Login

आयुष्याच्या या वळणावर - भाग 28

आशुतोष: बाबा तुमचा काय पण ठेवला आहे माझ्या लग्नाबद्दल..... म्हणजे कसं कुठे काय त्याचं काही ठरवलं आ

आयुष्याच्या या वळणावर - 28

मागील भागात आपण बघितले की मधूने आशुतोष कडे एक इच्छा व्यक्त केली होती. तिचं ते मत आशुतोष ला हि मनापासून पटलं होतं. म्हणून  या विषयात आशुतोषने पुढाकार घ्यायचं ठरवलं.

आशुतोष त्यादिवशी ऑफिसमधून घरी आला होता. फ्रेश होऊन तो किचनमध्ये आला. त्याचवेळी  घरी आई बाबा सुद्धा नाष्टा करत बसले होते. आशुतोष  जाऊन टेबल वर बसला.

आई-बाबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे.

बाबा : अरे मग बोला...

आशुतोष: बाबा तुमचा काय पण ठेवला आहे माझ्या लग्नाबद्दल..... म्हणजे कसं कुठे काय त्याचं काही ठरवलं आहेत का??

बाबा : अरे नाही रे असं काही मी ठरवलं नाही..  आता आपण सगळे एकत्र चर्चा करू. आणि.... मंडळींनाही सांगू.... सगळ्यांची मते विचारात घेऊन आपण निर्णय घेऊयात.

आई: हे बघ आशुतोष... आपल्या घरातील हे पहिलं आणि शेवटचं कार्य आहे...... आणि मला ते एंजॉय करायचा आहे...

आशुतोष : हो गं आई..... सगळ तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल.... ठीक आहे ना...

आई : अरे असं नाही रे....  प्रत्येक मुलीच्या तिच्या स्वतःच्या लग्नाबद्दल... आईच्या तिच्या मुलाच्या लग्नाबद्दल.. काही माफक अपेक्षा असतात.... म्हणून बोलले.... बाकी सगळे निर्णय आपण सगळ्यांची मत विचारात घेऊनच करूयात..

आशुतोष: बाबा माझं आणि मधू च या विषयावर बोलणे झाले आहे . आणि मला अगदी सोप्या आणि साध्या  पद्धतीने... अगदी मोजक्याच  आणि आपल्या जवळच्या  माणसात करायची इच्छा आहे.. आणि आम्ही एक निर्णय घेतला आहे. या सगळ्यातून जी काही बचत होईल ते आम्ही  एका अनाथ आश्रमाला दान करणार आहोत. अर्थात हे सगळं तुमच्याशी डिस्कस  करूनच पुढे जाईल... आम्हा दोघांचे असं म्हणलं होत. बाकी सगळ्यांची हाऊस असेल ती पूर्ण करूया....

( आशुतोष चे आई बाबा त्याच्याकडे एकटक पहात होते)

बाबा बोला ना काहीतरी... मलाही तुमचं मत कळू दे... जर तुम्हाला पटत नसेल तर आपण यातून मधला मार्ग आहे. आम्ही आमची इच्छा त्यांच्यावर लादत नाही आहोत..

बाबा : वा.... खुप छान विचार आहे.. मला आवडला. ज्या पद्धतीने साखरपुडा अगदी छान पार पडला तसेच आपण लग्नात ही प्लॅनिंग करु

स्मिता  तुझं काय म्हणणं आहे यावर ????

आई : तुम्हा सगळ्यांना चालणार  असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही.

बाबा: मला माहिती होतं स्मिता तुझ्या सुद्धा हेच मत असेल.

आशुतोष : थँक यु सो मच... मला वाटलं होतं हे सगळं इतक्या सहज पद्धतीने होईल... पण मला तुमच्या सोबतीने अजून धीर मिळाला. आपल्याला तिकडच्या लोकांशी बोलायला हवं...

बाबा : त्याचं काय रे... तुमचे लग्न आहे तुमच्या तुमच्या  जशा  इच्छा असतील तर त्याप्रमाणे होईल.... आणि आम्ही सोबत आहोतच... बर तू तिकडच्या टेन्शन घेऊ नको मी त्याना कॉल करेल 

उद्या संध्याकाळी जरा लवकर ये... आपण तिघे एकत्र बसून त्यांना कॉल करूया मग तर चालेल का.....

आशुतोष : हो बाबा नक्की.....

बघूया तिकडच्या मंडळींचा काय म्हणणं आहे....?