नम्रता : हे बघ स्वप्नील तू शांतपणे विचार कर हे एवढे इझी नाही आहे माझ्यासाठी आणि तू मला सोडून दिलं तर मी कुठे जाणार( त्याला रिक्वेस्ट करतच बोलते)
स्वप्निल : हा विचार तू आधी करायला पाहिजे होता ज्या वेळेस मी राधिका ला सोडून गेलो त्यावेळेस तिने काय केलं होत आणि त्यात तर ती एकटी नव्हती माझ्या मुलाची आई सुद्धा होणार होती तरी तिने सगळं व्यवस्थित स्वतःला सांभाळून घेतलं तिची चूक नसताना सगळं काही सहन केलं.....मग तु तर एकटी आहेस....घेशील व्यवस्थित सगळं सांभाळून.....नाहीतरी तुझ्या डोक्यात अशा बर्याच काही गोष्टी चालू असतात होईल तुझं सगळं व्यवस्थित पण आता मला तुझ्याबरोबर एक क्षणही थांबायचं नाहीये मला माझं पुढचं आयुष्य माझ्या राधीका आणि माझ्या मुलाबरोबर घालायचा आहे आणि जर का तू ह्या पेपर वर सही केली नाही तर तुझा हा व्हिडीओ मी पोलीस स्टेशनला दाखवेल मग बघ तुला काय करायचे ते.....
(पोलिसांचं नाव घेताच नम्रताला भीती वाटते ती तशीच सोफ्यावर बसत आणि स्वप्नील डोळे पुसतच आत मध्ये निघून जातो)
नम्रता रडतच खाली बसते....तिला आता तिने जे काही केलं त्याचा पश्चाताप होत असतो ती रात्रभर त्या सोफ्यावरच बसून असते ते
@@@@@@@@@@@@@@@@@@@
दुसऱ्या दिवशी स्वप्निल ला उशिरा जाग येते त्याचं डोकं खूप जाड झाले बाजूलाच पाण्याचा ग्लास असतो तो पाणी प्यायला उठणार तोच त्याला तिकडे डीव्होर्स पेपर सही केलेले दिसतात आणि त्याच्या खाली एक चिट्ठी दिसते.....ती चिठ्ठी नम्रताची असते.....
नम्रता : स्वप्नील ......मि घर सोडून जात आहे .....तुला ज्या पेपर वर सही हवी होती ती मी केली आहे......पण स्वप्नील माझा हेतू जरी चुकीचा असला तरी माझं प्रेम खर होत.....मी खूप प्रेम करते तुझ्यावर......आणि करत राहणार....मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणावर तरी प्रेम केलं....अगदी मना पासून..... त्या प्रेमात मी इतकी आंधळी झाले होते की मला स्वतालच नाही कळालं की मी काय करते....मला फक्त आणि फक्त तूच माझ्या आयुष्यात हवा होता.....आणि ते कोणत्याही मार्गाने असो....पण मला तु हवा होतास....म्हणून मी हे सगळं केलं....स्वप्निल जमलं तर मला माफ कर......आणि मी राधिका ची सुद्धा माफी मागते....हे तु तिला सांग.......मी जशी अपराधी तुझी आहे तशीच मी राधिका आणि तुझ्या मुलाची सुद्धा आहे......मला माहित आहे माझा गुन्हा माफ करण्या सारखा नाहीये.....पण तरी पण कुठे तरी तुझ्या मनात माझ्या साठी जागा असेल तर मला माफ कर......आपल्या डीव्होरर्स पेपर च्या पुढच्या प्रोसिजर साठी जर तुला माझी अजुन सही हवी असेल तर मला सांग मी ते करायला नक्की येईल......पण स्वप्नील....मी तुझ्या वरती प्रेम करते आणि करत राहणार.....तुझी जागा माझ्या मनातून कोणीच नाही घेऊ शकत.......प्लिज जमलं तर मला माफ कर......आणि संदीपला सुद्धा सांग मला जमलं तर माफ कर.....जेवढी मी तुमच्या सगळ्यांची अपराधी आहे तेवढीच मी त्याची सुद्धा अपराधी आहे.....मला शेवटच माफ कर .......तुझी नम्रता
(स्वप्नीला आता रडणं थांबवत नसत....तो तसाच पुन्हा बेडवर पडून डोळे बंद करून शांत झोपतो.....त्याच्या डोक्यातून जो त्याच्या आयुष्यात घडलेला प्रकार आहे तो सगळा त्याला आठवतो)
@@@@@@@@@@@@@@@@
थोड्यावेळाने स्वप्निल ला जाग येते तो लगेच बाबुला फोन करून नम्रताने कडून डीव्होर्स पेपर वर सही केली याची म माहिती देतो......बाबू सुद्धा तिने हे सहज सही केली ह्याच्यावर आश्चर्यचकित होतो..... स्वप्निल थोड्यावेळाने फ्रेश होऊन त्याच्या कामावर जायला निघतो काही झालं तरी त्याला आज घर थोडं खाली खाली वाटतं....... एवढ्या वर्ष त्याला नम्रता आजूबाजूला असल्या ची सवय झालेली असते असल्याची पण लगेच तो त्याच्या तंद्रीतून बाहेर येतो आणि त्याच्या कामाला जायला निघतो.....
