बाकीची शॉपिंग सगळे झालं आहे..

 

आशुतोष: लग्ना अगोदरआपल्याला एकदा भेटायचं होतं.

 

मधु: ओ माय गॉड विसरूनच गेले मी.... भेटून आपल्याला सगळ्यांसाठी गिफ्ट खरेदी करायचे होते 

सॉरी आशुतोष मी विसरून गेले आता आपल्याकडे एकच दिवस आहे...

आता कसं काय मॅनेज करायच आपण...

 

आशुतोष : नको टेन्शन घेऊ मी सुद्धा विसरलोच होतो.... मगाशी तुला फोन केला तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं... म्हणून गडबडीने तुला फोन केला होता.... मी त्‍यासाठी प्लान बनवला आहे. उद्या मी तुझ्याकडे येतोय.

 

मधू : असं ही माझी थोडीफार शॉपिंग करण्यासाठी मी दोन दिवस इकडेच थांबणार आहे. तस मी घरी सांगितला आहे....

 

आशुतोष: घरचे ठीक आहे पण उद्याचा वेळ मात्र फक्त माझा असेल... शॉपिंग वगैरे करायची असेल ती नंतर कर....

 

मधू : हो बाबा ठीक आहे...

 

दुसरा दिवस उजाडतो.. आशुतोषने मित्रांबरोबर शॉपिंग ला जात आहे असं घरी सांगितलं होतं. सकाळी सातच्या दरम्यान आज लवकर निघाला. अकरा वाजेपर्यंत तो मधु कडे पोहोचला.

 

मधु इकडे तयार होऊन बसली होती.

दोघे जण मिळून सगळ्यांसाठी प्रत्येकाला सूट होतील अशी गिफ्ट खरेदी करतात. दुकानाचे मालक आशुतोष चे मित्र होते. ते सगळे गिफ्ट लग्नाच्या आदल्या दिवशी प्रत्येकाला मिळतील याची काळजी घेणारा होता.

 

ठरल्याप्रमाणे लग्न अगदी थोडक्या माणसात होणार होता.

 

मधु आणि आशुतोषने लग्नाच्या अगोदरचा हा भेटीचा शेवटचा दिवस अगदी क्षणो क्षण जगला होता. आता मात्र ते डायरेक्ट लग्नाच्या वेळेस भेटू शकणार होते. दोघांना एकमेकांना निरोप देणे जड जात होतं.

 

अगदी जड अंतकरणाने आशुतोषने मधूला निरोप दिला. पूर्ण दिवस एकत्र घालवल्यानंतर रात्री पाच वाजता आशुतोष पुण्याहून मुंबईला निघाला.

 

बघुयात म लग्न कस होतेय..

 

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now