Oct 24, 2021
कथामालिका

आयुष्याच्या या वळणावर - भाग 35

Read Later
आयुष्याच्या या वळणावर - भाग 35

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

आयुष्याच्या या वळणावर - भाग 35

 

मागील भागात आपण पाहिले कि सगळे रात्री 9 वाजता एकत्र यायचे ठरले. सगळे जण अगोदरच तयार होते. आशुतोष ने सगळयांना कॉल केला.

 

महेश काका : हॅलो कसे आहात सगळे जण??

 

मधुचे आईबाबा : आम्ही सगळे छान आहोत... तुम्ही कसे आहात,??

 

आशुतोष चे आईबाबा : हो आम्ही पण मस्त आहोत..

 

महेश आणि मीना : हो सगळे जण छान आणि खुश आहेत.. सगळयांचा उत्साह बघून समजतंय ते...

 

सगळे जण हसतात.

 

महेश: बरं आशुतोष आणि मधुरा दोघांचं खूप खूप कौतुक.... तुम्ही अशा कमी माणसात साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.. आम्हा सर्वांना खूप आवडले...

 

सुरेश : हो नक्कीच...

 

प्रकाश: अरे मुले ही सर्व बाजूंनी विचार करतात आजकाल...

 

महेश: बर मग आता आपण.. शॉपिंगच काय करायचं आहे..

 

स्मिता (आशुतोष ची आई)  : जसं इंगेजमेंट आपण सगळ्यांनी एकत्र शॉपिंग केली. तशीच आत्तासुद्धा  सगळ्यांनी मिळून खरेदी करूयात...

 

सुवर्णा ( मधु ची आई ): म्हणजे सगळ्यांच्या पसंतीने खरेदी होईल...

 

आशुतोष : असं म्हटलं तर आता फक्त वीस दिवस उरले आहेत...  आपल्याला या की मग पुढच्या आठवड्यात शॉपिंग करावे लागेल..

 

मीना: अरे पुढच्या काय याच आठवड्यात शॉपिंग करावी लागेल..

 

मधु: हो म्हणजे मला नंतर तयारीला बरं पडेल...

 

आशुतोष : ठीक आहे मग आपण मुंबईला शॉपिंग केली तर चालेल??

 

महेश आणि मीना: हो आपला काही प्रॉब्लेम नाही...

 

सुवर्ण आणि सुरेश: ठीक आहे मी एकदा बबलू आणि आजोबांशी बोलून बघतो... तस  आपण ठरवू 

 

मधु : हो ठीक आहे बाबा..

 

आशुतोष: येत्या रविवारी सगळे फ्री आहात का??

 

महेश आणि मीना : मी दोन दिवसात कळवतो तुला..

 

आशुतोष: हो ठीक आहे सगळ्यांनी एक-दोन दिवसात कळवलं तरी चालेल... म्हणजे तसा पण प्लान करू... मला दुसरा दिवस प्लॅन करायला हवा...

 

सुरेश: हो ठीक आहे मी सुद्धा दोन दिवसात कळवतो...

 

आशुतोष: yes ठीक आहे मी बबलूला इथेच विचारतो... तो आजची मीटिंग अटेंड नाही करू शकला... मी त्याला कळवेन...

 

महेश : ठीके मग चला बाय गुड नाईट...

 

स्मिता आणि प्रकाश: चला बाय गुड नाईट

 

सुरेश आणि सुवर्णा: गुड नाईट...

 

 

सगळेजण फोन कट करतात. आता फक्त मधु आणि आशुतोष फोनवर असतात.

 

आशुतोष : हा मॅडम संपला कॉल ठेवा फोन आता...

 

मधु : मला कोणी विचारलं नाही मला वेळ आहे की नाही ते ( मस्करी बोलून जाते)

 

आशुतोष: एम रियली सॉर....  विसरलोच की तुला....  मिस मधु... येणाऱ्या रविवारी..  चिरंजीव आशुतोष आणि ची सौ का मधू.... यांच्या लग्नाची खरेदी करायला जायचं ठरलं आहे...  तुम्हाला वेळ आहे का???

म्हणजे वेळ असेल तर आपण पुढे आपण कळवू..

 

मधू: नाही... माझं खूप बिझी शेड्युल आहे.. तुम्ही आज कळवू शकणार नाही...  सांगेन दोन-तीन दिवसात.....

 

आशुतोष : ठीक आहे झोप आता खूप झाली मस्करी..

 

मधू : हो ठीक आहे टू पण झोपा गुड नाईट. 

 

आशुतोष : गुड नाईट बाय...

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now