आज स्वप्निलच कामामध्ये मन नसतं पण तरी पण तो त्याचं काम मनापासून करतो..... संध्याकाळ होते .... स्वप्नील तसाच राधिकाच्या घरी जातो तो घरी येता येता स्वराज्यासाठी काही खेळणी घेऊन येतो
स्वप्नील : स्वराज .....स्वराज ....बाहेर ये.....मी बघ काय आणलंय तुझ्यासाठी .....(आनंदात)
स्वराज : ('पपा ......बोलत धावतच स्वप्नीला बिलागतो) तुम्ही आलात......मला तर आजी बोली आज तुम्ही नाही येणार....(स्वप्नील मीनाताई न कडे बघतो)
स्वप्नील : अरे अस कस....मी का नाय येणार.....आता मी नेहमी येणार....पण ना माझे थोडं काम इथे बाजूलाच असत त्यामुळे मी तुला कधी कधीं नाही भेटणार......पण ते जाऊदे हे बघ मि तुला काय आणलंय.....तु आधी डोळे बंद कर
स्वराज डोळे बंद करतो.....
स्वप्नील : आता खोल डोळे......
स्वराज समोर असलेले खेळणी बघून खुश होतो.....वाव...'पपा हे काय इतके सारे खेळणी.....थंक्यु.....(म्हणतच गळ्यात पडतो.....)
स्वराज एक एक खेळणी उघडतो......'पपा मी हे बॅट बोल माझ्या फ्रेंड्स ला दाखवुन येतो......
स्वप्नील : हो चालेल.....(स्वराज स्वप्नीलच्या गालावर एक पापी देऊन निघून जातो)
स्वप्नील : आई राधिका दिसत नाहीये....आली नाही का अजून...???
मीनाताई : नाही आली....आज उशीर होणार बोली ती मला......तु बस मी चहा टाकते तुझ्यासाठी....
स्वप्नील : नाही नको ....माझं राधिका कडे काम आहे....मी तिला शॉप वर जाऊन भेटतो.....
मीनाताई : अरे निदान चहा तरी घे.....अस नको जाऊस...थांब....( मीनाताईंच्या आग्रह करता स्वप्निल चहा पिऊन निघतो)
( थोड्याच वेळात स्वप्निल शॉप वर पोहोचतो तिकडे राधिका मन लावून तिचं काम करत असते..... तिला बघून स्वप्निल चं मन भरून येतं.... तो त्याच्या तंद्रीतून बाहेर आल्यावर शॉप मध्ये एन्ट्री घेतो..... स्वप्निल ला आलेला बघून राधिका त्याच्याजवळ जाते)
राधिका : तू इथे कसा काय काही काम होतं का...???
स्वप्निल: हो थोडं काम होतं..... तुझ्याकडे वेळ आहे थोडासा
राधिका त्याला घेऊन बाहेर असलेल्या चेअर वर बसवते
राधिका : हा बोल काय झालं ????
स्वप्निल : राधिकाच्या समोर नम्रता ने केलेले डीव्होरर्स पेपर सरकवतो( मी नम्रता कडून घटस्फोट घेतलाय..... हे त्याचे पेपर.... लवकरच आमचा घटस्फोट होईल त्याच्यानंतर मी तुला आणि स्वराज ला आपलं नाव देईल)
राधिका ते पेपर हातात घेते आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहत..... पण पुढे नम्रताच काय होईल तू त्याचा विचार केलास .....का कारण एकटे जीवन जगणं साधं नसत रेहे तु मला विचारा
स्वप्निल : हा विचार तिने केला पाहिजे होता ज्या ....वेळेस ती तुझ्यासोबत असं वागली ....का तू एकटी राहून आपल्या मुलाला सांभाळत होतीस ना मग ती नाही राहू शकत का आणि तिने जे काही केलं त्याचीच शिक्षा तिला मिळते......बाकी काही नाही.....(तेवढ्यात त्याला नम्रताचा कॉल येतो...स्वप्नील आश्चर्याने बघतो.)
