आयुष्याच्या या वळणावर - भाग 31
मागील भागात आपण बघितले की मधुला तिच्या आईचा फोन येतो. तिच्या बोलण्यातून समजते की हा निर्णय तील आवडला नव्हता.
हा निर्णय मधुचा होता. त्या मुळे तिचा मन तिला खात होतं..
ऑफिस वरून घरी आल्यानंतर... मधुने आशुतोष ला फोन केला.
आशुतोष : हॅलो मधून बोल ना काय झालं... अचानक फोन केलास...
मधु : दुपारी आईचा फोन आला होता... तिच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की तिला हा निर्णय मान्य नाही.... मला खूप अपराधी झाल्यासारखे वाटते.. मी आईला दुखावला आहे असं मला वाटतं....
आशुतोष : हे बघ मधू... हा निर्णय तुझा एकटीचा नाहीये.... या निर्णयाला पाठिंबा केला नसता.... हा विषय पुढे गेलाच नसता.... इतका वाईट वाटून घेऊ नकोस.... आणि हवा तर मी फोन करु का आईंना.. मी बोलेन त्यांच्याशी....
मधू : अरे नाही.... बाबांशी बोलेल असं मला म्हटले आहे... उद्या फोन करेल मी तिला....
आशुतोष: ठीक आहे... गरज लागली तर सांग कि बोलेन आईशी....
मधू : हो ठीक आहे...
आशुतोष : आणि एक तू एकदा बाबाना कॉल कर आणि या सगक्यची कल्पना देऊन ठेव...
म्हणजेच आईला समजवताना त्याना सोपं जाईल..
मधू : हो चालेल....
आशुतोष : तू आता अजिबात विचार करु नकोस ..आणि गिल्टी तर अजिबातच नको....
जा जेवून घेऊ आता..
मधू : हो मी जेवते.... बोलूयात नंन्तर... जेवण झाल्यावर मी बाबाना कॉल करते...
आशुतोष : ठीक आहे कर चालेल.... चल म ठेवू फोन...
मधू : हो चल बाय....
फोन ठेवल्यानंतर मधू फ्रेश होते आणि जेवण करायला जाते...
इकडे मधुचं बोलण झाल्यनंन्तर आशुतोष थोडा चिंतेत होता.... त्याला नन्तरची भीती होती... जर आई असं लग्न करायला तयारच झाल्या नाहीत तर काय करयचा हा नवीन प्रश्न त्याच्या समोर होता...
मधू तिचन जेवण आवरून घेते. नंन्तर तिला बाबाना कॉल करायचा होता. पण कॉल करुन बोलणार काय हे होतच कि ..... हा विचार माझ्याच डोकयातील आहे म्हणल्यावर... बाबांना ते आवडेल न आवडेल या बद्दल काहीच सांगता येत नव्हते.. आणि जर मी असं सांगितले तर आशुतोष खोटं बोलला आहे असं होईल.. काय करयचा तिला सुचत नव्हत... नंन्तर तिने ठरवलं आता तरी आईच्या फोन बद्दल बोलूयात नंन्तर आशुतोष शी बोलून ठरवेन काय करयचा ते.....
मधू बाबाना कॉल करते..
मधू : हॅलो बाबा कसे आहात??
बाबा : मधू बोल ना... मी मस्त आहे... तू कशी आहेस....
मधू : मी पण छान आहे..... बर बाबा फ्री आहात का मला बोलायचं आहे तुमच्याशी....
बाबा : हो बोलना मी आहे फ्री....
मधू : बाबा आईचा फोन आला होता... लग्नच्या निर्णयाबद्दल बोलायचं होत तिला.... एकंदरीत तिला तो निर्णय आवडला नाही अस दिसत होत..
तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होत...
बाबा : हो माहिती आहे मला... मी घरात विषय काढल्या पासून ती जरा अस्वस्थ आहे...
मधू : बाबा...आई तयार होईल ना नक्की..
बाबा : असं ही मला तिच्याशी बोलायचं होतच... बोलेन मी रात्रीच तिच्या बरोबर.... तू नकोस टेन्शन घेऊ...
मधू : हो बाबा.. पण बाबा तुम्हाला आणि बाकी सगळ्यना पटल न.. हे सगळे...
बाबा : हो मधू मला तर हा निर्णय आवडला आहे... आणि तुझे आजोबा तर खूपच खुश आहेत... त्याना तर हा निर्णय खूप आवडला आहे... तू नकोस विचार करु.... आईला मी समजवतो......
मधुची आई तयार होईल???
Let's see.....