आयुष्याच्या या वळणावर - भाग29
मागील भागात आपण बघितले की मधु आशुतोष कडे तिची एक इच्छा व्यक्त करते. आशुतोषला आहे तिचं म्हणणं पटतं आणि तो हा विषय घरच्यांसमोर काढतो. आशुतोषच्या घरच्यांनाही या निर्णयाने काही प्रॉब्लेम नव्हता. आशुतोष च्या आई आणि बाबानी हा निर्णय मधूच्या घरी सांगण्याची जबाबदारी घेतली होती.
ही सगळी हकीकत आशुतोषने त्याच रात्री फोन करून मधूला सांगितली. तिचा निर्णय सगळ्यांना आवडला होता आणि सगळे पाठिंबाही करत होते यामुळे मधु आनंदात होती. आज रात्री आशुतोष ची आई बाबा, मधु, आणि मधूचे आई बाबा एकत्र मिळून फोन करणार होते.
ठरल्याप्रमाणे आशुतोष ही ऑफिस वरून लवकर आला. ते तिघे जण एकत्र बसले होते. आशुतोष च्या बाबांनी मधुच्या बाबांना फोन केला. आशुतोषने मधुला ही कॉन्फरन्स कॉल वर घेतले.
प्रकाश( आशुतोष चे बाबा ): सुरेश भाऊ कसे आहात???
सुरेश ( मधु चे बाबा ): मी मस्त मजेत तुम्ही मंडळी कसे आहात???
प्रकाश : इकडे सगळे छान आहेत.... लग्न संबंधित थोडी चर्चा करायची होती...
सुरेश : हो येत्या दोन दिवसात मी घरी बोलून तुम्हाला कॉल करणार होतो. तोच तुमचा कॉल आला. बोला ना...
प्रकाश: आपल्या दोन्ही घरचं पहिलंच कार्य आहे. आपल्या दोघांनाही असंच वाटतं की ते थाटामाटात पार पडावा. पण काल आशुतोषने माझ्याकडे एक वेगळाच विषय मांडला. आणि खरे तर मला हे त्याचं म्हणणं पटलं. हेच तुम्हाला बोलायचं होतं . त्याची अशी इच्छा होती की याप्रमाणे साखरपुडा अगदी मोजक्याच माणसात अगदी व्यवस्थित पार पडला. तसेच लग्नही अगदी थोडक्या माणसातच करायचे. आणि जी काही बचत होईल ती आपण डोनेट करायचे... बोला सुरेशराव कसा वाटतो आहे हा विचार तुम्हाला???
सुरेश : मधुला या सगळ्याची कल्पना आहे???
मधु : हो बाबा याबद्दल मला माहिती आहे... ( मधूला कळून चुकल े आशुतोषने हा विचार मध्येच आहे हे घरी सांगितले नव्हते )
सुरेश : ठीक आहे म .. मी एकदा घरी सगळ्यांशी बोलून घेतो. मग आपण ठरवूयात..
प्रकाश: हो ठीक आहे चालेल.. तसं असेल तर मग... अगदी साखरपुडा झाला त्या प्रमाणेच... लग्न सुद्धा अगदी साग्रसंगीत आणि थोडक्या माणसात करूयात...
सुरेश: ठीक आहे मी दोन दिवसात फोन करून कळवतो....
प्रकाश: हो नक्की.. चला तर मग बोलूया दोन दिवसांनी..... बाय...
सुरेश : बाय
( मधू चा फोन चालूच होता...)
स्मिता: मग काय म्हणते आमची सुनबाई....
मधू: हॅलो आई... मी आत्ताच ऑफीसवरुन आले. कशा आहात???
स्मिता : मी मस्त मजेत....आता बस तुझी वाट बघतोय....
मधु : बाकी सगळे कसे आहेत???
स्मिता: सगळे अगदी मस्त आहे तू काळजी घे....
चला मी जेवायला बसतोय आता... बोलूयात नंतर बाय
मधु: हो ठीक आहे आई बाय....
आशुतोष ने सांगताना हा निर्णय माझा आहे असं का सांगितले नाही हा विचार राहवून मधुच्या मनात घोलवत होता...
मधुच्या घरी हा विचार आवडेल????
बघूया काय होतेय पुढे....