नम्रता : हॅलो स्वप्निल मला राधिका बरोबर बोलायचं आहे मला माहिती आहे आता तू तिच्यासोबतच असणारे ती जर तुझ्या बाजूला असेल तर प्लीज तिला फोन दे
स्वप्निल राधिकाला फोन देतो आणि हळू आवाजात बोलतो नम्रता ला तुझ्याबरोबर बोलायचं आहे
राधिका थोडी टेन्शन मध्ये येत फोन घेते
नम्रता : कशी आहेस राधिका
राधिका : मी बरी आहे( टेन्शन मध्ये येतच बोलते)
नम्रता: कुठून सुरुवात करू माझं मलाच कळत नाही.... मी जे काही केलं ते प्रेमामध्ये आंधळे होऊन केल माझा हेतू तुला दुखवायचा नव्हता.... पण काय करणार माझं खुप प्रेम होतं स्वप्नील वर त्यामुळे मला असं सतत वाटत होतं की तू आमच्या दोघांच्या मध्ये येतेस.... त्यामुळे मला तुझ्यावरती जेलसी फील व्हायची..... स्वप्निल आणि तुझे प्रेम खूप बहरत जात होता त्याला बघून मला खूप वाईट वाटायचं.... जी गोष्ट माझी होती ती दुसऱ्या कोणाला तरी भेटत होते त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं माझा आहे..... तो फक्त तुला त्याच्या पासून दूर करायचा होता.... पण ते काही शक्य होत नव्हत म्हणून मी हे सगळं केल....पण मला हे समजत नव्हतं की हे एकतर्फी प्रेम आहे जे कधीच सक्सेस होत नाही...... मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं पण तो आजपर्यंत तर कधी माझा झालाच नाही कारण आज पर्यंत त्याने फक्त आणि फक्त तुझ्या वरती प्रेम केलं..... मी सतत त्याच्या प्रेमाला आपलं करावसं ह्याचा प्रयत्न करायची.....तो कधीच माझ्या जवळ आला नाही का माहितीये कारण त्याच्या मनामध्ये फक्त तुझं चित्र होत.... त्याच्या मनामध्ये मी कधीच जागा घेऊ शकले नाही .....किती खरं प्रेम होतं तुमचं आणि मी काय केलं आता तर मला माझीच चीड येते....माझा माझ्यावरच राग येतो.... मला माहितिये मी जे केलं ते माफीच्या लायकीची नाहीये....... पण तरीपण तुला जमलं तर मला माफ कर... तुला माहिती सर्वात जास्त गुन्हेगार मी कोणाची ये... तुमच्या दोघांच्या मुलाची..... ज्याला मी एवढ्या वर्ष त्याच्या वडिलांपासून लांब ठेवला...... मला आता तुमच्या....समोर नाही यायचं... मला खूप लाज वाटते...जमलं तर .....मला मनापासून माफ कर......प्लिज राधिका
राधिका : शांतपणे जे झालं ते विसरून जा कारण त्याच्यामध्ये तर काही बदल होणार नाही पण आता याच्यापुढे तू काय करणार...????
नम्रता : त्याची तू काळजी नको करूस मी माझा मार्ग निवडला आहे.... मी माझ्या आई-वडिलांना जवळ जाणार आहे ते लोक गावी आहेत विचार करते त्यांचा जवळ पुढचा आयुष्य घालाव..... तुला तुझ्या नवीन आयुष्यासाठी ऑल द बेस्ट आणि हो स्वप्नीला मी बोलले आहे अजून कोणत्या कागदपत्रांवर ती माझी सही लागली तर मला बोलावून घे..... ठेवते आता माझ्या बरोबर बोललीस त्यासाठी थँक्यू(नम्रता रडतच कॉल ठेवते)
राधिका स्वप्नीला फोन देते......
राधिका : खूप अवघड होऊन बसलय सगळं.....काहीच सुचत नाहीये....काय करावं ते.... माझं तर डोकंच काम करत नाहीये......हे काय होऊन बसल स्वप्नील...
स्वप्निल : या गोष्टीचा कशाला जास्त विचार करतेस... ज्यात तुझा कोणताच सहभाग नाही आहे .....मग त्याचा विचार का करायचा.... विचार तिने करायला हवा होता तो पण खूप आधी ज्या वेळेस तिने हे सगळ घडवून आणलं आणि आता सारखा सारखा मला तो टॉपिक नको आहे जे झाले ते झाले मला नव्याने सुरुवात करायची आहे...... मी लवकरात लवकर हा घटस्पोताची प्रोसिजर करेल म्हणजे मला तुला आणि स्वराज ला आपलं नाव देता येईल ....
राधिका एकटक त्याच्याकडे बघते......
स्वप्नील : काय झालं ????
राधिका : काही नाही.....(डोळे पुसत)
स्वप्नील: ( तिच्या हातावर हात ठेवतो )तुला काही बोलायचं आहे का...?????
राधिका : हे सगळे अचानक सगळं घडत आहे त्यामुळे थोडे अवघडल्या सारख वाटतय
स्वप्निल काही काळजी करू नकोस आता यावेळेस आपल्या दोघांच्या मध्ये कोणी येणार नाही हे खूप आधीच व्हायला हवा होता पण जाऊ दे जे झाल ते झालं..याला विसरायचा प्रयत्न कर मी सुद्धा तेच करतोय
राधिका मानेनेच हो बोलते.....
स्वप्निल : चल मी निघतो आता यापुढे कामावर जायच आहे आणि पेपर पण द्यायचे .... तु तुझी काळजी घे स्वराज आणि आईची पण काळजी घे ... लवकरच आपण एकत्र होऊ
एवढं बोलून स्वप्निल निघून जातो राधिका त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहते
( काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा