Jan 27, 2022
प्रेम

अविश्वास त्याचा(पार्ट 1)

Read Later
अविश्वास त्याचा(पार्ट 1)

(नमस्कार वाचकांनो मी सोनाली पंकज शेजाळे आज पुन्हा माझी तिसरी कथा घेऊन येत आहे ही कथा एका कोवळ्या वयाच्या प्रेमाची आहे मी आशा करते माझ्या इतर कथेला जसे तुम्ही भरभरून प्रेम दिले तसेच याही कथेला द्याल ला मग सुरवात करूया माझ्या तीसर्‍या कथेला)

राधिका एकटक गॅलरी मध्ये बसुन समोरच्या झाडांवरच्या पक्ष्यांना बघत होती......ती नेहमी त्याच जागेवर बसायची............तिची आवडती जागा होती ती.......... नेहमी त्याच जागेवर बसुन ती तिचा भुतकाळ आठवायची.........काय करणार ती ......कितीतरी आठवणी तिच्या पदरात सोडुन गेलेला तो भुतकाळ...... कधी न विसारणार्या त्या गोष्टी......ह्याच्या सगळ्यांची तर तिला आता सवयीचं लागलेली.........मस्त सकाळी सात ला उठायची राधिका तिचा तो अद्रकचा चहा आणि त्याच्या सोबत खारी बिस्किटे...... बस हाच तीचा आवडीचा नाशता...…..तिची आरामदायी खुर्ची...... किंवा तो तिचा झोपाळा........त्यावर निवांत बसुन बाहेरील निसर्ग रम्य वातावरणात ती स्वतःला झोकुन द्यायची.........बस एवढाच तिचा सकाळचा दिनक्रम....... न जाणे आज ती बरीच शांत होती........आज तिच्या मुलाचा.........म्हणजे (स्वराजचा) चौथा वाढदिवस होता.......तिने परत त्या शांत थंडगार वाऱ्यासोबत तिचे डोळे मिटले...... आणि परत तिच्या भुतकाळात शिरली.......

@@@@@@@@@@@@@@@@@@

(भुतकाळ)
उज्वला  : चल ना राधिका किती उशीर करतेस..........अग दहाच मिनिटं बाकीये.........शाळा भरायला.......आणि अजुन आपण इथेच घरातच आहोत..........खाली बघ सगळे आपली वाट बघतायत...............(सकाळी सकाळी पोलीस लाईनच्या बिल्डिंग मधील गडबड सुरू......आवो गडबड म्हणजे मुलं सकाळचे शाळेत निघाले ना .........त्याची गडबड...........आणि आज पहिलाच दिवस शाळेचा......)सकाळी सकाळी सात वाजुन पंधरा मिनिटाने आमची विद्या मंदिर हायस्कुल शाळा(मराठी माध्यम) भरते.....त्या साठी च उज्वला राधिकाला आवाज देते.........आणि त्यांच्या ग्रुपचे सगळे मित्र परिवार त्यांची वाट बघत मैदानात उभे असतात.........चला मग आपण आधी त्यांच्या मित्र मैत्रिणींची ओळख करून घेऊया.........

राधिका ......उज्वला.....बाबु.... सचिन....नम्रता...... माधुरी.....संदीप......तृप्ती..... रिंकी......... हे सगळे मित्र मैत्रिणी अगदी लहान पणा पासुनचे..... म्हणजे बालवाडीत असल्यापासुनचे ......हे सगळे जण पोलीस लाईन मध्ये रहायचे........कारण त्यांचे प्रत्येकाचे वडील पोलीस मध्ये होते.. आणि आई त्यांच्या गृहिणी होत्या...............चला मग सुरवात करूया........आपल्या कथेला.........

राधिका : सॉरी सॉरी सॉरी.....आज उशीर झाला ना......मी उद्या लवकर उठेन......(तिचे कण पकडतच उज्वलाला बोलते)

उज्वला : राहूदे......तुझा उद्या कधीच नाही उगवणार माहिते मला.......चल जरा झप झप पायऱ्या उत्तर ना .......(वैतागत)

राधिका शांत बसुन हळुच उज्वला कडे बघत हस्ते..........

बाबु : आलात.....नशीब आमचं.........किती उशीर करतात यार तुम्ही........दोघी.....आता बघत काय बसलायत......चला लवकर.......

उज्वला हळुच राधिकाच्या कानात.....बघितलं आज पण ओरडला......(चिडुन)

राधिका : जाऊदे ग......चुकी आपलीच(एवढं बोलल्यावर उज्वला रागाने राधिकाला बघते.....)म्हणजे माझी चुकी आहे.....मग ओरडा तर खावाच लागेल ना.....जाऊदे ना सोड विषय. ......उगच परत वाद होतील....मी नक्की प्रयत्न करेन लवकर उठायचा.....उद्यापासुन

उज्वला : (हात जोडत) राहुडे........ आलाच उद्या तुझा......आपण ना सगळे बालवाडी पासुनचे मित्र मैत्रिणी आहोत......त्यामुळे तुझा उद्या तर सांगुच नको मला.....

दोघी पण गप्पा गोष्टी करत एकदाचे शाळेत पोहोचतात......ही सगळीच मित्र मैत्रिणी इयत्ता नववी मध्ये असतात......काही जण वेगवेगळ्या तुकडी मध्ये असतात......कोणी अ तर कोणी ब तुकडीत असतात.....पण मधल्या सुट्टीत सगळे एकत्रच जेवायला बसायचे एकमेकांच्या वर्गात जाऊन......ते तस ते लोक एक दिवस आधीच ठरवायचे........

नम्रता : पोहोचलो एकदाचे बाबा........दम लागला मला......

सचिन : मग पाणी पी......

नम्रता : हो पिते हा.......तु नको काळजी करुस.......

माधुरी ये चला आता निघा..... नाहीतर परत बाहेर उभं रहावं लागेल..........आणि मधल्यासुटीत आमच्या वर्गात यायचंय माहितेना

माधुरीच्या बोलण्यावरून सगळे जण हो बोलुन आप आपल्या वर्गात जातात.......आज पण सगळे मन लावुन शिकत होते........सगळे एकाच वयाचे असल्यामुळे खुप अंडस्टयांडिंग होती....नेहमी ऐकमेकांचा विचार करून चालायचे..........कोणाला काही अडचण आली तर ती त्याला समजुन सांगायचे.....कधीच कुणावर रुसवे फुगवे नाही.......एवढी छान आणि घट्ट मैत्री ह्या सगळ्यांची......

हे सगळे मित्रमंडळी वेगवेगळ्या वर्गात होते.....पण एकाच इयत्तेत होते.......जसे की

(राधिका ......उज्वला .....सचिन एका वर्गात असतात........
बाबु ....नम्रता..... माधुरी एका वर्गात असतात........
....तृप्ती..... रिंकी एका वर्गात असतात)

थोड्याच वेळात मधली सुट्टी होते.........माधुरीच्या सांगण्यावरून सगळे जण एकत्र तिच्या वर्गात भेटतात.......आणि  एकत्रच सगळे एकमेकांशी गप्पा गोष्टी करत एकमेकांच्या डब्याचा आस्वाद घेतात.......

बाबु : अरे लवकरलवकर संपवा ना डब्बा.....परत बाहेर मैदानात पण जायचंय ना........

सगळे एकत्र त्यांचा डब्बा खाऊन मैदानात त्यांच्या ठरलेल्या जागेवर बसतात...........

नम्रता : तरी अजुन किती वेळ आहे .....मधलीसुटी संपायला......????

रिंकी : वीस मिनिटं बाकीये........अजुन.......(एक नजर रिंकी राधिकावर टाकते) राधिका.....काय वाचतेस मगासपासून.........

राधिका :अरे हे .....गणित कधीच माझ्या डोक्यात नाही जात.......किती तरी वेळ सचिन आणि तृप्ती ने पण शिकवलं.....तरी नाही कळत.....(वैतागुन)

तेवढ्यात बाबु बोलतो : ये तुम्ही सगळे गप्पा मारा मी आलोच दोन मिनिटात........

रिंकी : हा कुठे गेला....जाऊदे.....मग  तु सरांनाच विचार ना......

राधिका : हो आता तेच करावं लागेल वाटत.....

तृप्ती : हम्म......काही अवघड नाहीये.......तुला वाटलं तर आज परत मी शकवते.....नाहीतरी आज पहिलाच दिवस आहे शाळेचा तु टेंशन नको घेऊस...बघ कळतंय का....नाहीच समजलं तर मग तु विचार सरांना.....


राधिका : हम्म......(राधिका पुस्तकात बघत बोलते)

थोड्याच वेळात बाबु एका मुला बरोबर येतो............सगळे जण एकत्र त्याच्या कडे बघतात......

बाबु : हे इकडे बघा सगळे.........हा आपल्या कॉलनी मध्ये नवीन आलाय रहायला.........ह्याच नाव  स्वप्नील.......दोन दिवस आधीच आपल्या शाळेत ह्याने  ऍडमिशन घेतल......हा दहावीला आहे आता.....म्हणजे आपल्यापेक्षा एक वर्ष मोठा.......

सगळे त्याला आप आपली ओळख करून देतात.........पण राधिका तिच्या गणितातच अडकुन बसलेली असते....

बाबु :ये राधिका .......राधिका.......

राधिका : हा बोलना......सॉरी लक्ष नव्हतं..........

बाबु : ह्याला भेट हा स्वप्नील .....आपल्या पोलीस लाईन मध्ये आलाय रहायला......आणि ह्याने इकडेच दहावीला ऍडमिशन घेतलं..... आपल्या शाळेत........

राधिका एक नजर स्वप्नील वर टाकते.....आणि त्याला हॅलो बोलते........तो सुद्धा तिला गोड स्माईल करून हॅलो बोलतो........न जाणे राधिकाच्या आवाजाने स्वप्नीला थोडं वेगळच फील झालं.........

तृप्ती : तु सुद्धा आमच्या ग्रुप बरोबर रहा.....तुला नक्कीच आवडेन

स्वप्नील : हो नक्की.....

सचिन : तु आधी कुठे शिकायचा......?????

स्वप्नील :   आम्ही आधी ताडदेव ला रहायचो......तिकडेच विकास हायस्कुल मध्ये शिकायचो....पण बाबांची बदली आता इथे चेंबुर ला झाली म्हणुन इथे आलो........त्यांना लांब पडायचं ना.....

नम्रता : म्हणजे तुझे बाबा पोलीस मध्ये आहे......????

स्वप्नील : हो ......

नम्रता : आमचे पण  सगळ्यांचे बाबा पोलीस मध्ये आहे..........चांगलं जमेन तुझ्या बरोबर आमचं सगळ्यांच......(इथे सगळेच जण एकमेकांन बरोबर गप्पा गोष्टी करत असतात........पण राधिका ही पुर्ण तिच्या गणिताच्याच विचारात असते......)

रिंकु : तु डबा  खालास का.........??????

स्वप्नील : नाही आज नाही आणला........म्हणुन कॅन्टीन मधला वडापाव खाला.........

बाबु : अरे अस नको करुस......उद्या पासुन तु आमच्या बरोबर मधल्यासुटीत येत जा...........आम्ही ना प्रत्येकाच्या वर्गात जाऊन डब्बा खातो......आज आमच्या वर्गात होतो.......उद्या सचिन च्या वर्गात आहे.....तु ये.....आठवणीने.........आणि शाळा सुटल्यावर इथेच भेट.......आपण एकत्र घरी जाऊया........

स्वप्नील : हो नक्की.......... आवडेन मला तुमच्या सोबत रहायला......(एवढं बोलतच मधलीसुटीची वेळ संपते)

रिंकु : ये चला चला निघुया.....नाहीतरी आज शाळेचा पहिलाच दिवस त्यामुळे आता दोनच पिरेड आहेत .....आपण भेटु परत ह्याच ठिकाणी ......मग रात्रीच काय खेळायचं ते डीसाईड करू..........

सगळे तिला होकार देत आपापल्या वर्गात जातात.........आणि सगळेच मन लावुन आजचा दिवस एन्जॉय करतात........नाहीतरी पाहिल्यादिवशी सगळे शिक्षक आप आपली ओळख करुन देत होते...कोण कोणते कोणते विषय शिकवणार ह्यावरच चर्चा चालु असते............त्यामध्येच आजचा दिवस निघुन जातो......सगळे एकत्रच शाळा सुटल्यावर त्यांच्या ठरलेल्या  ठिकाणावर पोहोचतात......

स्वप्नील सुध्दा बाबुच्या सांगण्यावरून त्यांच्यात शामिल होतो......सगळे एकत्रच आज घडलेल्या दिवसाबद्दल एकमेकांना सांगतात.........

(वर्तमान काळ)

राधिका डोळे बंद करून बसलेली असते......नकळत तिच्या बंद डोळ्यातुन भुतकाळ आठवुन पाणी येत........तिच्या बसलेल्या त्या जागेवर पाठुन कोणी तरी तिच्या खांद्यावर हात ठेवत.........तशी ती तिच्या भुतकाळातून बाहेर येते........

मीना ताई(राधिकाची आई ): स्वराज उठलाय........तुला विचारतोय.........

राधिका : हम्म.....(एवढं बोलुन परत बाहेर एकटक बघते)

मीना ताई : काय झालं......आज शांत शांत का झालीस.......बर वाटत नाहीये का तुला...........????(काळजीने)

राधिका : नाही तस नाही........काही.......सहज.....(उठुन जागेवर उभी राहते....आणि नजर चुकवत स्वराजला बघायला जाते)

मीना ताई तश्याच तिच्या पाठमोऱ्या आकृतीला बघतात.....आणि मनातच बोलतात......(सगळं जग पुढे गेल........तु पण पुढे गेलीस........पण तुझ्या आठवणी अजुन ताज्या आहेत......कधी तुझ्या जखमा भरतील देव जाणे...........देवा (हात जोडत) लवकर माझ्या मुलीला ह्यातुन बाहेर काढ....... नाही बघवत तिची अशी अवस्था.......एवढं बोलुन त्या पण तिच्या मागे जातात........

राधिका (स्वराजच्या रूम मध्ये) : उठलं माझं बाळ......(मुलाला मिठी मारत) गुड मॉर्निंग बेटा.......

स्वराज : गुड मॉर्निंग मम्मा.......(राधिकाला एक गोड पापा देत ) बोलतो

राधिका : तर मग आज काय स्पेशल आहे माझ्या बाळाचं........

स्वराज : (बोबड बोलत)  आज माझा हॅपी बडे आहे(हसत

राधिका :  अरे हा......मी तर विसरलेच होते.......(मुदामून)

स्वराज : नो मम्मा .....दिस इज नॉट फेर मम्मा..... तु कशी विसरलीस........म्हणजे तु मला गिफ्ट नाय आणलं......???

राधिका :ओ नो .....आता काय करायचं.........माझ्या बाबुला आता गिफ्ट कुठुन आणायचं.......हम्मम(विचार करत)

स्वराज :मम्मा एक मिनिटं.....तु आपल्या बाजुच्या शॉप मध्ये जाऊन आणा......

राधिका : हम्मम......नॉट अ बॅड आयडीया........पण त्या आधी तुला छान पैकी शम्बो करावी लागणार........नंतर तुला जयबपा करावं लागणार.....नंतर ब्रेकफास्ट आणि दुध प्यावं लागणार......आणि त्या नंतर माझ्या स्वराजला मी त्याच गिफ्ट देणार

स्वराज : ये ये ये ये.......मी आताच आजीला सांगतो नाऊ नाऊ घालायला.......(स्वराज चटकन उठुन आजीकडे धावतो)

राधिका एकटक तिच्या मुलाचा आनंद बघते.....आणि परत एका जागेवर बसुन रहाते......


@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

स्वराज : आजी मला नाऊ नाऊ घालणार ना तु आज.....

मीना  ताई (आजी) : हो हो ...नक्की घालणार......ये इकडे बस माझ्या मांडीवर

स्वराज लाडात येऊन त्याच्या आजीच्या मांडीवर येऊन बसतो.....मीना ताई सुद्धा त्याचा गोड गोड पापा घेतात........

स्वराज :आजी आजी .....आज काये स्पेशल.....

मीना ताई : हम्मम्म्मम्म(मुदामून) अरे हा ....आज माझ्या स्वराजचा वाढदिवस आहे....हो की नाय

स्वराज : हो( खुशहोत) मग मला माझं गिफ्ट दे ना...........

मीना ताई : हो हो देणार देणार......आधी शम्बो करूया.....मग देते.....ठिके

स्वराज : (हट्ट करत) नाही मला आताच हवय......आताच हवय .....आता म्हणजे आता.....(तेवढ्यात  राधिका त्याच्या रूम मधुन बाहेर येते.....)

राधिका : स्वराज बेटा .....असा मोठ्यांसमोर हट्ट नाही करायचा.........

मीना ताई : अग असुदेणा.......आजीये मी त्याची.....त्याला जे हवं ते मी नक्की देईन त्याला........स्वराज तु जा तुझ्या रूम मध्ये मी तुझ्या साठी गरम  पाणी लावते....

स्वराज आनंदाने उड्या मारत मारत रूम मध्ये जातो....
राधिका परत तिच्या कामाला लागते......

मीना ताई तिचा पडलेला चेहरा बघुन बोलतात......काय झालं.....आज चिंता कसली.........???

राधिका : काही नाही ग ........सहज.....रात्री थोडी झोप नाही लागली.....म्हणुन जरा डोकं दुखतंय......

मीना ताई : खरच बोलतेस ना .....?????

राधिका : आई .......खर काय आणि खोट काय......माणसांना जास्त खोट आवडत......खरी गोष्ट नाही पटत......(एवढं बोलुन राधिका तिच्या रूम मध्ये शांत निघुन जाते)

मीना ताई पण जास्त प्रश्न न विचारता स्वराजला अंघोळ घालायला निघुन जातात.....

(काय मग वाचकाहो कसा वाटला माझा दुसऱ्या स्टोरीचा  पहिला भाग.....नक्की सांगा तुमच्या कंमेंट द्वारे)ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sonali Pankaj Shejale

House wife

House Wife