प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यातला पहिला गुरु त्याला जन्म देणारी आई असते. आई! आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्र्वर! ती आई जी आपणाला बोलायला, चालायला शिकवते. चुकलं तर कानाखाली देते, आगवपना केला तर मारते, चांगली गोष्ट केली तर प्रेमाने जवळ घेते,डोक्यावरून हात फिरवते,माझ्या मुलांना सुखात ठेव त्यांचं रक्षण कर अशी मागणी देवाकडे करते.
देव प्रत्येक घरामधे जावू शकत नाही म्हणून देवाने आई निर्माण केली आहे आपण कितीही मोठे झालो तरी तिच्यासाठी आपण लहानच असतो. स्वामी तिन्ही जगाचा आईविना विना भिकारी! अस म्हणतात. आई आयुष्यात असणं किती महत्वाचं असतं,ती आपली प्रत्येक गोष्ट करते, आपल्याला चांगलं चांगलं जेवू घातले,ती नेहमी आपल्या भविष्याची काळजी करते, माझ्या मुलाला नोकरी मिळेल की नाही, कॉलेज च्या फी चे पैसे कुठून येतील,मुलीला कस सासर मिळेल,असे आणि यासारखे कित्येक विचार तिचा मनामधे येत रहातात... स्वत:ची स्वप्न, विचार, हौसमौज, आवडीनिवडी,छंद सगळं विसरून जाते . एक आई म्हणून ती यशस्वी होते,पण एक स्त्री म्हणून तीच अस्तित्व काय असतं? चार भिंतीच घर सोडून तिचं काही जग असतं का? तिचा नवरा आणि मुले सोडून तिचं काही जग असतं का? चूल आणि मूल याभोवती तीच आयुष्य फिरत राहत,का?
चला तर मग आपण थोडंसं आपल्या आई ला समजून घेऊ.तिचीही काही स्वप्न असतील,ती पूर्ण करायला मदत करू.तिचेही काही विचार असतील, आवडीनिवडी असतील, तिचीही काही नवीन करण्याची ईच्छा असतील.ती आतापर्यंत आपल्यासाठी जगली, आता आपण थोडंसं तिच्यासाठी जगूया.....!
प्रत्येक आई मधल्या स्त्री ला जिवंत करूया, तिच्या स्वप्नांना नवे पंख देवूया, तीला ही स्वतः साठी जगायला शिकवूूया.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा